एक पाऊल निरोगी आयुष्याच्या दिशेने महाराष्ट्र शासन - डॉ. अनुप कुमार यादव. कार्यशाळेच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

नाशिक विभागीय आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यशाळा व बैठक संपन्न
       दिनांक १ऑक्टोबर २०१९ रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथील सभागृहात सार्वजनिक आरोग्य नाशिक विभागा तर्फे विभागीय आरोग्यवर्धिनी केंद्र कामकाज कार्यशाळा व आढावा बैठक घेण्यात आली, सदर कार्यशाळा व आढावा बैठकीसाठी डॉ.अनुप कुमार यादव, आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक रा.आ.अभियान, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तसेच या बैठकीसाठी डॉ.अर्चना पाटील अति. संचालक आरोग्य सेवा. डॉ सतीश पवार अतिरिक्त अभियान संचालक रा.ना.आ.अभियान, डॉ. विजय कंदेवाड सहसंचालक (तं), डॉ.रत्ना रावखंडे, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ,नाशिक, आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच कार्यशाळेला पाच जिल्ह्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी  मनपा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण व नागरी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यवर्धिनी केंद्राचे समुदाय वैद्यकीय अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित होते.
           कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले डॉ. रत्ना रावखंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यशाळेत सर्वप्रथम डॉ अर्चना पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, एक पाऊल निरोगी आयुष्याच्या दिशेने या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्र शासन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र यांचे रूपांतर आरोग्यवर्धिनी केंद्रात होत असताना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एकूण किती सेवा देणार येणार, तसेच या सर्व कार्यक्रमाचं राज्यस्तरावरून निरीक्षण कसे होणार आहे  व सर्व आरोग्यसेवा या गुणवत्ता पूर्वक देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर डॉ.सतीश पवार यांनी सर्व आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या जबाबदाऱ्या व कामातील समन्वय याबाबत या कार्यशाळेत सविस्तर माहिती दिली.आरोग्यवर्धिनी केंद्रातले डॉक्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा यांच्या कार्यक्रमाच्या जबाबदाऱ्या काय आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यानंतर डॉ.विजय कंदेवाड यांनी आरोग्य वर्धिनी कार्यक्रमाच्या ऑनलाइन तसेच फोन पडताळणी बाबत ज्या गोष्टी आढळल्या त्याबाबत सविस्तर माहीती दिली. यामध्ये आरोग्य सेवा देताना गृहभेटी पण महत्त्वाच्या असून आपल्या कार्यक्रमाविषयी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असावी व त्याबाबतची जबाबदारीने जाणीव असावी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली तसेच सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावीत याबाबत सूचना केल्या तसेच ऑनलाइन पद्धतीचा वापर करून टेलीमेडिसीन पद्धतीने उपकेंद्र स्तरावरून सुद्धा आपल्याला आरोग्यसेवा द्यावयाचे आहेत याबाबत त्यांनी माहिती दिली. आयुक्त डॉ.अनुप कुमार यादव यांनी धुळे ,नंदुरबार, नाशिक,अहमदनगर, जळगाव या ठिकाणाहून आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा विविध आरोग्य सेवां बाबत आढावा घेतला, प्रथम नाशिक विभागातील पाचही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांचे जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रा अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत उपस्थित मान्यवरांसमोर सादरीकरण केले, त्याचबरोबर कमी काम असलेल्या जिल्ह्यांना आयुक्तांनी काम कमी का झाले? याबाबत विचारणा केली व अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना अडचणीतून मार्ग कसे काढायचे याबाबत मार्गदर्शन केले. एकंदरीत नाशिक जिल्ह्याच्या कामकाजाचे उद्दिष्ट व साध्य झालेले कामकाज बघून  महाराष्ट्रातील इतर विभागाच्या तुलनेत नाशिक विभागाचे कामकाज हे अव्वल ठरत असून त्याबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले ,तसेच लाभार्थ्यांना आर्थिक लाभ जो दिला जातो तो ऑनलाइन पद्धतीने देणेबाबत व येणाऱ्या अडचणी दूर करून उद्दिष्ट पूर्ण कसे होईल याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले, आयुक्त यांनी केलेल्या सूचनेनुसार केंद्र शासन स्तरावरील योजनांविषयी जिल्हा स्तरावरील अधिकारी ते क्षेत्रीय अधिकारी यांची एकत्रित सभा विभागवार घ्यावी त्यामुळे चांगला समन्वय घडून येईल, त्यानुसार आजच्या बैठकीचे आयोजन डॉ.रत्ना रावखंडे यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात आले, पाच जिल्ह्यांचे एकूण ७०० अधिकारी एकाच व्यासपीठा समोर उपस्थित पाहून मा आयुक्त यांनी समाधान व्यक्त केले यानंतर डॉ.रत्ना रावखंडे उपसंचालक नाशिक विभाग यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून विभागीय स्तरावर दिलेले उद्दिष्ट पूर्णपणे साध्य करू याबाबत मान्यवरांना उपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने आश्वासित केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसंचालक नाशिक परिमंडळ नाशिक डॉ. रत्ना रावखंडे तसेच त्यांचे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!