अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार

अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार

 

चंद्रपूर/मुंबई::-"राष्ट्र प्रथम" हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार श्री अश्विन अघोर यांचे अकाली निधन धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार आपण गमावला आहेअशा शब्दात सांस्कृतिक कार्यवने व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत पत्रकार श्री अश्विन अघोर यांच्या निधनाबद्दल आपले दुःख व्यक्त केले आहे.


       ते पुढे म्हणाले की त्यांच्या स्वभावात वैदर्भीय दिलखुलासपणा आणि मिश्किलपणा ठासून भरला होता. जीवनात यश मिळवतांना अनेक संकटांना त्यांनी खिलाडूपणे हसतमुखाने तोंड दिले. अनेक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्समधील यशस्वी कारकिर्दीनंतर आपल्या "घनघौर" या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवरून खऱ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या सत्याचा शोध अव्याहतपणे मांडणाऱ्या अश्विनजींच्या अकाली जाण्याने तयार झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. आपल्या लिखाणातून आणि व्हिडियो वार्तापत्रातून मांडलेल्या विश्लेषणातून त्यांनी जनजागृतीचे मोठे कार्य सातत्याने केले. माध्यम क्षेत्रातील सद्य प्रलोभनांपासून दूर राहून वैचारिक पत्रकारितेचा एक आदर्श अश्विन अघोर यांनी उभा केला. राष्ट्रविरोधी नरेटिव्ह खोडून काढताना नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचा अतिशय चांगला उपयोग त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात करून घेतला. पर्यावरण आणि जैवविविधतेचाही त्यांचा चांगला अभ्यास होता. 

         ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच मित्र परिवाराला या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ देवोअसे सांगून सुधीर मुनगंटीवार यांनी श्री अश्विन अघोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!