पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद

इमेज
पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद नाशिक : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सायंकाळी  दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या गावातील साबळे कुटुंबाच्या घरी नागलीची भाकरी, उडीदाचे वरण आणि हरभऱ्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. राज्याच्या प्रथम नागरिकाने आपल्या घरी भोजनाचा आस्वाद घेतल्याने साबळे कुटुंबीय भारावले होते.            हिरामण शंकर साबळे यांचे गावात साधे घर आहे. त्यांच्या घरी राज्यपाल महोदय जेवणाला येणार, अशी माहिती मिळताच त्यांनी तयारी सुरू केली. घराला रंग रंगोटी केली. प्रवेशद्वाराच्या भिंती वारली चित्रकलेने साकारली होती. साबळे कुटुंबातील गोजरताईने राज्यपालासांसाठी लाल, पांढरी नागली आणि बाजरीच्या भाकरी, अळू आणि वर्कण कंदाची भाजी, हरभराची भाजी, उडीदाचे वरण तयार केले होते. राज्यपाल श्री. देवव्रत यांच्यासमवेत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे यांच्यासह साबळे कुटुंबातील सदस्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांनी स्थानिक पिके, जीवनमान या विषयी माहिती घेतली....

नैसर्गिक शेती काळाची गरज-राज्यपाल आचार्य देवव्रत, खते, कीटकनाशकांचे अंश अन्नधान्यात आढळून येत आहेत. या अन्नधान्यामुळे मानवी प्रतिकार क्षमता कमी होऊन दुर्धर आजाराचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. जमिनीची जलसंधारणाची क्षमताही कमी झाली आहे.

इमेज
नैसर्गिक शेती काळाची गरज-राज्यपाल आचार्य देवव्रत सह्याद्री फार्म येथे शेतकरी, कृषी सखींसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी साधला संवाद           नाशिक : रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अती वापराने देशातील सुपीक जमीन नापीक केली आहे. नापीक जमीन सुपीक बनवून  आत्मनिर्भर भारत करण्यासाठी नैसर्गिक शेती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.            दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे आयोजित नैसर्गिक शेती संवादात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,  पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,  विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते.            राज्यपाल म्हणून नव्हे, तर श...