अनोख्या जगव्यापी गणेशकाव्य उपक्रमाची घोषणा ! "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "राष्ट्रकुट" यांचा उपक्रम ! मोफत नांव नोंदणी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत !!

अनोख्या जगव्यापी गणेशकाव्य उपक्रमाची घोषणा !
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "राष्ट्रकुट" यांचा उपक्रम !
मोफत नांव नोंदणी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत !!
गुरुदत्त वाकदेकर यांजकडून,
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक

    मुंबई::- "मराठी साहित्य व कला सेवा" संस्था ४ मे २०१६ पासून कार्यरत आहे. अनेक साहित्यिक स्पर्धा, संमेलन आणि उपक्रम विनाशुल्क राबविले आहेत. त्यामधून अनेकांन‍ा अधिक सक्षमपणे लिहिण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ लाभले. संस्थेशी जोडलेल्या अनेकांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्रभर होत असलेल्या साहित्यिक, सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रातल्या कार्यक्रमांची माहिती सर्वदूर पोहचण्यासाठी ही संस्था आपलं निस्वार्थ योगदान देत आहे. 

     "राष्ट्रकुट" चांगले वाचन -- चांगली प्रेरणा. . . ह्या ब्रिदवाक्यासह समाजात सकारात्मक विचार पोहचणारं महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध मासिक तसेच युट्युब वाहिनी. मागील दोन वर्षांत जगभरातल्या विविध देशांमध्ये ज्यांचा वाचकवर्ग तशीच दर्शकसंख्या आहे. ज्यातून वैविध्यपूर्ण माहिती आणि विचारांचा झरा सातत्याने वाहत असतो. त्यामुळे अल्पावधीतच वाचकांच्या आणि दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलं आहे.
          ह्या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा उपक्रम गणेशोत्सवा निमित्ताने घेण्यात येत आहे. १९ सप्टेंबर २०२३ रोजी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने "मराठी साहित्य व कला सेवा - राष्ट्रकुट गणेशकाव्य उपक्रम २०२३" ची घोषणा करण्यात आली आहे. प्रस्थापित तसेच नवोदित कवी/कवयित्री यांच्या गणपती वरील रचनांचं प्रसारण राष्ट्रकुट युट्युब वाहिनीवरून करण्यात येणार आहे. ज्यांना सहभाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी आपली नावनोंदणी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत करणे अनिवार्य आहे. 
            सदर उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा उपक्रम आहे. स्पर्धा नाही. सहभागासाठी कविता / अभंग / गीत / गजल मराठी भाषेत तसेच स्वलिखित असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सहभागींना आपली एकच रचना ३ मिनिटांपर्यंत सादर करता येईल. कविता जास्तीतजास्त २० ओळी, अभंग ७ चरणं, गीत ४ कडवी, गजल ५ शेर ही मर्यादा आहे. सहभागींना दोन स्वतंत्र व्हिडिओ पाठवायचे आहेत. पहिला व्हिडिओ - आपल्या घरातला, तसेच आपल्या नातेवाइक, मित्रपरिवार  किंवा आपण जिथे राहात असाल तिथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा आणि सजावटीचा आणि दुसरा व्हिडिओ - आपण सादर करत असलेल्या कविता / अभंग / गीत / गजलचा. व्हिडिओ करताना मोबाइल आडवा धरून जास्तीतजास्त ३ मिनिटांचे चित्रण करावे. रचना आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी १९ सप्टेंबर २०२३ ते २६ सप्टेंबर २०२३ हा कालावधी आहे. त्याचे प्रसारण "राष्ट्रकुट युट्युब वाहिनी" वरून गणेशोत्सवाच्या कालावधीत म्हणजे १९ सप्टेंबर २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत केले जाईल. उपक्रमासाठी स्वीकारलेली रचना "राष्ट्रकुट मासिकात" जागेच्या उपलब्धतेनुसार रचनाकाराच्य‍ा नावासह प्रसिद्ध केली जाईल. उपक्रमासाठी स्वीकारलेल्या रचनांचं ई-बुकही मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित केले जाणार आहे.
        सदर उपक्रमाच्या सविस्तर माहितीसाठी आपण ९९८७७४६७७६ ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !