पोस्ट्स

उपविभागीय अभियंता ४ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
उपविभागीय अभियंता ४ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !     नासिक/ जळगाव::- ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते, उपविभागीय अभियंता, वर्ग-१, बांधकाम उपविभाग चाळीसगाव, यांस ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.            तक्रारदार यांनी डॉ. शामा प्रसाद मुखर्जी रुरबन' या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता. चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता. चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.सदर कामाची ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात  तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात लाचेची मागणी करून ४ लाख रुपये लाचेची  रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा.             सापळा अधिकारी स्वप्निल राजपूत, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रभाकर गवळी, पो. ना. संदीप हांडगे, पो. ना. किरण धुळे, पो. ना. अविनाश पवार, पो. ना. सुरेश चव्हाण यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक,

‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न !

इमेज
‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न ! दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या ‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न !          नाशिक (प्रतिनिधी) : पुस्तक प्रकाशने, दिवाळी अंकाची प्रकाशने ही प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मात्र नाशिक येथे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या हातून दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या ‘क्षितिज’ या अंकाचे प्रकाशन झाले. पुस्तक प्रकाशनाचा अनुभव प्रत्येकाला निश्‍चितच सुखावणारा होता.  असोसिएशनतर्फे नागरी सहकारी बँकांच्या गुणवत्तापुर्ण व्यवस्थापन तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना सन्मानित केले. ‘गुरूदक्षिणा’, गोखले एज्युकेशन सोसायटी प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी विद्यानगर कॉलेजरोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘क्षितिज’ अंकाचे प्रकाशन अभिनव पद्धतीने करण्यात आले.               या समारंभासाठी महाराष्ट्रातून कानाकोपर्‍यातून आलेल्या उपस्थितांची संख्या ९०० हून अधिक होती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट होते. यामध्ये नागरी सहकारी बँका

कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक::- कनिष्ठ लिपिक दिगंबर अर्जुन साळवे, शिक्षण उप संचालक कार्यालय, नासिक, वर्ग ३ यांस ५०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.             तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत दि. १३ डिसेंबर २०१९ पासून ते ३१ डिसेंबर २०२२ पावेतो शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते व त्यानंतर  शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आल्यानंतर ते दिनांक १ जानेवारी २०२३ पासून ते आज पावतो सदर शाळेत शिपाई या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही. सदर वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फतीने शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथील आलोसे, कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष  ५००००/-  रुपये लाचेची मागणी करून ती आज दि. १३ रोजी पंचासमक्ष नासिक शिक्षण उप संचालक कार्यालयात स्वीकारली. पुढील कार्यवाही सुरू आहे.            सापळा अधिकारी अनिल बडगुज

पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !        नासिक/जळगाव::- पोलिस उपनिरीक्षक जयंवत प्रल्हाद पाटील, नेम. पारोळा पोलीस स्टेशन जि. जळगाव. वर्ग-२ यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार यांचेवर व त्यांचे नातेवाईकावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ३४४/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ३४१, ३४२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे १२ ऑगस्ट २३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील तकारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी तसेच मा. न्यायालयात दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठविण्यासाठी यातील तक्रारदार यांचे कडेस ३००००/ रुपयांची मागणी करून या अगोदर २००००/ रुपये घेतले व उर्वरित १००००/ रुपये नंतर घेवून या असे सांगितले. त्यानंतर आज दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी यातील आलोसे यांनी पंचा समक्ष १०००/हजाराची मागणी करून तडजोडअंती ८०००/ स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.               सापळा पर्यवेक्षण अधिकारी सुहास देशमुख, पोलिस उप अधीक्षक, सापळा व त

बाबाज् थिएटर्स आयोजित सांस्कृतिक सोहळा २०२३, रसिकांना विनामूल्य सोहळ्याची पर्वणी !!

