पोस्ट्स

नविन पेन्शन योजना रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा ! "कर्मचाऱ्यांचे बाईक रॅलीव्दारे आंदोलन...!!"

इमेज
नविन पेन्शन योजना रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा... "   कर्मचाऱ्यांचे बाईक रॅलीव्दारे आंदोलन...          नासिक (प्रतिनीधी )::-राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी मंहासंघाचे निर्देशानुसार आज दि.२१ सप्टे. रोजी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक - शिक्षकेत्तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीचे वतीने नविन पेन्शन योजना रद्द करुन सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा. या मागणीसाठी जिल्हा स्थरावर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय समोर छत्रपती शिवाजी स्टडीयम वर रॅलीची सांगता करण्यात आली. तालुका स्थरावर सर्व पंचायत समित्या ते तहसिल कार्यालये असे बाईक रॅलीचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफाडे यांचे मार्फत निवेदन दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार हळदे, सरचिटणीस महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, विक्रम पिंगळे यांनी दिली.        राज्य

स्वतःचे अंधत्व बाजुला ठेवून आपल्या बांधवासाठी संघर्ष करणारे डि.पी जाधव एक आदर्श व्यक्तीमत्व - पंडीत अविराज तायडे

इमेज
स्वतःचे अंधत्व बाजुला ठेवून आपल्या बांधवासाठी संघर्ष करणारे डि.पी जाधव एक आदर्श व्यक्तीमत्व - पंडीत अविराज तायडे    नासिक (नरेंद्र पाटील यांजकडून)::- बालपणीच्या पहिल्या टप्प्यात अंधत्व आले म्हणून दु:ख न करता सर्व अंध बांधवांसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे दत्तात्रय जाधव हे खरे समाजसेवी आहेत. त्यांचे आत्मचरीत्र प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरावे असे आहे. सुदृढ व्यक्ती आणि दिव्यांग यांची तुलना करता आपल्या बांधवासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे दत्तात्रय जाधव हे दिव्यदृष्टीचे आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे उद्गार पंडीत अविराज तायडे यांनी काढले. ते सुभाषित प्रकाशन आणि एसडब्लूएस आयोजित "माझी ओळख" या दत्तात्रय जाधव यांच्या आत्मचरीत्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन प्रसंगी बोलत होते. लेखक राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे महासचिव दत्तात्रय जाधव हे याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझे अनुभव आणि संघर्ष लोकांना भावला म्हणूनच एका वर्षात मला दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली हे माझे भाग्य समजतो.          पाहुण्यांचा परीचय एसडब्लूएसचे सीईओ रघुवीर अधिकारी यांनी करून दिल

स्वराज्य संघटनेच्या पहिल्या विजयाची नासिक मधून सुरुवात !

इमेज
स्वराज्य संघटनेचा पहीला विजय ! नासिक (प्रतिनिधी)::- छत्रपती संभाजीराजे यांनी व्यापक व समाजाभिमुख राजकारण करण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर स्थापन केलेल्या स्वराज्य संघटना प्रणित ग्रामपंचायत निवडणूक माध्यमातून पहीला विजय नासिक जिल्ह्यात नोंदविला.           जिल्ह्यातील नागलवाडी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत स्वराज्य संघटना प्रणित उमेदवार सौ. भारती प्रवीण भोर या सदस्यपदी निवडून आल्या. स्वराज्य संघटनेच्या नासिक स्थित कार्यकर्त्यांच्या वतीने लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती नवनाथ शिंदे यांनी दिली.

अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले –अभिनेत्री चिन्मयी सुमीत

इमेज
अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले –अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुंबई (प्रतिनिधी)::-‘मी माझ्या मुलांना मराठी शाळेत घातलं. मराठी शाळा सहज आनंददायी शिक्षण देतात याची खात्री झाल्यावरच मी मराठी शाळांची सदिच्छादूत झाले म्हणजे अनुभव घेतला मगच मी मराठी शाळांची जाहिरात करते’, असे अभिनेत्री चिन्मची सुमीत म्हणाल्या. शनिवार दि. १७ रोजी डॉ. बाळ भालेराव सभागृह, मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे मुंबई मराठी साहित्य संघ आणि मराठी अभ्यास केंद्र यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आयोजित केलेल्या मराठीप्रेमी पालक मेळाव्यात बोलत होत्या.         मराठी संस्कृती टिकवायची असेल तर मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, असे मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी म्हटले. मराठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले पाहिजे. त्यासाठी पालकांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी असे मेळावे आयोजित केले पाहिजेत, असे मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी म्हटले.  चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापक विजयालक्ष्मी शिंदे आणि चिकित्सक समूह तेलंग बालोद्यान

भाजपा गणेशोत्सव स्पर्धा २०२२ कोण ठरणार "विजेता ?"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार बक्षीस वितरण सोहळा !

इमेज
भाजपा गणेशोत्सव स्पर्धा २०२२ कोण ठरणार "विजेता ?" उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार बक्षीस वितरण सोहळा !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई भाजपा यांच्या वतीने अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व कोकण विकास आघाडी यांच्या सहकार्याने, 'मुंबईचा मोरया गणेशोत्सव स्पर्धा २०२२' चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी, सायंकाळी ६.०० वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्तें, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत, संपन्न होणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनौबत व कोकण विकास आघाडीचे सुहास आडीवरेकर यांनी निमंत्रणपत्राद्वारे दिली आहे.        या स्पर्धेचे संयोजक मुंबई बँकेचे अध्यक्ष - आमदार प्रवीण दरेकर व संचालक प्रसाद लाड आहेत. या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट मूर्ती, सर्वोत्कृष्ट सज

नासिक जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदे गटात !

इमेज
नासिक जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदे गटात ! नाशिक पंचायत समिती माजी सभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नासिक जिल्हाप्रमुख पदावर त्यांची निवड करण्यात आली.       या प्रसंगी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित संघटीत  नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, खासदार हेमंत गोडसे, यांसह सरपंच परिषदेचे अध्यक्ष तानाजी गायकर, भाऊसाहेब काका ढिकले, भाऊसाहेब नाना ढिकले, मनोज जाधव, अंबादासपंत ढिकले, दत्ता भाई ढिकले, त्र्यंबक पगार, बाळासाहेब ढिकले,नामदेव ढिकले यांचा प्रवेश करण्यात आला.

आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ : प्राचार्य यशवंत पाटणे

इमेज
आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ : प्राचार्य यशवंत पाटणे      नेवासा जि.अहमदनगर : “आई हे सेवेचे, समर्पणाचे आणि वासल्याचे प्रतीक असते, आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ असून कर्तबगार लेकरे हेच आईचे खरे वैभव असते, लक्ष्मीबाई कानडे या मांगल्याचा मंत्र जपणाऱ्या आदर्श माता होत्या, त्यांच्या संस्कारातून घरदार समृद्ध झाले, आईचे मातृत्व हे मुलाबाळाच्या कर्तृत्वातून सिद्ध होत असते.”  असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक, व्याख्याते, प्राचार्य यशवंत पाटणे यांनी केले.    जेऊर हैबती ता.नेवासा येथे माजी जि.प.सदस्य तुकाराम शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मीबाई कडूभाऊ कानडे यांच्या स्मृतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, बुलढाणा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, जिल्हा कॉंग्रेसचे सचिव अंकुशराव कानडे, औरंगाबाद मनपाचे कनिष्ठ अभियंता शेषराव पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी बन्शी सातपुते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.     पुढे बोलताना प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले की,” ‘सध्या अतिरेकी चंगळवादाने जीवनसौंदर्याची आणि संस्कृतीची हान