पोस्ट्स

" कर्मचारी बँक सभेत सभासदांचा अनावश्यक व अवाजवी खर्चास सभासदांचा कडाडून विरोध "

.           *प्रेस नोट* " कर्मचारी बँक सभेत  सभासदांचा अनावश्यक व अवाजवी खर्चास सभासदांचा कडाडून विरोध "        नाशिक(प्रतिनिधी)::-नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या दि.२४/०९/२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या स्मरणिका छपाई व तारांकित हॉटेल येथे झालेल्या अनावश्यक व अवाजवी खर्चास विरोध करून खर्च नामंजूर करण्यात आला.        तसेच सभासदांना ५ %  वरून ७ % अशी लाभांश मागणी करून वाढवून घेतले.    कर्जाचे व्याजदर कमी करावे. ठेवी वरील व्याज दर वाढवावे, कर्ज घेताना ठेव व एक हप्ता आगाऊ घेण्यात येऊ नयेत. संचालक मंडळाची मुदत संपली असल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेऊ नका असा सहकार कायदा असून येवला येथे जागा घेण्यास विरोध करण्यात आला अशा सभासद हिताच्या सूचना रवींद्र थेटे, उत्तमराव (बाबा) गांगुर्डे, निलेश देशमुख, दादाभाऊ निकम, विक्रम पिंगळे, अभिजीत घोडेराव, उमेश देशमानकर, नंदकिशोर सोनवणे, सचिन विंचुरकर, सचिन पाटील आदींनी मांडल्या

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!

इमेज
‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’. विजयादशमीला पडद्यावर  ‘शिवप्रताप गरुडझेप’          नाशिक( प्रतिनिधी ) : समर्थ रामदासांनी दासबोधात एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’. शत्रूच्या बेसावधपणाचा फायदा करून घेण्यात तर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. आग्य्राहून शिताफीने करून घेतलेली सुटका हा शिवचरित्रातील विलक्षण अध्याय होता. त्यावर आधारित भव्य मराठी चित्रपट ' शिवप्रताप गरुडझेप ' येत्या ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नासिकला झालेल्या पत्रकार परिषदेत अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी अशी माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत  सहनिर्माते घनश्याम राव उपस्थित होते.     औरंगजेबासारख्या धूर्त आणि कुटील बादशहाला देखील बेसावध ठेवून महाराज त्याच्या हातावर तुरी देऊन कैदेतून निसटून गेले. एखाद्या कादंबरीतच शोभावी अशी ही घटना प्रत्यक्षात घडवून आणणे, हे एका अतिशय बुद्धिमान आणि सावध व्यक्तीलाच शक्य होते. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घालायचा, ही

स्वच्छता ही सेवा मोहिमेत सर्व गावांनी व सरपंचांनी हिरारीने सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे- लीना बनसोड

इमेज
स्वच्छता ही सेवा मोहिमेत सर्व गावांनी व सरपंचांनी हिरारीने सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे- लीना बनसोड        नाशिक (प्रतिनिधी::- जिल्हयात सुरु असलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेत सर्व गावांनी व सरपंचांनी हिरारीने सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे तसेच कुटुंबस्तरावरुन कचरा वर्गीकरण करुन कचरामुक्त गाव करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.          स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत आज सरपंच संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत जिल्हयातील सर्व सरपंच व ग्रामसेवकांना ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. पुढे बोलताना श्रीमती लीना बनसोड यांनी स्वच्छता अभियानांतर्गत विविध घटकांविषयी मार्गदर्शन करताना स्वच्छ व सुंदर गाव तयार करण्यासाठी सरपंच व लोकप्रतिनिर्धीचा सहभाग महत्वाचे असल्याचे सांगितले. प्रत्येक गावाने कचरामुक्त गाव करण्यासाठी नियोजन करुन प्रत्येक घरातूनच चार प्रकारे कच-याचे वर्गीकरण करण्याचा संकल्प करावा. स्वच्छता ही सेवा मोहिमेत गावातील नदी, नाले तसेच महत्वाच्या जागांची स्वच्छता करावी, उकिरडेमुक

नविन पेन्शन योजना रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा ! "कर्मचाऱ्यांचे बाईक रॅलीव्दारे आंदोलन...!!"

