सरकारवाडा पोलीसांचे स्काटलँडच्या धर्तीवर पोलिसींग !

न्यूज मसाला, नासिक
नरेंद्र पाटील

नासिक::-शहरांत वाहनचोरीचे अनेक गुन्हे घडत असतांना त्यांचा तपास करणे पोलींसांपुढे नेहमीच आव्हान ठरत आहे, नवनवीन टोळ्या तयार होत असतांना प्रत्येक वेळी नवीन दिशा ठरवावी लागत असते, अशा परिस्थितीत सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी जे वाहनचोर पकडले , ती कारवाई कौतुक करण्यासारखी आहे, पोलीस नेहमीच त्यांचे कर्तव्य पाड पाडीत असतात , तो त्यांच्या कार्याचा भाग आहे , मात्र या वाहनचोरीतील गुन्हेगार पकडले याचा उल्लेख मुद्दामहून करावा लागतो,
तो स्काटलँडच्या धर्तीवर,
कारण , वाहनमालकाला माहीत नाही की आपले वाहन चोरीस गेलेले आहे, व सकाळच्या प्रहरी सरकारवाडा पोलीस वाहनमालकाला त्याच्या घरी जाऊन झोपेतून उठवून खबर देतात !
      याप्रकरणी तीन अल्पवयीन मुले आपली वाहन चालविण्याची हौस भागविण्याकरीता वाहने चोरी करतात, सरकारवाडा पोलीसांचे गस्ती पथकाला संशयास्पद हालचालींची जाणीव होते व या वाहनचोरांना पकडले जाते,
    बातमी नेहमीसारखीच आहे फक्त वाहनमालकाने वाहनचोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर चोर पकडले जातात तेथे ही उलट बातमी आहे की वाहनमालकाच्या तक्रारीआधी वाहनाचा शोघ व गुन्हेगार पकडणे त्यानंतर मालकाशी तत्काळ संपर्क साधणे म्हणजे आजपर्यंत ज्याचे संपूर्ण जग कौतुक करते त्या स्काटलँड पोलीसांच्या धर्तीवर भारतातही पोलीस आपले इमानेइतबारे कार्य करीत आहेत त्यांचे नासिककरांनी कौतुकच करायला हवे,
सरकारवाडा पोलीस निरिक्षक अशोक भगत व त्यांच्या टीमचे हे अतुलनीय कार्य त्यांनाही अजून समजलेले नाही की आपण जी कार्यवाही केली ती किती उंचीचा भाग आहे, कारण हा गुन्हा जागतिक पातळीवरचा नाही, खूप मोठ्या रकमेचा वा आव्हानात्मक स्तरावरचा नाही तरीही गुन्हा तो गुन्हा व उघडकीस कसा आला हे महत्वाचे असते,
हा त्यांचा कदाचित मोठेपणा असेल पण नासिककरांसाठीतरी अभिमानाची गोष्ट आहे हे नमूद करावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।