स्वच्छता ही सेवा मोहिमेत सर्व गावांनी व सरपंचांनी हिरारीने सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे- लीना बनसोड

स्वच्छता ही सेवा मोहिमेत सर्व गावांनी व सरपंचांनी हिरारीने सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे- लीना बनसोड

       नाशिक (प्रतिनिधी::- जिल्हयात सुरु असलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेत सर्व गावांनी व सरपंचांनी हिरारीने सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे तसेच कुटुंबस्तरावरुन कचरा वर्गीकरण करुन कचरामुक्त गाव करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.

         स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत आज सरपंच संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत जिल्हयातील सर्व सरपंच व ग्रामसेवकांना ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. पुढे बोलताना श्रीमती लीना बनसोड यांनी स्वच्छता अभियानांतर्गत विविध घटकांविषयी मार्गदर्शन करताना स्वच्छ व सुंदर गाव तयार करण्यासाठी सरपंच व लोकप्रतिनिर्धीचा सहभाग महत्वाचे असल्याचे सांगितले. प्रत्येक गावाने कचरामुक्त गाव करण्यासाठी नियोजन करुन प्रत्येक घरातूनच चार प्रकारे कच-याचे वर्गीकरण करण्याचा संकल्प करावा. स्वच्छता ही सेवा मोहिमेत गावातील नदी, नाले तसेच महत्वाच्या जागांची स्वच्छता करावी, उकिरडेमुक्त गाव करण्यासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे. तसेच २ ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेत हागणदारीमुक्त अधिक गाव, हर घर जल गावाचे निकष पूर्ण करणा-या गावांचा ठराव करावा. जलजीवन मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा ग्रामसभेसमोर ठेवून गावात दर्शनी भागात त्याचे प्रसारण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


            पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी पोषण महा तसेच स्वच्छता अभियानाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सेवा पंधरवडा, लंम्पी स्किन आजार याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. हर्षल नेहते यांनी माता सुरक्षित घर सुरक्षित अभियानाबाबत तर डॉ. देशमुख यांनी क्षयरोग मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. 
         सरपंच संवाद कार्यक्रमासाठी तालुकास्तरावर सर्व सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, खातेप्रमुख, गटसमन्वयक तसेच जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णुपंत गर्जे, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे आदि उपस्थित होते.
दरम्यान, स्वच्छता ही सेवा उपक्रामांतर्गत जिल्हयात शालेय स्तवरावर कचरा कुंडया तयार करणे व रंगविणे, पथनाटय स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सार्वजनिक शौचालय भिंती रंगविणे स्पर्धा, घरगुती स्तरावर कचरा विलगीकरण स्पर्धा, कंपोस्ट खत निर्मिती स्पर्धा अशा विविध स्पर्धां घेण्यात येत असून श्रमदान मोहिम, पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता, स्वच्छता फेरी, गृहभेटी आदि उपक्रम राबविण्यात येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !