Posts

Showing posts from October, 2019

पाणदेव "अर्जुनांचा" वारसदार विकास कामांचे राज-नीतिकार "नितिन" पवार ! जी.पी.खैरनारांच्या लेखनीतून न्यूज मसालाचा खास रिपोर्ट !! न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांनी नितीन पवारांचा सत्कार केला त्याप्रसंगी चर्चेदरम्यान "मतदारसंघाबाबत वडीलांचा वारसा पुढे चालवत राहणार" !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

Image
पाणदेव "अर्जुनांचा" वारसदार विकास कामांचे राज-नीतिकार "नितिन" पवार !
******************************
       नाशिक::- जिल्ह्यातील आदिवासींचे नेते म्हणुन ज्यांनी साठ वर्षे राजकारण केले असे स्वर्गीय ए. टी. पवार साहेब यांचे वारसदार म्हणुन कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघातून आमदार नितीन पवार निवडुन आले आहेत.
           नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पन्नास टक्के आदिवासी बहुल क्षेत्र असे आहे. कळवण, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्रिंबकेश्वर, दिंडोरी हे तालुके पुर्णतः आदिवासी बहुल व डोंगराळ, दुर्गम - अतिदुर्गम अशी भौगोलिक स्थिती. बागलाण, देवळा, नाशिक हे तालुके अंशतः आदिवासी क्षेत्र अशी भौगोलिक स्थिती नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागाची आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजातील जनतेस मुलभूत  आरोग्य सुविधा, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे हा दूर दृष्टिकोन स्वर्गवासी अर्जुन तुळशीराम पवार साहेब तथा ए. टी. पवार साहेब यांनी ठेवला होता. हा दूर दृष्टिकोन ठेऊनच कळवण तालुक्यातील सर्व आदिवासी जनतेच्या जिरायती क्षेत्र हे बागायती क्षेत्र करण्याचे काम आदरणीय ए. टी. पवार साहेब यांनी केले. कळवण…

हिटलरच्या पंख छाटलेल्या कोंबडी सारखी अवस्था करून घेऊ नका !!! मतदान करूया-सशक्त महाराष्ट्राला ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!;

Image
चला मतदानाला चला;मतदान करा जरा समजून

        "एकवीस तारीख" , सर्वांना मतदान टाकण्याचे वेध लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपल्याला समजावून सांगितले आहे की मी काय केले आणि काय करणार आहे. कोणी सांगितले की मी काय करणार आहे. सर्वच आश्वासनं......विश्वास तरी कोणावर ठेवायचा. आज पंधरा दिवसात लोकांनी पाहिलं की सारेच राजकीय पक्ष आपल्या दाराशी आले. कच-यावर बसले. त्यांना घाण वाटली नाही,आपणही त्यांना चांगले वाटलो. कितीही वाईट असलो तरी. आपल्याला लुभावण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपल्याला गरळ घातली.
       आपल्याला राज्याचा विकास करायचा आहे. त्याचबरोबरआपलाही. केवळ राज्याचा विकास करुन चालणार नाही तर आपलेही हितसंबंध सरकारने जोपासले पाहिजे यासाठी आपल्याला मतदान करायचे. जर राज्याचा विकास होत असेल, पण आपला जर जीव जात असेल तर ते राज्य त्या हिटलरच्या कोंबडीसारखे होईल जी कोंबडी हिटलरने पाळली होती. एका कोंबडीचे चक्क त्याने पंखच उपडून टाकले होते. त्यानंतर तो त्यांना दाणे देत होता. आता या कोंबडीला जर कुत्रीम पंख लावले व श्रुंगार केला तरी तिला चिरतरुणता प्राप्त होईल काय? हिच अवस्था आपल्या राज्याची …

आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा चंग बांधला आहे का ? अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ! जिल्हा हिवताप अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

Image
महेंद्र बबनराव देवळीकर, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नाशिक, यांना १५,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक नासिक::- यातील तक्रारदार यांचे सन-१९८६ ते १९९२ या कालावधीमधील एक वेतनवाढ कमी दिली गेल्याचे
तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीचे वेळी सन २०१३ मध्ये झालेल्या वेतन पडताळणीमध्ये निर्देशन
वेतन फरकाचे बील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नाशिक येथे मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी सादर
केले होते. सदर बील मंजुर करण्यासाठी आलोसे महेद्र बबनराव देवळीकर, जिल्हा हिवताप अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडे २०,०००/-रू.लाचेची मागणी केल्याने, तक्रारदार यानी आज दि.१६/१०/२०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिल्यामुळे सदर तक्रारीची ला.प्र.वि.नाशिक पथकाने सापळापुर्व पडताळणी केली असता पड़नाळणी दरम्यान आलोसे महेंद्र बबनराव देवळीकर यांनी तकारदार यांचेकडे २०,०००/-रू लाचेची मागणी करत त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १५,०००/-रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम जिल्हा हिंवताप अधिकारी कार्यालय नाशिक येथे स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

कसं काय पाटील बरं हाय का ? पितृपक्ष संपला, आता कोण कुणाचे "कारणं" खाऊन "राज" करणार ! फड रंगतोय नासिकचा, आज कोलांटउड्या खाणारे कालचे खरे निष्ठावंत ! सविस्तर एक-दोन रिश्टर स्केल चे धक्के अर्थात किरकोळ भूकंपांबद्दल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

Image
कसं काय पाटील बरं हाय का !
निवडणुकीच्या  काळात  उमेदवारांच्या कोलांटउड्या या आता जनतेला नवीन राहिलेल्या नाहीत. पक्षनिष्ठा आणि भाऊंचे  नेतृत्व भाऊंना आणि कार्यकर्त्यांना कुठे घेऊन जाईन याबाबत अनेक चर्चा निवडणुकीच्या काळात झडत असतात. विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या राजकीय पटलावरही अनेक भुकंप, इच्छूकांच्या कोलांटउड्या, कार्यक़र्त्यांशी सल्लामसलत  आणि सुरु झाल्या आहेत याचा परिणाम आपल्याला दिसेलच. उमेदवारी अर्ज दाखल करायला आज आणि उद्या अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आता या दोन दिवसांत काय उलथापालक्ष घडते ते बघणे रंजक ठरणार आहे.
मनाला न पटणार्‍या आणि स्वप्नातील देखील विचार करता येणार नाही अशा खबरी निवडणुक काळात इच्छुकांच्या आणि विद्यमानांच्या बाबतीत येऊ लागल्याने काय सांगतो भाऊ ! खरंच की काय...? अशा शब्दांत चर्चा कार्यकर्त्यांमध्ये घडतांना दिसत आहे.
नाशिकचा विचार करता मध्य, पूर्व,पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या मध्य आणि पश्चिमची उमदेवारी भाजपाकडून जाहीर झाल्याने येथील अनेक इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरल्याचे वृत्त आहे. बैंठकीत सल्लामस…

एक पाऊल निरोगी आयुष्याच्या दिशेने महाराष्ट्र शासन - डॉ. अनुप कुमार यादव. कार्यशाळेच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

Image
नाशिक विभागीय आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यशाळा व बैठक संपन्न
       दिनांक १ऑक्टोबर २०१९ रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथील सभागृहात सार्वजनिक आरोग्य नाशिक विभागा तर्फे विभागीय आरोग्यवर्धिनी केंद्र कामकाज कार्यशाळा व आढावा बैठक घेण्यात आली, सदर कार्यशाळा व आढावा बैठकीसाठी डॉ.अनुप कुमार यादव, आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक रा.आ.अभियान, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तसेच या बैठकीसाठी डॉ.अर्चना पाटील अति. संचालक आरोग्य सेवा. डॉ सतीश पवार अतिरिक्त अभियान संचालक रा.ना.आ.अभियान, डॉ. विजय कंदेवाड सहसंचालक (तं), डॉ.रत्ना रावखंडे, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ,नाशिक, आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच कार्यशाळेला पाच जिल्ह्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी  मनपा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण व नागरी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यवर्धिनी केंद्राचे समुदाय वैद्यकीय अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित होते.
           कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले डॉ. रत्ना र…