पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटना. 'ग्रेट व्हाइट पेलिकन (रोजी पेलिकनचे) नांदूर मध्यमेश्वरमध्ये आगमन !

इमेज
'ग्रेट व्हाइट पेलिकन (रोजी पेलिकनचे) नांदूर मध्यमेश्वरमध्ये आगमन: महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटना        नाशिक::- जिल्ह्यातील निफाड तालुक्यातिल, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य सध्या एका दुर्मिळ पक्षी दर्शनामुळे चर्चेत आले आहे. आपल्या परतीच्या प्रवासात (Return Migration) असलेल्या 'ग्रेट व्हाईट पेलिकन' किंवा 'रोजी पेलिकन' या पक्ष्यांचे दर्शन पहिल्यांदा झाले आहे.          नांदूर मध्यमेश्वरच्या नोंदींनुसार, यापूर्वी हा पक्षी २००४-०५ मधे बघितला गेला होता त्यानंतर बऱ्याच वर्षापासून दिसलेला नाही, किंबहुना महाराष्ट्रात देखील अतिशय दुर्मीळ अशा या पक्ष्यांचे दर्शन झाल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणने आहे . आज २८ मार्च २०२६ ला या राजबिंड्या पक्ष्यांनी अधिकृतपणे हजेरी लावल्याने निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासात त्यांनी या रामसर स्थळाची निवड करणे, हे या परिसंस्थेच्या आरोग्याचे शुभसंकेत मानले जात आहेत. 'रोजी पेलिकन' का म्हणतात? या पक्ष्याला 'ग्रेट व्हाईट पेलिकन' असे नाव असले तरी, विणीच्या हंगामात किं...

बालकांमधील ऍडेनॉईड व टॉन्सिल समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक — डॉ. पंकज भट

इमेज
जागतिक श्रवण दिनानिमित्त बालकांमधील ऍडेनॉईड व टॉन्सिल समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक — डॉ. पंकज भट नाशिक ::- ३ मार्च रोजी साजरा झालेल्या जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने बालकांमधील ऍडेनॉईड हायपरट्रॉफी आणि टॉन्सिलायटिस या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या समस्यांबाबत पालकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पंकज भट यांनी केले आहे. या आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार न केल्यास मुलांच्या श्रवणशक्तीवर, श्वसनावर तसेच एकूण आरोग्य व विकासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.        डॉ. भट यांनी सांगितले की, ऍडेनॉईड हायपरट्रॉफी म्हणजे नाकाच्या मागील भागातील ग्रंथींची असामान्य वाढ होणे, तर टॉन्सिलायटिस म्हणजे घशातील टॉन्सिलला सूज आणि संसर्ग होणे. हे दोन्ही आजार विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. तोंडाने श्वास घेणे, झोपताना घोरणे (स्नोरिंग), वारंवार घसा दुखणे, ताप येणे, सतत सर्दी-खोकला होणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. अनेक वेळा मुले झोपताना किंवा खेळताना तोंड उघडे ठेवून श्वास घेताना ...

शहरातील बड्या विकासकाने जमीन हडप केल्याचा सुनिता दोंदे यांचा आरोप, न्याय न मिळाल्यास दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा !

इमेज
शहरातील बड्या विकासकाने जमीन हडप केल्याचा सुनिता दोंदे यांचा आरोप,  न्याय न मिळाल्यास दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा !              नाशिक::- सातपूर च्या अशोकनगर भागातील गट क्र. ४९२ व ४९३ संदर्भातील कथित जमीन हडप प्रकरणात न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदार सुनिता प्रभाकर दोंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी महसूल प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.        या संदर्भात दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी तसेच यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दिल्याचे त्यांनी  सांगितले. जितेंद्र मनोहरदास ठक्कर, शामसुंदर रामकिसन लाहोटी, लिलाबाई शामसुंदर लाहोटी, सोनल कपिल लाहोटी, कपिल शामसुंदर लाहोटी व इतर अनोळखी व्यक्तींनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून सन १९८० मध्ये फेरफार नोंद क्रमांक २९३५ व २९३६ द्वारे महसूल अभिलेख ७/१२ मध्ये बेकायदेशीररीत्या नावे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   ...

राज्यातील ३७ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर ! मुंबईच्या रोहिणी पराडकर तसेच नाशिकच्या डॉ. नाझिया सय्यद व पूजा पवार यांनाही पुरस्कार जाहीर !

इमेज
राज्यातील ३७ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर !  मुंबईच्या रोहिणी पराडकर तसेच नाशिकच्या डॉ. नाझिया सय्यद व पूजा पवार यांनाही पुरस्कार जाहीर ! नासिक (वार्ताहर)::-  शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन आणि यशिता गार्डन नर्सरी  यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.  राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतरांना व्हावी, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  राज्यातील ३७ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये : डॉ. नाझिया माजिद सय्यद (नाशिक); वनश्री साहेबराव महालकर (यवतमाळ); ताई सुरेश लांडे (धाराशीव); सौ. रोहिणी अमोल पराडकर (मुंबई); वंदना सालवटकर (वर्धा); संगीता तुळशीराम पवार (मुंबई); सुरेखा तात्याबा चौरे (सोलापूर); सरला शामराव कामे (छत्...

सबलांना मानाचा सलाम ! आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्राध्यापक विजय कोष्टी यांचा लेख

इमेज
सबलांना मानाचा सलाम ! रविवार ,  ८ मार्च रोजी जगभरात  आंतरराष्ट्रीय महिला दिन  साजरा होत आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव ,  त्यांच्या हक्कांची जाणीव आणि लैंगिक समानतेसाठी ठोस कृतीचा संकल्प - या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा दिवस यंदा  ‘ मिळवण्यासाठी द्या’ (‘ Give To Gain ” ’)या आशयघन विषयावर साजरा होत आहे. या थीमचा अर्थ अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे   देण्यातूनच खऱ्या अर्थाने प्राप्ती होते .  समाजाने जर महिलांना शिक्षण ,  संधी ,  सुरक्षितता आणि सन्मान दिला ,  तर त्या बदल्यात समाजाला मिळते - प्रगती ,  समृद्धी ,  स्थैर्य आणि संवेदनशील नेतृत्व.  ‘ मिळवण्यासाठी द्या’ हा संदेश केवळ महिलांसाठी नसून संपूर्ण समाजासाठी आहे.मुलींना दर्जेदार शिक्षण द्या-राष्ट्राला सक्षम नागरिक मिळतील.महिलांना निर्णयप्रक्रियेत स्थान द्या - धोरणे अधिक समतोल आणि सर्वसमावेशक होतील.समान वेतन आणि समान संधी द्या - अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल.इतिहास साक्षी आहे की जेव्हा स्त्रियांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक दिले आहे. मग ते रणांगण असो ,...

स्री कालची आणि आजची ! महिला दिनानिमित्त विजय सातपुते यांचा लेख

इमेज
स्त्री कालची आणि आजची                 रामायण  आणि महाभारत  ही आपली महाकाव्ये.  या दोन पौराणिक कथानकातून स्त्री ची विविध रूपे समोर आली.  अहिल्या,  द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या लेखक स्त्रिया महान पतिव्रता म्हणून जनमानसात रूजल्या गेल्या.  यांचे केवळ स्मरण केल्याने महापातकांचा नाश होतो  असे संस्कार या काळात केले गेले.           संत वाङमय,  पंत वाड़मय आणि शाहिरी फड यातून वर्णिलेली स्त्री लोकसाहित्याचा विशेष भाग ठरली. जनमानसात खोलवर रूजलेली ही स्त्री,  समस्त नारीशक्ती समाजाशी संवाद साधत गेली. माया, ममता  आणि करूणा या भावनांच्या मुशीतून घडलेली ही स्त्री  त्याग, समर्पण  आणि विश्वास या  त्रिसूत्रीतून स्वतःला, कुटुंबाला,  समाजाला घडवीत गेली.             पौराणिक  काळातील स्त्री पातिव्रत्य, हे अस्त्र समजून स्वसंरक्षण करीत गेली. सत्यवती, माद्री,कुंती गांधारी, सुनिती ,सुरूची , आदिती,  छाया, अनुसया,  ...