अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांची जिल्हापरिषदेला भेट ! जलजीवन मिशनचा घेतला आढावा ! महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणे हे प्रमुख ध्येय ठेवुन जलजीवन मिशन योजना जिल्हयात राबविण्यात येत आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
नाशिक – राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी आज जिल्हा परिषदेला भेट देऊन जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांकडील पाणी पुरवठयाच्या नमुना नंबर ९ नुसार नळ कनेक्शनची स्वत: शासन संकेतस्थळावर पडताळणी केली. स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत नाशिक पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मित्रा या प्रशिक्षण केंद्रात केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सचिव अरुण बरोका यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले हेाते. या बैठकीसाठी आलेल्या डॉ. संजय चहांदे यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान टप्पा-२ अभियानाचा आढावा घेतला. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यामध्ये घरोघरी नळजोडणी करण्यात येत आहे. या कामाबाबत त्यांनी आढावा घेत ऑनलाईन करण्यात आलेल्या माहितीची ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर ९ नुसार पडताळणी केली. यावेळी यादृच्छिक पध्दतीने जिल्हयातील १० ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेत बोलावून नमुना नंबर ९ वरील नळकनेक्शन धारकांच्या नोंदी व केंद्र शासनाच्या