थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२५–२६ जाहीर !

थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२५–२६ जाहीर !

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी ३ जानेवारी रोजी महिला शिक्षिकांना दिला जाणारा थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार सन २०२५–२६ साठी जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शिक्षिकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.
सन २०२५–२६ करिता जिल्ह्यातील सर्व गटांतून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत गट बदल करून सखोल पडताळणी व गुणांकन प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षिकांचे वर्गस्तरीय अध्यापन कार्य, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न, सहशालेय उपक्रम, सामाजिक व शैक्षणिक योगदान या विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले.
पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांमधून शासनाने ठरवून दिलेल्या किमान अटी व शर्ती तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शिक्षिकांमधून एकूण १५ गुणवंत शिक्षिकांची निवड करण्यात आली. ही निवड अध्यक्ष, जिल्हा गुणवंत शिक्षिका पुरस्कार निवड समिती तथा प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत अंतिम करण्यात आली. निवड झालेल्या सर्व गुणवंत शिक्षिकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
सन २०२५–२६ साठी थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिक्षिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

सुरगाणा – श्रीमती रेशमा भिकाजी गायकवाड, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, हिरीडपाडा;
देवळा – श्रीमती प्रतिभा शिवमन पाटील, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, विजयनगर;
कळवण – श्रीमती दिपाली कारभारी आहेर, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, दहयाणे (ओ);
बागलाण – श्रीमती योगिता यादव देवरे, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, दहिंदुले;
नांदगाव – श्रीमती श्यामल शिवानंद सूर्यवंशी, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, बोलठाण;
चांदवड – श्रीमती भारती गुलाबराव अहिरे, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, वाळकेवाडी;
पेठ – श्रीमती अनिता देविदास इंपाळ, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, अंधुटे;
मालेगाव – श्रीमती मिना निंबा देवरे, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, सौंदाणे नं. १;
त्र्यंबकेश्वर – श्रीमती दिपाली रामराव मोरे, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, तळवाडे;
सिन्नर – श्रीमती वैशाली मंच्छींद्र सायाळेकर, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, मुसळगाव;
नाशिक – श्रीमती सुनिता राजेश निकुंभ, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, गंगाम्हाळुंगी;
दिंडोरी – श्रीमती दिपाली बबनराव थोरात, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, नळवाडपाडा;
इगतपुरी – श्रीमती सुशिला मधुकर चोथवे, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, घोरपडेवाडी;
निफाड – श्रीमती बबीता साहेबराव गांगुर्डे, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, ओझर टाऊनशिप;
येवला -  शारदा लक्ष्मण अहिरे, प्रा.शि., जि.प. प्राथमिक शाळा, महादेववाडी (सायगाव).
पुरस्कारप्राप्त गुणवंत शिक्षिकांचा सन्मान करणारा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असून, याबाबतची माहिती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जि. प. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेला वेग; आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन, आतापर्यंत एकूण २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई

पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद

परळी-वैजनाथ येथील राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशुपक्षी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीला वेग !