आधाराश्रमाला देणग्यांचा आधार महत्वाचावार्षिक सर्वसाधारण सभेतला सूर !

आधाराश्रमाला देणग्यांचा आधार महत्वाचा
वार्षिक सर्वसाधारण सभेतला सूर !

           नाशिक ( प्रतिनिधी ) आधाराश्रम या सेवाभावी संस्थेला देणगीदारांचा नेहमीच भक्कम आधार असतो. बदलत्या काळानुसार जनरेटर ही गरज झाली आहे. एका देणगीदारांनी नुकताच एक जनरेटर व सीसीटीव्ही कॅमेरे संस्थेला देणगी स्वरूपात दिले आहेत. संस्थेला शासनाचे मिळणारे अनुदान तुटपुंजे असते व विलंबाने मिळते त्यामुळे देणग्यांवरच विसंबून रहावे लागते. अधिकाधिक देणगीदारांनी पुढे यावे असा सूर वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटला. 

    अनाथ व परित्यक्त बालकांचे घर असलेल्या आधाराश्रम असलेल्या संस्थेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (दि.१०) झाली. घारपुरे घाटावरील संस्थेच्या वास्तूत झालेल्या या सभेच्या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष विजय दातार, कार्यवाह हेमंत पाठक व सुनीता परांजपे  उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. २०२२ - २३ या वर्षातील वार्षिक अहवाल व ऑडीटेड स्टेटमेंट यांना मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकातील कमीअधिक खर्च मंजूर झाले. ज्या देणगीदारांनी फार पूर्वी जेवण, नाश्ता यासाठी अल्प रकमेची देणगी दिली आहे. ती सर्व रक्कम एकत्रित करून त्यातून एका दिवशीच्या भोजनाचा खर्च करण्याचे ठरले. दिवंगत देणगीदारांच्या वारसांशी संपर्क साधून भोजन रक्कम वाढवून घेण्याचेही ठरविण्यात आले. काही देणगीदारांच्या वारसांकडून कोणताही प्रतिसाद नसल्याने त्यांची नावे कमी करण्याबाबत चर्चा झाली व त्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. वास्तूचे रंगकाम व नूतनीकरण कामे करायची आहेत. संस्थेला वाहन खरेदी करायची आहे. वृद्धाश्रमासाठी सुयोग्य जागा  मिळविण्यासाठी दानशूरांनी पुढे यावे असेही सभेत सुचविण्यात आले. जुन्या सभासदांनी संस्थेशी संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!