कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

     नासिक::- कनिष्ठ लिपिक दिगंबर अर्जुन साळवे, शिक्षण उप संचालक कार्यालय, नासिक, वर्ग ३ यांस ५०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. 

           तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत दि. १३ डिसेंबर २०१९ पासून ते ३१ डिसेंबर २०२२ पावेतो शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते व त्यानंतर  शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आल्यानंतर ते दिनांक १ जानेवारी २०२३ पासून ते आज पावतो सदर शाळेत शिपाई या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही. सदर वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फतीने शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथील आलोसे, कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष  ५००००/-  रुपये लाचेची मागणी करून ती आज दि. १३ रोजी पंचासमक्ष नासिक शिक्षण उप संचालक कार्यालयात स्वीकारली. पुढील कार्यवाही सुरू आहे.
           सापळा अधिकारी अनिल बडगुजर  
पोलिस उप अधीक्षक, सापळा पथक पो. ना, मनोज पाटील, पो. ना दिपक पवार, म. पो.अम. शितल सूर्यवंशी यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।