पोस्ट्स

जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !

इमेज
जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !        नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ५१ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली. यामध्ये परिचर या पदावरून कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागांनी पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश दिले होते, यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या तत्परतेने मागील महिन्यात अनुकंपा कर्मचारी गट ड मधून गट क संवर्गात समुपदेशनाचे समायोजन करण्यात आले. यानंतर आज सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने परिचर संवर्गातुन पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. परिचर संवर्गातून ४९ तर वाहन चालक संवर्गातून २ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली.          दि. ८ फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभागांतर्गत परिचर कर्मचारी पदोन्नती संदर्भात मुख्य

संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याची ताकद- हफिजुल्लाह खान

इमेज
संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याची ताकद- हफिजुल्लाह खान            नाशिक::- सर्व भारतीयांना गुण्यागोविंदाने एकत्र ठेवण्याची ताकद आपल्या संविधानामध्ये आहे. अशा संविधानाची अमोल भेट पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना दिली. संविधानाच्या जोरावर व मार्गावर आपण सर्व भारतीयांनी आपला देश व देशातील लोकशाही मजबूत ठेवण्याचे आवाहन अल्जामीयातुल इस्लामिया एजुकेशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष हफिजुल्लाह खान यांनी केले.             सातपूर - अंबड लिंकराेडवरी आझादनगर येथील अल्जामीयातुल इस्लामिया एज्यकेशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्षा फिदा हूसैन ताबीर अली चाैधरी, जनरल सेक्रेटरी आबीद अली हफिजुल्लाह खान, सदस्य अबरार अहमद अजिमुल्लाह खान, हुसैन अली माेहम्मद खान, मौलाना अब्दुल हमीद चौधरी  उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अमिरूनिस्सा, शिक्षक शाहिद, शोएब, झुबेर, संदीप, मुसद्दीक यांन

मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
    नासिक(धुळे)::-  शासकीय प्राथमिक आश्रम शाळा, म्हळसर कॅम्प सुलवाडे, ता. शिंदखेडा जि. धुळे येथील मुख्याध्यापक प्रदीप कुमार वामनराव राठोड व शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर शिरपूर जि. धुळे येथील कार्यालय अधीक्षक हनुक फुलसिंग भादले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहारा करिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात. सदर महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील ९ महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित २ महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी वरील आलोसे क्र. १ व आलोसे क्र. २ यांनी तक्रारदार यांच्याकडून २००००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १२०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सदरची लाच रक्कम ही वरील आलोसे क्र.२ यांनी पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रं

जागृती श्रवण विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ! स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत !

इमेज
जागृती श्रवण विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ! स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत !       मखमलाबाद (नासिक)::- सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकास मंडळ संचलित अमर बन्सीलाल छाजेड जागृती श्रवण विकास विद्यालय मखमलाबाद नाशिक येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख मान्यवर स्वामी श्री कंठानंद अध्यक्ष श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान, प्रवर्तक जागृत नाशिक जागृत भारत अभियान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील दिव्यांग बालकांनी आपले विविध कलाविष्कार प्रमुख मान्यवरांच्या समोर सादर केले. तसेच या कार्यक्रमास स्वामी श्रीकंठानंद, साप्ताहिक न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, प्रदीप बंब कोपरगाव, निनाद पुरोहित, विलास पंचभाई, विजय शंकपाल, श्रीकांत चिंचोलीकर, श्रीकांत कुलकर्णी, संस्था अध्यक्ष डॉ.सतीष लुंकड, सचिव  कोठारी, उपाध्यक्ष प्रशांत मुथा, उपसचिव शरद शिरोडे, संस्थापक रामचंद्र सूर्यवंशी, संचालक संदीप लुंकड, बाळासाहेब गिरी, शालेय समितीचे सर्व सदस्य
NEWS MASALA 

हृदयातील राम ! नागेश शेवाळकर, पुणे

इमेज
हृदयातील राम !             'राम' या पवित्र शब्दात प्रचंड ऊर्जा, अलौकिक शक्ती आहे. जो या शब्दाचा सातत्याने उच्चार करतो त्याचे जीवन बदलून जाते. रस्त्याने चालताना, घरात बसलेले असताना कुठेही ही दोन अक्षरे कानावर पडली की, अंतःकरणात आणि शरीरात एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह संचारला जातो, आपल्याही मुखातून रामनाम बाहेर पडते, हात भक्तिभावाने जोडले जातात कारण राम सर्वांच्या मनात, हृदयात वसलेला आहे. हा भाव हनुमंताने स्वतःची छाती फाडून व्यक्त केला. प्रत्येकाच्या हृदयात आहे परंतु प्रत्येक जण हनुमंत नाही म्हणून आपण तशी कृती करू शकत नाही. इतकेच नाही तर रत्नाकरला राम नामाची संथा, मंत्र देऊन अंतर्धान पावलेले नारदमुनी अनेक वर्षांनंतर त्याच मार्गाने जात असताना त्यांना 'राम... राम...' हा मंत्र कानी पडला. नारदमुनींनी तो आवाज कुठून येतोय ह्याचा शोध घेतला. आवाज मानवाचा होता परंतु कुणी दिसत नव्हते. एकवेळ अशी आली की, त्या आवाजाचा मागोवा घेताना त्यांच्या लक्षात आले की, त्या परिसरातील झाडे, वेली, पक्षी इतकेच काय पण दगड मातीपासून तो रामनामाचा ध्वनी येत आहे. बाजूला असलेले एक वारूळ त्या ध्वनी -प्रतिध्

साप्ताहिक न्यूज मसाला ची वाटचाल एक सकारात्मक पत्रकारितेची !

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला ची वाटचाल एक  सकारात्मक पत्रकारितेची !               सन २०१२ मध्ये न्यूज मसाला या साप्ताहिकाला प्रारंभ झाला. काही उद्दिष्टे व पथ्ये ठरवून व ती नेटाने पाळून वाटचाल करण्यात आली. सकारात्मक पत्रकारितेला यंदा बारा वर्षे म्हणजे एक तप पूर्ण करतांना राजकीय उलथापालथ, सामाजिक स्थित्यंतरांचा अनुभव आपण घेतला. तीन वर्षांपूर्वी जागतिक महामारी कोरोना सारख्या संकटाला तोंड देत आपली सर्वांची वाटचाल कधी सुखाचे क्षण तर कधी दु:खाचे चटके सोसत झाली. आयुष्यातील जगण्याचे निकष बदलत गेले. अनेकांनी आपले आप्तस्वकीय, स्नेही गमावले. काहींनी संकटाला संधी मानून लुबाडणूक केली. मानवी स्वभावाचे नमुने समजले. एका सूक्ष्म विषाणूच्या संसर्गामुळे बऱ्यावाईट अनुभवांनी खूप काही शिकवले. हे नमूद करताना मनाच्या संमिश्र भावनांचा सर्वसामान्यांसोबत परामर्श घेत आहोत.  न्यूज मसाला साप्ताहिक कायमच न डगमगता वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवीत आहे.          एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस हा त्याच्या आयुष्यातील आनंदाचा ठेवा असतो.  सिंहावलोकन करण्याचा क्षण असतो. त्याचबरोबरीने जीवनात काय कमावले ? काय गमावले याचा ताळमेळ जमवण्याचाह

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

इमेज
।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।           २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत रामाच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या दृष्टीने गेल्या काही दिवसापासून घरोघरी कार्यक्रमाची पत्रिका, मंदिराचा फोटो, आणि अक्षदा पोहोचवल्या गेलेल्या आहेत. २२ जानेवारी रोजी घरोघरी उत्सव साजरा होत आहे . बारा वाजून वीस मिनिटांनी अयोध्याला मूर्तीची स्थापना होणार आहे. याप्रसंगी आपल्याकडे आपल्या अक्षदा रामाला वहायच्या आहे. राम नामाचा जप करायचा आहे. रामरक्षा स्तोत्र पठण करायचे आहे. दिवे लावायचे आहे. रोषणाई करायची आहे. पंजीरीचा, पेढ्याचा नैवेद्य दाखवा.( पंजीरी म्हणजे, गुळ, धनेपावडर, सुंठ, खडीसाखर, खोबरे. एकत्रित पावडर.) दिवाळी साजरी करायची आहे.  राम नामाचा झेंडा हाती घेतलेला प्रत्येकाने फोटो काढायचा आहे. एकूणच सर्वदूर राममय वातावरण झालेले आहे. अनेक ठिकाणी अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. काही ठिकाणी गेल्या चार-पाच दिवसांपासून एकत्रित जप रामरक्षा स्तोत्र पठण सुरू आहे. शाळांमधून रामरक्षा स्तोत्र म्हटले जात आहे. रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व खूप मोठे आहे. त्या दृष्टीने गावोगावी ते सुरू आहेत. जेणेकरून 

"होशवालों को खबर क्या,,,,,,,,!" सुरेल संगीत मैफलीने स्नेहमेळावा स्वरसुगंधित !

इमेज
"होशवालों को खबर क्या,,,,,,,,!" सुरेल संगीत मैफलीने  स्नेहमेळावा स्वरसुगंधित !        नाशिक ( प्रतिनिधी)  बडी नाजूक है ये मंझिल..., होशवालो को खबर क्या..., जिंदगी जब भी तेरी याद..., बडी खूबसूरत वो..., मजा लेना है..., हंगामा है बरका... तेरी आंखो के दरिया मे..., तेरे रशके कमर...,या व अश्या गाण्यांची मेजवानी गायक कलाकारांनी उपस्थित रसिक श्रोत्यांना दिली. सुप्रसिद्ध गायक संजय वत्सल ( बानुबाकोडे), त्यांच्या पत्नी संज्योत व पुत्र श्लोक यांनी सुरेल गाणी सादर करुन वन्समोअर मिळवले. विविध गझल, गाजलेली हिंदी चित्रपट गाणी यांनी स्नेहमेळावा स्वरसुगंधित झाला.    पेठे विद्यालयातील १९७५ एसएससी बॅचच्या मित्रांचा स्नेहमेळावा ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक संजीव आडगांवकर यांनी आयोजित केला. हॉटेल पाल्म शेलच्या हिरवळीवर  झालेल्या कार्यक्रमाला ६० पेक्षा जास्त मित्र उपस्थित होते. तबल्यावर विजय खिस्ती यांनी तर सिन्थेसायझरवर गौरव काळगे यांनी सुरेल साथसंगत केली. मध्यंतरात घनश्याम पटेल यांनी बदन पे सितारे लपेटे हुए... या गायलेल्या गाण्यावर सर्वांनी ताल धरत नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. संजीव आडगांवकर यांचा

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार !

इमेज
दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार !           मुंबई::- आज दि. १६ रोजी दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार !             ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.              यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्र मध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. या संदर्भात महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी जै