इमेज
बाबाज् थिएटर्स आयोजित सांस्कृतिक सोहळा २०२३, रसिकांना विनामूल्य सोहळ्याची पर्वणी !!        नासिक (प्रतिनिधी)::- बाबाज् थिएटर्स ही संस्था गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्रभर सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. १७ सप्टेंबर २००० रोजी संस्थेची स्थापना झाली. त्यानिमित्ताने यावर्षी होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्याचा शुभारंभ बुधवार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ०६:०० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे कथक नृत्यांगना निकिता सिंग (दिल्ली) यांचे एकल कथक नृत्याचे सादरीकरण होणार आहे, त्यांना या सादरीकरणात नाशिक मधील तबलावादक कुणाल काळे, गायक पुष्कराज भागवत व सितार वादक प्रतीक पंडित साथसंगत करतील. या कार्यक्रमाची सुरुवात सितार वादक प्रतीक पंडित यांच्या एकल वादनाने होईल, त्यांना नाशिक मधील उभरते तबला वादक अद्वय पवार साथ संगत करतील.        सर्व रसिक श्रोत्यांनी या अलौकिक व विनामूल्य अशा दर्जेदार कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन बाबाज् थिएटर्स तर्फे प्रशांत जुन्नरे, अमोल पाळेकर, कैलास पाटील, डॉ. प्रमोद शिंदे, नारायण गायकवाड, एन. सी. देशपांडे, योगिता पाटील व प्रा. डॉ. प्रितीश कुलकर्णी यांनी क

आधाराश्रमाला देणग्यांचा आधार महत्वाचावार्षिक सर्वसाधारण सभेतला सूर !

इमेज
आधाराश्रमाला देणग्यांचा आधार महत्वाचा वार्षिक सर्वसाधारण सभेतला सूर !            नाशिक ( प्रतिनिधी ) आधाराश्रम या सेवाभावी संस्थेला देणगीदारांचा नेहमीच भक्कम आधार असतो. बदलत्या काळानुसार जनरेटर ही गरज झाली आहे. एका देणगीदारांनी नुकताच एक जनरेटर व सीसीटीव्ही कॅमेरे संस्थेला देणगी स्वरूपात दिले आहेत. संस्थेला शासनाचे मिळणारे अनुदान तुटपुंजे असते व विलंबाने मिळते त्यामुळे देणग्यांवरच विसंबून रहावे लागते. अधिकाधिक देणगीदारांनी पुढे यावे असा सूर वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटला.      अनाथ व परित्यक्त बालकांचे घर असलेल्या आधाराश्रम असलेल्या संस्थेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (दि.१०) झाली. घारपुरे घाटावरील संस्थेच्या वास्तूत झालेल्या या सभेच्या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष विजय दातार, कार्यवाह हेमंत पाठक व सुनीता परांजपे  उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. २०२२ - २३ या वर्षातील वार्षिक अहवाल व ऑडीटेड स्टेटमेंट यांना मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकातील कमीअधिक खर्च मंजूर झाले. ज्या देणगीदारांनी फार पूर्वी जेवण, नाश्ता यासाठी अल्प रकमे

अनोख्या जगव्यापी गणेशकाव्य उपक्रमाची घोषणा ! "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "राष्ट्रकुट" यांचा उपक्रम ! मोफत नांव नोंदणी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत !!

इमेज
अनोख्या जगव्यापी गणेशकाव्य उपक्रमाची घोषणा ! "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "राष्ट्रकुट" यांचा उपक्रम ! मोफत नांव नोंदणी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत !! गुरुदत्त वाकदेकर यांजकडून, न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक     मुंबई::- "मराठी साहित्य व कला सेवा" संस्था ४ मे २०१६ पासून कार्यरत आहे. अनेक साहित्यिक स्पर्धा, संमेलन आणि उपक्रम विनाशुल्क राबविले आहेत. त्यामधून अनेकांन‍ा अधिक सक्षमपणे लिहिण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ लाभले. संस्थेशी जोडलेल्या अनेकांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्रभर होत असलेल्या साहित्यिक, सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रातल्या कार्यक्रमांची माहिती सर्वदूर पोहचण्यासाठी ही संस्था आपलं निस्वार्थ योगदान देत आहे.       "राष्ट्रकुट" चांगले वाचन -- चांगली प्रेरणा. . . ह्या ब्रिदवाक्यासह समाजात सकारात्मक विचार पोहचणारं महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध मासिक तसेच युट्युब वाहिनी. मागील दोन वर्षांत जगभरातल्या विविध देशांमध्ये ज्यांचा वाचकवर्ग तशीच दर्शकसंख्या आहे. ज्यातून वैविध्यपूर्ण माहिती आणि विचारांचा झरा सातत्याने वाहत असतो. त्यामु

सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे नागरी सहकारी बँकांचे कर्तव्य-खा. सुरेश प्रभू