इमेज
नविन पेन्शन योजना रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा... "   कर्मचाऱ्यांचे बाईक रॅलीव्दारे आंदोलन...          नासिक (प्रतिनीधी )::-राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी मंहासंघाचे निर्देशानुसार आज दि.२१ सप्टे. रोजी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक - शिक्षकेत्तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीचे वतीने नविन पेन्शन योजना रद्द करुन सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा. या मागणीसाठी जिल्हा स्थरावर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय समोर छत्रपती शिवाजी स्टडीयम वर रॅलीची सांगता करण्यात आली. तालुका स्थरावर सर्व पंचायत समित्या ते तहसिल कार्यालये असे बाईक रॅलीचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफाडे यांचे मार्फत निवेदन दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार हळदे, सरचिटणीस महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, विक्रम पिंगळे यांनी दिली.        राज्य

स्वतःचे अंधत्व बाजुला ठेवून आपल्या बांधवासाठी संघर्ष करणारे डि.पी जाधव एक आदर्श व्यक्तीमत्व - पंडीत अविराज तायडे

इमेज
स्वतःचे अंधत्व बाजुला ठेवून आपल्या बांधवासाठी संघर्ष करणारे डि.पी जाधव एक आदर्श व्यक्तीमत्व - पंडीत अविराज तायडे    नासिक (नरेंद्र पाटील यांजकडून)::- बालपणीच्या पहिल्या टप्प्यात अंधत्व आले म्हणून दु:ख न करता सर्व अंध बांधवांसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे दत्तात्रय जाधव हे खरे समाजसेवी आहेत. त्यांचे आत्मचरीत्र प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरावे असे आहे. सुदृढ व्यक्ती आणि दिव्यांग यांची तुलना करता आपल्या बांधवासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे दत्तात्रय जाधव हे दिव्यदृष्टीचे आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे उद्गार पंडीत अविराज तायडे यांनी काढले. ते सुभाषित प्रकाशन आणि एसडब्लूएस आयोजित "माझी ओळख" या दत्तात्रय जाधव यांच्या आत्मचरीत्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन प्रसंगी बोलत होते. लेखक राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे महासचिव दत्तात्रय जाधव हे याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझे अनुभव आणि संघर्ष लोकांना भावला म्हणूनच एका वर्षात मला दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली हे माझे भाग्य समजतो.          पाहुण्यांचा परीचय एसडब्लूएसचे सीईओ रघुवीर अधिकारी यांनी करून दिल

स्वराज्य संघटनेच्या पहिल्या विजयाची नासिक मधून सुरुवात !

इमेज
स्वराज्य संघटनेचा पहीला विजय ! नासिक (प्रतिनिधी)::- छत्रपती संभाजीराजे यांनी व्यापक व समाजाभिमुख राजकारण करण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर स्थापन केलेल्या स्वराज्य संघटना प्रणित ग्रामपंचायत निवडणूक माध्यमातून पहीला विजय नासिक जिल्ह्यात नोंदविला.           जिल्ह्यातील नागलवाडी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत स्वराज्य संघटना प्रणित उमेदवार सौ. भारती प्रवीण भोर या सदस्यपदी निवडून आल्या. स्वराज्य संघटनेच्या नासिक स्थित कार्यकर्त्यांच्या वतीने लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती नवनाथ शिंदे यांनी दिली.

अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले –अभिनेत्री चिन्मयी सुमीत

इमेज
अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले –अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुंबई (प्रतिनिधी)::-‘मी माझ्या मुलांना मराठी शाळेत घातलं. मराठी शाळा सहज आनंददायी शिक्षण देतात याची खात्री झाल्यावरच मी मराठी शाळांची सदिच्छादूत झाले म्हणजे अनुभव घेतला मगच मी मराठी शाळांची जाहिरात करते’, असे अभिनेत्री चिन्मची सुमीत म्हणाल्या. शनिवार दि. १७ रोजी डॉ. बाळ भालेराव सभागृह, मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे मुंबई मराठी साहित्य संघ आणि मराठी अभ्यास केंद्र यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आयोजित केलेल्या मराठीप्रेमी पालक मेळाव्यात बोलत होत्या.         मराठी संस्कृती टिकवायची असेल तर मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, असे मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी म्हटले. मराठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले पाहिजे. त्यासाठी पालकांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी असे मेळावे आयोजित केले पाहिजेत, असे मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी म्हटले.  चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापक विजयालक्ष्मी शिंदे आणि चिकित्सक समूह तेलंग बालोद्यान