स्वतःचे अंधत्व बाजुला ठेवून आपल्या बांधवासाठी संघर्ष करणारे डि.पी जाधव एक आदर्श व्यक्तीमत्व - पंडीत अविराज तायडे

स्वतःचे अंधत्व बाजुला ठेवून आपल्या बांधवासाठी संघर्ष करणारे डि.पी जाधव एक आदर्श व्यक्तीमत्व - पंडीत अविराज तायडे

   नासिक (नरेंद्र पाटील यांजकडून)::- बालपणीच्या पहिल्या टप्प्यात अंधत्व आले म्हणून दु:ख न करता सर्व अंध बांधवांसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे दत्तात्रय जाधव हे खरे समाजसेवी आहेत. त्यांचे आत्मचरीत्र प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरावे असे आहे. सुदृढ व्यक्ती आणि दिव्यांग यांची तुलना करता आपल्या बांधवासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे दत्तात्रय जाधव हे दिव्यदृष्टीचे आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे उद्गार पंडीत अविराज तायडे यांनी काढले. ते सुभाषित प्रकाशन आणि एसडब्लूएस आयोजित "माझी ओळख" या दत्तात्रय जाधव यांच्या आत्मचरीत्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन प्रसंगी बोलत होते. लेखक राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे महासचिव दत्तात्रय जाधव हे याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझे अनुभव आणि संघर्ष लोकांना भावला म्हणूनच एका वर्षात मला दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली हे माझे भाग्य समजतो.

         पाहुण्यांचा परीचय एसडब्लूएसचे सीईओ रघुवीर अधिकारी यांनी करून दिला. प्रकाशक सुभाष सबनीस यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी राजाराम गायकवाड, अजित कुलकर्णी, जगदिप कवाळ, रियाज तांबोळी, सुरेखा धोंगडे तसेच पत्रकार नरेंद्र पाटील, अविनाश गोसावी हे उपस्थित होते. हा कार्यक्रम एसडब्लूएस फायनान्शियल सोल्युशन प्रा.लि च्या सभागृहात संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !