संजय राऊत मराठा शिवसैनिकांना प्रभावहीन करणारे कुटील व्यक्तिमत्व-अँड.शिवाजी सहाणे

नाशिक/प्रतिनिधी
मातोश्रीला वेठीस धरून राजकीय नफेखोरीचा ठेला चालविणार्या संजय राऊत यांनी निष्ठावान शिवसैनिकांना विशेषतः मराठा समाजातील शिवसैनिकांना वारंवार प्रभावहीन करण्याची कुटील खेळी खेळल्याचा इतिहास ताजा असताना क्रांती मोर्चाला सक्रीय पाठींबा देणारे निष्ठावंत  मराठा शिवसैनिक आ.अॕड.शिवाजी सहाणे यांची हकालपट्टी करून त्यांच्या नसानसात मराठा द्वेष भरला असल्याचे सिध्द केले आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावरून सकल मराठा समाज या द्वेषी प्रवृत्तीचा तिव्र निषेध करीत असून सारी ताकद आ.अॕड.शिवाजी सहाणे यांच्या पाठीशी उभी उभी करण्याचा निर्धार केला आहे.असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी पञकार परिषदेत सांगीतले.आपली भुमिका स्पष्ट करतांना अॕड.शिवाजी सहाणे म्हणाले,अन्यायाविरूध्द संघर्ष करणे ही आम्हा शिवसैनिकांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नेहमीच प्रोत्साहित करते.ही शिकवण मला यावेळी निश्चित बळ देईल.
गेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत अवघ्या सत्तर मतदारांच्या जीवावर शिवसेनेने दिलेली उमेदवारी करून अॕड.शिवाजी सहाणे यांनी प्रतिकुल परिस्थितीतही विजय मिळवला होता.तत्कालीन बाहुबली नेत्यांनी प्रशासकीय व्यवस्थेचा दुरूपयोग करून सहाणे यांना तांञिकदृष्ट्या पराभूत केले.या निर्णयाविरूध्द आव्हान दिल्यानंतर न्यायव्यवस्थेनेही न्याय देऊन शिवाजी सहाणे यांना विजयी घोषीत केले.या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले असले तरी नैतिकतेच्या दृष्टीने अॕड.शिवाजी सहाणे हेच विधान परिषदेचे सदस्य आहेत.प्रतिकुल परिस्थितीतही शिवाजी सहाणे यांनी शिवसेनेला औकाती पेक्षा अधिक मतमुल्य मिळवून दिल्यानंतर पक्ष म्हणून शिवसेना सहाणे यांच्या पाठीशी उभी राहीली नाही उलट शिवाजी सहाणे स्वयंघोषीत आमदार म्हणवून घेत असल्याचा प्रचार करण्याचे कर्मदारिद्र्य दाखविले.अशा शब्दात करण गायकर यांनी शिवसेनेवर टीका केली.
अॕड.शिवाजी सहाणे यांना शिवसेना नेतृत्वाकडून डावलेले जात असल्याची कारणमिमांसा करतांना करण गायकर यांनी संजय राऊत यांचा नतद्रष्टपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला.ते म्हणाले,मराठा क्रांती मोर्चाचे वाढते संघटन पाहून अस्वस्थ झालेले संजय राऊत यांनी मराठा द्वेषातून समाजाविरूध्द कारवाया करण्यास सुरूवात केली.मराठा क्रांती मोर्चा ऐन भरात असतांना शिवसेनेचे मुखपञ असलेल्या दै.सामनातून कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी  मोर्चाला बदनाम करण्याच्या हेतूने "मुका मोर्चा" या आशयाचे अश्लिल व्यंग चिञ प्रसिध्द करून संजय राऊत यांनी सकल मराठा समाजाची निर्भत्सना केली.संजय राऊत हे किती मराठा द्वेषी आहेत याचा प्रत्यय स्वतः संजय राऊत यांनीच सामनातून छञपतींविषयी अवमानकारक ,असत्य माहीती प्रसिध्द करून रोखठोक बदनाम केली.संजय राऊत यांच्या कृष्ण कृत्याचा विरोध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चात पहिल्या दिवसापासून सक्रीय सहभाग असलेले अॕड.शिवाजी सहाणे यांनी सर्वप्रथम यांनी निषेध केला.त्याचा राग मनात धरून शिवसेनेतून हकालपट्टी करीत सहाणे यांच्या माध्यमातून सकल मराठा समाजावर सुड उगवला आहे.या सुड प्रवृत्तीचे मर्दन केल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
शिवाजी सहाणे यांना उमेदवारी द्यायची नाही हा ठाम निर्धार केलेल्या संजय राऊत यांनी पक्षातून हकालपट्टी करण्याचा नतद्रष्टपणा केला.व नरेंद्र दराडे या मागील निवडणूकीत शिवसेना विरोधी कारवाया करून शिवसेनेच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या उमेदवाराला शिवसैनिकांच्या छाताडावर नाचवण्याचा निर्णय घेतला.निष्ठावंत शिवसैनिक शिवाजी सहाणे मराठा आहेत म्हणून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे शल्य मराठा म्हणून आहेच,पण निष्ठेची पावती हकालपट्टी करून देत गद्दारांची पिलावळ पोरणार्या प्रवृत्तीविषयी तेव्हढीच चीड आहे.शिवाजी सहाणे चालत नाहीत तर आणखी एखाद्या सामान्य पण निष्ठा शिवसेनेशी जोडलेल्या  शिवसैनिकाला विधानपरिषदेची ऊमेदवारी दिली असती तर कदाचीत संजय राऊत यांचा डाव झाकला गेला असता पण बुध्दीभ्रष्ट प्रवृत्तीकडून ही अपेक्षा ठेवणे मुर्खपणा आहे.मराठा समाजाचा निर्णय झाला असून या प्रवृत्तीला जागा दाखवून अॕड.शिवाजी सहाणे यांना विधानपरिषदेच्या सभागृहात पाठविण्याचा निर्धार समाजाने केला आहे.जातीवंत मराठा तसेच अन्याविरूध्द चीड असणार्या तमाम बहुजन मतदारही या संघर्षात सोबत राहतील असा विश्वास पञकार परिषदेने व्यक्त केला.
आपली भुमिका स्पष्ट करतांना अॕड.शिवाजी सहाणे म्हणाले की,मी पंचवीस वर्षापासून स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक म्हणून काम करीत आहे.भविष्यातही बाळासाहेबांप्रती,त्यांच्या विचाराप्रती असलेली निष्ठा सोबत घेऊन वाटचाल करणार आहे.पक्ष रसातळाला जाण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रवृत्तींच्या हकालपट्टीचा माझ्या भविष्यातील वाटचालीवर कुठलाही परिणाम होणार नाही.गेल्या निवडणूकीत संख्याबळापेक्षा तीन पट अधिक मते घेऊन मी विजयी ठरलो होतो.तांञिकदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर काही प्रवृत्तींच्या हस्तक्षेपामुळे पक्षाने साथ दिली नाही.विरोधी पक्ष संबंधित उमेदवाराच्या पाठीशी उभा राहीला.इतकेच नाही तर आगामी लोकसभेसाठी त्यांची उमेदवारीही जाहीर केली,अशा भुमिकेतून कार्यकर्त्यांचे नैतिक बळ वाढत असते.ही बाब कळत असूनही शिवसेनेतील चौकडीने जाणीवपुर्वक मला लक्ष्य करून मुख्य प्रवाहाबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला.मराठा जात हे एक कारण तर आहेच शिवाय आर्थिक समीकरणही मला अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरले.पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने मला चर्चेला बोलावल्यानंतर ही निवडणूक खर्चीक आहे.तुम्ही खर्च करू शकणार नाहीत अशी माहीती मिळाली असल्याने उमेदवारी दराडे यांना द्यावी लागते.असे स्पष्टीकरण दिले.ही निवडणूक पैशांवर नाही तर मतदारांवर लढली जाते.असे सुनावून मी माझी भुमिका स्पष्ट केली आहे.या निवडणूकीतील मतदार पैशांवर विकले जातात असे त्यांना सुचित करायचे असावे.असा कयास अॕड.शिवाजी सहाणे यांनी व्यक्त करून विधानपरिषदेची निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
बाॕक्सः
उमेदवारी जाहीर झाली नसतांना तुम्ही प्रचार करीत आहात.असा आक्षेप नोंदविणार्या पक्ष श्रेष्ठींना सुनावतांना पक्षाचा प्रचार करणे गुन्हा आहे का? विधानसभेच्या २८८ जागा लढविणारे पराभूत आणि विजयी उमेदवार आपआपल्या मतदार संघात प्रचार करीत आहेत.मग त्यांचीही हकालपट्टी करणार का? असा सवाल केल्याचे अॕड.शिवाजी सहाणे यांनी सांगीतले.
-साभार, कुमार कडलग, दै लोकमंथन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!