आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा !


आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा ! 

    मुंबई (महेश कदम)::- "आरंभ प्रतिष्ठान" च्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभादेवी, दादर, माहिम विभागातील पुरातन मंदिरांचे वर्षानुवर्षे देवाची भक्ती, सेवा, पूजाअर्चा करून देवस्थान जागृत ठेवण्यासाठी मनोभावे सेवा करणारे ट्रस्टी व सेवेकरी यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ, मानाची शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार कालिदास कोळंबकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर,

माजी नगरसेवक नाना आंबोले, भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष नरेंद्र गावकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध मंडळ आणि संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमुख आयोजक संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत धावले, इंद्रजित तिवारी, विकास माने, जितेंद्र कांबळे, चारुहास हंबीरे, जयवंत पवार, विकेश जैन, ओमकार गुरव, जितेंद्र गुप्ता, दादा शिरसेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर

आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार !

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !