परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय ! जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय !! मराठी पत्रकार परिषद आता तालुका संपर्क अभियान राबविणार !! पुणे दि. ४::- राज्यातील तालुकास्तरावरील पत्रकार संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात तालुका संपर्क अभियान राबविण्याचा महत्वाचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते.. यावेळी विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील यांच्यासह राज्यातून पन्नासवर पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.. तालुकास्तरावरील पत्रकारांवर जास्त अन्याय होतात, हल्ले होतात मात्र त्यांचा आवाज वरपर्यंत पोहचत नाही.. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेने थेट तालुक्यांना मान्यता देत ते परिषदेशी जोडून घ्यावेत अशी सूचना अनेकांनी केल्यानंतर त्यादृष्टीने यंत्रणा उभी करून तसा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. त्यासाठी तालुकास्तरावरील अध्यक्षांची नावे जमा करून त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. तीन तालुक्यांचा