इमेज
सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे नागरी सहकारी बँकांचे कर्तव्य-खा. सुरेश प्रभू             नाशिक (प्रतिनिधी) : भविष्यात सहकार क्षेत्राला उज्वल दिशेकडे नेण्यासाठी सहकारातील मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याची गरज असून सहकार क्षेत्राने सर्वस्पर्शी जाणिवेतून काम करण्यासाठी एकत्रित विचारातून विकासाच्या संकल्पना रूजवाव्यात. त्यासाठी काळाबरोबरच बदलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे तितकेच महत्वाचे आहे. तंत्रज्ञान, मार्केटिंग याबरोबरच सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे व संस्थेचा विकास यांचा समतोल राखणे संस्थेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व ठरेल. समाजाचा विकास करण्यासाठी ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर नाते जोडून बँकांनी ग्राहकाभिमुखता जपावी. सहकार ही उद्याच्या काळाची गरज आहे ती अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी आत्मपरिक्षण करण्याबरोबरच सहकारातील सात्विकता जपावी. सहकार हे उद्याच्या जगाचे प्रभावी माध्यम असेल असे प्रतिपादन माजी रेल्वे मंत्री, भारत सरकार तथा चेअरमन-न्यू ड्राफ्ट पॉलिसी (को-ऑप.), सहकार मंत्रालय, भारत सरकारचे खा. सुरेश प्रभू यांनी केले.               दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् अ

सृजनाच्या वाटा : परिचयाचा उत्कृष्ट नमुना !

इमेज
सृजनाच्या वाटा : परिचयाचा उत्कृष्ट नमुना !       महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक उद्धव भयवाळ यांची साहित्याच्या प्रांतात विनोदी कथासंग्रह, बालकथासंग्रह, काव्यसंग्रह, बालकविता संग्रह, एकांकिका लेखन, लावण्या, दिवाळी अंकात लेखन आणि हिंदी भाषेतील लेखन अशी यशस्वी घोडदौड सुरू असताना त्यांनी आता विविध लेखकांच्या पुस्तकांचे परिचयात्मक लेखांचा संग्रह प्रकाशित करणे अशी भरारी घेतली आहे. कारण नुकताच त्यांचा 'सृजनाच्या वाटा' हा परिचय आणि प्रस्तावनांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. शॉपिझेन डॉट इन या नामांकित प्रकाशन संस्थेने अत्यंत आकर्षक, देखण्या स्वरूपात तो संग्रह प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठ, कागद, छपाई, अक्षरांचा आकार, इत्यादी बाबतीत अत्यंत सुस्वरूपात हा संग्रह वाचकांच्या भेटीला येत आहे, हा संग्रह हाती घेतल्याबरोबर वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतील हे निश्चित !         अंतरंगात लेखकाची लेखणी वाचकांना खिळवून ठेवण्यासाठी समर्थ नि सशक्त आहे. या संग्रहात एकूण सव्वीस लेख आहेत. ज्यात अठरा लेख हे परीक्षणात्मक आहेत, सहा लेखांना भयवाळ ह्यांनी दिलेल्या प्रस्तावनांचा समावेश केला आहे आणि दोन पुस्तकांच

जिल्हास्तरीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व !

इमेज
जिल्हास्तरीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व !         नासिक::- मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे पार पडलेल्या बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात सर्व वजनी गटात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले. बेल्ट रेसलिंग मास रेसलिंग या क्रीडा प्रकारातील वजनी गटातील विजेते पुढील प्रमाणे  ४० कि. गटात प्रेम धुळे   ५० कि. गटात तेजस बोरसे ५५ कि. गटात विक्रम कुंदे ६० कि. गटात कृष्णा कुंभारकर ६५ कि. गटात ओम निकम ७० कि. गटात मकरंद कुमावत ७० कि. गटात प्रशिक जाधव +७० कि. गटात ऋषिकेश शिंदे ४० कि. गटात धर्मराज खोडे +५० कि. गटात यश निरभवणे तसेच महिला विजेत्या खेळाडू पुढीलप्रमाणे ३५ कि. गटात जयश्री गायकवाड ४० कि. गटात प्रतीक्षा गवळी ४० कि. गटात रक्षा कानडे ४५ कि. गटात फौजीया शेख ५० कि. गटात वेदश्री कुलकर्णी ५० कि. गटात ममता शिर्के  ५५ कि. गटात मैत्री अहीरे ५५ कि. गटात आदिती मते +५५ कि. गटात अक्षदा तालखे  हे सर्व खेळाडू विजयी झाले असून सर्वांची