पोस्ट्स

सहशालेय उपक्रमांची माहिती असलेल्या "यशोगाथा" पुस्तकाचे आज प्रकाशन !

इमेज
सहशालेय उपक्रमांची माहिती असलेल्या "यशोगाथा" पुस्तकाचे आज प्रकाशन !       नाशिक(२९)::- सुरगाणा तालुक्यातील वांगणपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय बागुल यांच्या पुणे येथील, वैशाली प्रकाशन प्रकाशित 'यशोगाथा' या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सहशालेय उपक्रमांची माहिती देणाऱ्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन आज (दि.२९जानेवारी रोजी) दुपारी १२ वाजता होणार आहे.      सावानाच्या ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, शिक्षणाधिकारी (प्राथ.) भगवान फुलारी, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष प्राचार्य अशोक बागुल, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.      सुरगाणा गटविकास अधिकारी दीपक पाटील, कळवण गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, सुरगाणा गटशिक्षणाधिकारी लता भरसट, कळवण गटशिक्षणाधिकारी, एस. जी. बच्छाव, कळवण पंचायत समिती सभापती जी. पी. साबळे, सुरगाणा पंचायत समिती सभापती मनीषा महाले, मन

आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा !

इमेज
आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा !      मुंबई (महेश कदम)::- "आरंभ प्रतिष्ठान" च्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभादेवी, दादर, माहिम विभागातील पुरातन मंदिरांचे वर्षानुवर्षे देवाची भक्ती, सेवा, पूजाअर्चा करून देवस्थान जागृत ठेवण्यासाठी मनोभावे सेवा करणारे ट्रस्टी व सेवेकरी यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ, मानाची शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार कालिदास कोळंबकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, माजी नगरसेवक नाना आंबोले, भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष नरेंद्र गावकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध मंडळ आणि संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमुख आयोजक संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत धावले, इंद्रजित तिवारी, विकास माने, जितेंद्र कांबळे, चारुहास हंबीरे, जयवंत पवार, विकेश जैन, ओमकार गुरव, जितेंद्र गुप्ता, दादा शिरसेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘आयबीटी’च्या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या ‘ब्रायडल लुक’ ची झळाळी ! ‘आयबीटी’ला सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती जाहीर !!

इमेज
‘आयबीटी’च्या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या ‘ब्रायडल लुक’ ची झळाळी !   ‘आयबीटी’ला सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती जाहीर !!      नाशिक : दुबईस्थित मॉडेलद्वारा सादर करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा ‘ब्रायडल लुक’ आणि कोड असलेल्या स्कीनवरील नववारी लुक मुळे आयबीटीला सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती जाहीर करण्यात आली. सुमारे तीनशे सौंदर्यवतींचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थितांना लाभलेले सौंदर्यशास्त्रातील करियर मार्गदर्शन हा चतु:ष्कोन आयबीटीद्वारा नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करून गेला.          आयबीटी संस्थेच्या वतीने हॉटेल सेलेब्रिटा येथे सदर सेमिनाररुपी कार्याक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दुबईस्थित मॉडेल क्रिस्टीना हिने आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा ‘ब्रायडल लुक’ सादर केला. उपस्थित  सौंदर्यवतींच्या अपेक्षेला साद घालत केलेल्या या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली. याव्यतिरिक्त दुसऱ्या एका मॉडेलने प्रथमच कोड असलेल्या स्कीनवरील नववारी लुक सादर करून सौंदर्यवतींची वाहवा मिळवली. या दोन्ही सादरीकरणातील मॉडेल्सचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेकअप आर्टिस्ट भ

"बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा" उपकरणाला पारितोषिक !

इमेज
  "बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा" उपकरणाला पारितोषिक ! तालुका विज्ञान प्रदर्शनात देवरे विद्यालयाच्या भावीन बोरसे यास तृतीय क्रमांक प्राप्त !!        खोंडामळी (प्रतिनिधी)::- श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील इ.१०वी चा विद्यार्थी भाविन किशोर बोरसे याने सादर केलेल्या 'बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा' या उपकरणाने शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार व  नंदुरबार तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळवला. सदर विज्ञान प्रदर्शन माध्यमिक विद्यालय सेजवा ता.जि.नंदुरबार येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) सतिष  चौधरी यांच्या हस्ते भावीन बोरसे यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरांकित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी डाॅ.युनूस पठाण उपशिक्षणाधिकारी ( माध्य.), निलेश पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नंदुरबार, जिल्हा मुख्याध्यापक सं

अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकारिणी जाहीर !

इमेज
अखिल भारतीय मराठा महासंघाची नाशिक कार्यकारिणी जाहीर !      नासिक (प्रतिनिधी)::- अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत पवार यांनी नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. नाशिक शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात नाशिक शहर युवक सरचिटणीस पदी उमेश अहिरे, नाशिक शहर युवक कार्याध्यक्ष पदी आशिष पुरी, नाशिक ग्रामीण मध्ये देवळा तालुका युवक अध्यक्ष पदी रविन्द्र पवार व बागलाण तालुका युवक अध्यक्ष पदी संदीप अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेत पदभार सोपविण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व केंद्रीय कार्यकारिणी व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांचे सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये खेळाडूंचा वुशू या खेळात विजय !

इमेज
महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये खेळाडूंचा वुशू या खेळात विजय !      नासिक::- पुणे बालेवाडी येथील क्रीडा संकुल मध्ये दिनांक ०९ ते १२ जानेवारी या कालावधीत "महाराष्ट्र ऑलिंपिक गेम्स २०२३" अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या, या क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील क्रीडा स्पर्धकांनी सहभाग घेतला व आपापल्या परीने उत्तम कामगिरी करत पदक मिळविले, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ओलंपिक क्रीडा स्पर्धामध्ये वुशू या खेळात नाशिक जिल्ह्यातून "वुशू असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट" च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यांत मेघा पवार (सानसू) ब्रॉन्झ मेडल, अनिशा वर्मा (तावलू चनकॉन) ब्रॉन्झ मेडल असे दोन पदक प्राप्त केले. शिवाय महाराष्ट्र राज्य ओलंपिक क्रीडास्पर्धांमध्ये नाशिक तर्फे प्रणाली शिंदे, यशस्वी साळवे आणि उमेश थोरे या तीन खेळाडूंनी सहभाग नोंदविला व आपापल्या खेळांचे उत्तम प्रदर्शन करून पदक मिळविण्याचा प्रयत्न केला.        या सर्व खेळाडूंना त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक व वुशू असोसिएशन नाशिक डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष व कोच राजुराम जैस्वाल यांचे मार्गदर्शन मिळाले. झाले

नमस्ते फाऊंडेशनचा उपक्रम !!

इमेज
नमस्ते फाऊंडेशनचा उपक्रम !! नाशिक (प्रतिनिधी)::- येथील नमस्ते फाऊंडेशनच्या वतीने ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, आंबेगण, तालुका दिंडाेरी येथे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम पार पडला.         सामाजिक बांधिलकी जपत नमस्ते फाऊंडेशनने राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थ तसेच मान्यवरांनी काैतूक करून आभार मानले. यासाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहल संदीप देव व आनंदी ग्रूपचे सहकार्य लाभले. याप्रसंगी तहसीलदार पंकज पवार, सुनीता वाणी, ज्याेती ठक्कर, आरती पाटील, शैला साठे, विजया लाेणारी, रितू अग्रवाल, वंदना गाडीलकर, दीप्ती साेनजे, संदीप देव, डॉ. आनंद अहिरे, दीपक अग्रवाल, राजेंद्र गुप्ते, आंबेगावचे सरपंच, उपसरपंच, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित हाेते.