पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!

इमेज
राडा’ इव्हेंट: नाशिकमध्ये खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम युवांमध्ये उतुंग उत्साह! नाशिक ::-  नोव्हेंबरला नाशिकमध्ये आयोजित झालेल्या ‘राडा’ इव्हेंटने शहरातील खेळ व प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक नवीन अध्याय घडवला. Metamorph MMA आणि Merakii Events and Gifting यांच्या संयुक्त विद्यमाने २४/७ फिटनेस जिम, बोधलेनगर, नाशिक येथे आयोजित या बहुउद्देशीय कार्यक्रमात १०० हून अधिक स्पर्धकांनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. यामुळे प्रेक्षक आणि क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाची नवचेतना निर्माण झाली.             आजच्या काळात देशातील युवा—विशेषतः लहान मुले—मोबाइल फोन आणि ऑनलाईन गेमिंगकडे आकर्षित होत असल्याने त्यांच्या शारीरिक खेळांकडे असलेल्या ओढीत घट होत आहे. अशा परिस्थितीत, ‘राडा’ सारख्या रोमांचक क्रीडा स्पर्धांनी युवांमध्ये नवऊर्जा आणि जोश निर्माण केला. हा कार्यक्रम केवळ स्पर्धा न ठरता, तरुणांना आभासी जगातून बाहेर पडून घाम गाळण्यास, स्वतःमधील प्रतिभेला उजाळा देण्यास आणि तिला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यास प्रेरक ठरला.       ...

नासिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन ! नवीन इमारत कशी असेल याची चित्रफीत !

इमेज
नासिक::- जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी दि.१३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांना निमंत्रणे देण्यात येत आहेत. 

कृषीथॉन प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार जाहिर

इमेज
कृषीथॉन प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार जाहिर     नाशिक : युवकांचा शेतीतील सहभाग या विषयाला अनुसरून 'ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन' व  मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि' यांच्या संयुक्त विद्यमाने सन १९९८ पासून ‘कृषीथॉन’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाच्या १८ व्या आवृत्तीचे आयोजन दिनांक १३ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान करण्यात येत आहे.  युवकांचा कृषीक्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी संशोधन या क्षेत्रात केलेल्या विशेष वाटचालीची दखल घेऊन ‘प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार’ देऊन सन्मानित करणार आहोत. प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कारासाठी डॉ. अरुण दत्तात्रय भगत {पुणे}, कानिफनाथ अण्णासाहेब बुरगुटे {उपले दुमाला, सोलापूर}, डॉ. सुचिता संजय भोसले {सातारा}, मुजम्मिल बेपारी {कोल्हापूर}, डॉ. श्रीधर निवास बन्ने {तासगाव, सांगली}, डॉ. वैभवकुमार भगवानराव शिंदे {अकोला}, अभिषेक दिनकर दातीर {गणोरे, अहिल्यानगर}, डॉ. अमोल सुखदेव घाडगे {मुरडपु, बुलढाणा}, डॉ. महेश अप्पासाहेब आजबे {गांधेली, छत्रपती संभाजीवनगर }, श...