पोस्ट्स

अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार

इमेज
अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार   चंद्रपूर/मुंबई::-" राष्ट्र प्रथम" हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार श्री अश्विन अघोर यांचे अकाली निधन धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार आपण गमावला आहे ,  अशा शब्दात सांस्कृतिक कार्य ,  वने व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत पत्रकार श्री अश्विन अघोर यांच्या निधनाबद्दल आपले दुःख व्यक्त केले आहे.        ते पुढे म्हणाले की त्यांच्या स्वभावात वैदर्भीय दिलखुलासपणा आणि मिश्किलपणा ठासून भरला होता. जीवनात यश मिळवतांना अनेक संकटांना त्यांनी खिलाडूपणे हसतमुखाने तोंड दिले. अनेक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्समधील यशस्वी कारकिर्दीनंतर आपल्या "घनघौर" या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवरून खऱ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या सत्याचा शोध अव्याहतपणे मांडणाऱ्या अश्विनजींच्या अकाली जाण्याने तयार झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. आपल्या लिखाणातून आणि व्हिडियो वार्तापत्रातून मांडलेल्या विश्लेषणातून त्यांनी जनजागृतीचे मोठे कार्य सातत्याने केले. माध्यम क्षेत्

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्वाचे !

इमेज
बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी  पहिले १००० दिवस महत्वाचे !         नाशिक ( प्रतिनिधी) - माता गर्भवती राहिल्यापासून ते जन्मलेले बाळ दोन वर्षांचे‌ होईपर्यंतच्या काळात बाळाच्या‌ मेंदूची ७५ टक्के वाढ पूर्ण होते. बाळ गर्भावस्थेत असल्यापासून पहिले १००० दिवस त्याच्या‌ सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचे असतात. या काळात बाळाला योग्य पोषण, माया देऊन त्याचे उत्तम संगोपन केले तरच मेंदूची पूर्णपणे वाढ होते. मेंदूतील अनेक केंद्रांची जोडणी होऊन बाळाची आकलन शक्ती, समाजिक कौशल्ये विकसित होते. त्याचा योग्य दिशेने संज्ञात्मक‌ व गुणात्मक विकास होतो. हा विकासाचा अतिआवश्यक टप्पा असून बाळाला स्पर्श, प्रेम आणि पोषणाची जरुरी असते. आई देखील सशक्त, निरोगी व आनंदी असणेही महत्वाचे आहे.  मुलाच्या वाढीसाठी आवश्यक सर्व गोष्टी त्याला वेळच्यावेळी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. युनिसेफ व सर्वजणी महिला उत्कर्ष संस्थेच्या कार्यशाळेत अशी माहिती देण्यात आली.       प्रारंभी सुजाता शिर्के यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, या संदर्भात  पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. जनजागृतीसाठी पत्रकारांनी आपल्या माध्यमाद्वारे स

जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !

इमेज
जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !        नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ५१ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली. यामध्ये परिचर या पदावरून कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागांनी पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश दिले होते, यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या तत्परतेने मागील महिन्यात अनुकंपा कर्मचारी गट ड मधून गट क संवर्गात समुपदेशनाचे समायोजन करण्यात आले. यानंतर आज सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने परिचर संवर्गातुन पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. परिचर संवर्गातून ४९ तर वाहन चालक संवर्गातून २ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली.          दि. ८ फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभागांतर्गत परिचर कर्मचारी पदोन्नती संदर्भात मुख्य

संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याची ताकद- हफिजुल्लाह खान

इमेज
संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याची ताकद- हफिजुल्लाह खान            नाशिक::- सर्व भारतीयांना गुण्यागोविंदाने एकत्र ठेवण्याची ताकद आपल्या संविधानामध्ये आहे. अशा संविधानाची अमोल भेट पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना दिली. संविधानाच्या जोरावर व मार्गावर आपण सर्व भारतीयांनी आपला देश व देशातील लोकशाही मजबूत ठेवण्याचे आवाहन अल्जामीयातुल इस्लामिया एजुकेशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष हफिजुल्लाह खान यांनी केले.             सातपूर - अंबड लिंकराेडवरी आझादनगर येथील अल्जामीयातुल इस्लामिया एज्यकेशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्षा फिदा हूसैन ताबीर अली चाैधरी, जनरल सेक्रेटरी आबीद अली हफिजुल्लाह खान, सदस्य अबरार अहमद अजिमुल्लाह खान, हुसैन अली माेहम्मद खान, मौलाना अब्दुल हमीद चौधरी  उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अमिरूनिस्सा, शिक्षक शाहिद, शोएब, झुबेर, संदीप, मुसद्दीक यांन

मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
    नासिक(धुळे)::-  शासकीय प्राथमिक आश्रम शाळा, म्हळसर कॅम्प सुलवाडे, ता. शिंदखेडा जि. धुळे येथील मुख्याध्यापक प्रदीप कुमार वामनराव राठोड व शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर शिरपूर जि. धुळे येथील कार्यालय अधीक्षक हनुक फुलसिंग भादले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहारा करिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात. सदर महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील ९ महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित २ महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी वरील आलोसे क्र. १ व आलोसे क्र. २ यांनी तक्रारदार यांच्याकडून २००००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १२०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सदरची लाच रक्कम ही वरील आलोसे क्र.२ यांनी पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रं

जागृती श्रवण विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ! स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत !

इमेज
जागृती श्रवण विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ! स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत !       मखमलाबाद (नासिक)::- सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकास मंडळ संचलित अमर बन्सीलाल छाजेड जागृती श्रवण विकास विद्यालय मखमलाबाद नाशिक येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख मान्यवर स्वामी श्री कंठानंद अध्यक्ष श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान, प्रवर्तक जागृत नाशिक जागृत भारत अभियान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील दिव्यांग बालकांनी आपले विविध कलाविष्कार प्रमुख मान्यवरांच्या समोर सादर केले. तसेच या कार्यक्रमास स्वामी श्रीकंठानंद, साप्ताहिक न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, प्रदीप बंब कोपरगाव, निनाद पुरोहित, विलास पंचभाई, विजय शंकपाल, श्रीकांत चिंचोलीकर, श्रीकांत कुलकर्णी, संस्था अध्यक्ष डॉ.सतीष लुंकड, सचिव  कोठारी, उपाध्यक्ष प्रशांत मुथा, उपसचिव शरद शिरोडे, संस्थापक रामचंद्र सूर्यवंशी, संचालक संदीप लुंकड, बाळासाहेब गिरी, शालेय समितीचे सर्व सदस्य
NEWS MASALA