"होशवालों को खबर क्या,,,,,,,,!" सुरेल संगीत मैफलीने स्नेहमेळावा स्वरसुगंधित !

"होशवालों को खबर क्या,,,,,,,,!"
सुरेल संगीत मैफलीने 
स्नेहमेळावा स्वरसुगंधित !

       नाशिक ( प्रतिनिधी)  बडी नाजूक है ये मंझिल..., होशवालो को खबर क्या..., जिंदगी जब भी तेरी याद..., बडी खूबसूरत वो..., मजा लेना है..., हंगामा है बरका... तेरी आंखो के दरिया मे..., तेरे रशके कमर...,या व अश्या गाण्यांची मेजवानी गायक कलाकारांनी उपस्थित रसिक श्रोत्यांना दिली. सुप्रसिद्ध गायक संजय वत्सल ( बानुबाकोडे), त्यांच्या पत्नी संज्योत व पुत्र श्लोक यांनी सुरेल गाणी सादर करुन वन्समोअर मिळवले. विविध गझल, गाजलेली हिंदी चित्रपट गाणी यांनी स्नेहमेळावा स्वरसुगंधित झाला.

   पेठे विद्यालयातील १९७५ एसएससी बॅचच्या मित्रांचा स्नेहमेळावा ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक संजीव आडगांवकर यांनी आयोजित केला. हॉटेल पाल्म शेलच्या हिरवळीवर  झालेल्या कार्यक्रमाला ६० पेक्षा जास्त मित्र उपस्थित होते. तबल्यावर विजय खिस्ती यांनी तर सिन्थेसायझरवर गौरव काळगे यांनी सुरेल साथसंगत केली. मध्यंतरात घनश्याम पटेल यांनी बदन पे सितारे लपेटे हुए... या गायलेल्या गाण्यावर सर्वांनी ताल धरत नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. संजीव आडगांवकर यांचा सर्वांच्या वतीने रवींद्र बर्डे यांनी सत्कार केला. सर्व कलाकारांचे सत्कार हेमंत राठी, वैशाल नाईक, दिलीप शेवडे, कैलास शिंदे, रवींद्र मोडक, सतीश पेठकर, संजय देवधर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वरुची भोजनाने रंगलेल्या मैफलीची सांगता झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !