परळी-वैजनाथ येथील राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशुपक्षी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीला वेग !
परळी-वैजनाथ येथील राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशुपक्षी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीला वेग ! पुणे::- बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे दि. ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशुपक्षी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव मा. डॉ. रामास्वामी एन. यांनी परळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन नियोजित प्रदर्शनाच्या जागेची पाहणी केली आणि तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रदर्शनाचे नियोजन उत्कृष्ट दर्जाचे असावे, अशा सूचना देत आवश्यक मार्गदर्शन केले. पाहणी दरम्यान डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रदर्शनासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची उपयुक्तता, पशुपक्ष्यांच्या राहण्याची सोय, येणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या सुविधा आणि प्रदर्शनाचे तांत्रिक नियोजन यावर सविस्तर चर्चा केली. हे प्रदर्शन राष्ट्रीय स्तरावरचे असल्याने यामध्ये विविध राज्यांतील उत्कृष्ट पशू आणि पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील. बीड जिल्ह्यासह संपूर्ण म...