सबलांना मानाचा सलाम ! रविवार , ८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव , त्यांच्या हक्कांची जाणीव आणि लैंगिक समानतेसाठी ठोस कृतीचा संकल्प - या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा दिवस यंदा ‘ मिळवण्यासाठी द्या’ (‘ Give To Gain ” ’)या आशयघन विषयावर साजरा होत आहे. या थीमचा अर्थ अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे देण्यातूनच खऱ्या अर्थाने प्राप्ती होते . समाजाने जर महिलांना शिक्षण , संधी , सुरक्षितता आणि सन्मान दिला , तर त्या बदल्यात समाजाला मिळते - प्रगती , समृद्धी , स्थैर्य आणि संवेदनशील नेतृत्व. ‘ मिळवण्यासाठी द्या’ हा संदेश केवळ महिलांसाठी नसून संपूर्ण समाजासाठी आहे.मुलींना दर्जेदार शिक्षण द्या-राष्ट्राला सक्षम नागरिक मिळतील.महिलांना निर्णयप्रक्रियेत स्थान द्या - धोरणे अधिक समतोल आणि सर्वसमावेशक होतील.समान वेतन आणि समान संधी द्या - अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल.इतिहास साक्षी आहे की जेव्हा स्त्रियांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक दिले आहे. मग ते रणांगण असो ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा