मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

    नासिक(धुळे)::-  शासकीय प्राथमिक आश्रम शाळा, म्हळसर कॅम्प सुलवाडे, ता. शिंदखेडा जि. धुळे येथील मुख्याध्यापक प्रदीप कुमार वामनराव राठोड व शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर शिरपूर जि. धुळे येथील कार्यालय अधीक्षक हनुक फुलसिंग भादले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. 

         यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहारा करिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात. सदर महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील ९ महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित २ महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी वरील आलोसे क्र. १ व आलोसे क्र. २ यांनी तक्रारदार यांच्याकडून २००००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १२०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सदरची लाच रक्कम ही वरील आलोसे क्र.२ यांनी पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
        सापळा अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, धुळे, सापळा पथक पोनि हेमंत बेंडाळे, रूपाली खांडवी, पोहावा राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, पोशि रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, पोहवा चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर. यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार. वाचक, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !