दीपोत्सवाने साजरी केली अहिल्यादेवी जयंती ! नाशिक जिल्हाध्यक्ष नवनीत वजीरे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

दीपोत्सवाने साजरी केली अहिल्यादेवी जयंती ! नाशिक जिल्हाध्यक्ष नवनीत वजीरे
       नाशिक दि.३१::- प्रतिनिधी
धनगर समाजाचे आराध्य दैवत शूर मर्दांगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण भारतात दरवर्षी मोठ्या आनंदात व हर्ष उत्साहात साजरी केली जात असते, यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती आज रविवार दि ३१ मे २०२० रोजी साजरी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. जागतिक महामारी कोरोना कोविंड १९ मुळे सर्व जगावर मोठे संकट आले आहे आपल्या भारत देशात आपले बांधव भगिनी या कोरोना महामारी ला बळी पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँकडाउनची घोषणा केली आहे, अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपल्या घरीच दिवे लावून व आपल्या घरावर पिवळा झेंडा उभारून साजरी केली. धनगर समाज संघर्ष समिती चे नाशिक जिल्हा अध्यक्ष  नवनीत वजीरे व  जिल्हा सचिव आबासाहेब टरपले यांनी एका पत्रकाद्वारे जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन केले होते.              अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७९५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी झाला, अहिल्यादेवी होळकर या शूर महिला मर्दागिनी असल्यामुळे चोंडी येथे मोठ्या प्रमाणात धनगर बांधव जयंती मोठ्या उत्साहात साजरा करत असतात, परंतु या महामारी मुळे चोंडी येथला कार्यक्रम रद्द झाला आहे, तरी शासनाने शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्याचे आवाहनन केले होते, परंतु देशावर आलेल्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सर्वांनी मिळून लढायचे ठरवण्यात आले, तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य नगरसेवक, अधिकारी वर्ग यांना या उत्साहात समाविष्ट करून जयंती मोठ्या प्रमाणात दीपोत्सव करून साजरा करण्याची विनंती ई-मेल द्वारे केली होती. कोरोना महामारीतून आपली, आपल्या परिवाराची, समाज बांधवांची, संपूर्ण देशाची लवकरात लवकर सुटका व्हावी अशी ईश्वराला प्रार्थना करून येणाऱ्या पुढील काळात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करता येईल असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नवनीत वजीरे यांनी केले होते,  दरवर्षी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती वर होणारा लाखो रुपये खर्च होतो तोच खर्च यावर्षी गोरगरीब जनतेला, मेंढपाळांवर, या काळात अडकलेल्या परप्रांतीयांना अन्नधान्याची, त्यांच्या भोजनाची, राहण्याची व त्यांच्या कपड्यांची व्यवस्था करत  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे आवाहन गणपत विठ्ठल वजीरे यांनी केले होते, त्याप्रमाणे स्वत:सह कुटुंबाबरोबर जयंती साजरी केली. यावेळी सौ निर्मला गणपत वजीरे, नाशिक जिल्हाध्यक्ष श्री नवनीत वजीरे, पल्लवी नवनीत वजीरे, मिलिंद वजीरे, ज्योती मिलिंद वजीरे, यश नवनीत वजीरे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अहीराणी भाषेतून केले आवाहन ! व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! कुटुंबप्रमुखच्या भूमिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी !!