आजचा न्यूज मसाला अंक ! संपादकीय- छत्रपतींच्या घराण्यात कोल्हापूर-सातारा न पेटलेला वाद पेटविल्याचा आव आणणाऱ्या औलादींना छत्रपती संभाजीराजे यांनी नासिक दौऱ्यात चांगलीच चपराक लगावली !! इतर बातम्यांसह वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क-7387333801. बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव साप्ताहिक !!!!!

संपादकीय

छत्रपतींच्या घराण्यात ( कोल्हापूर-सातारा )  न पेटलेला वाद पेटविल्याचा आव आणणाऱ्या औलादींना छत्रपती संभाजीराजे यांनी नासिक दौऱ्यात चांगलीच चपराक लगावली, छत्रपती उदयनराजे यांचे भाचे अर्थातच छत्रपती संभाजीराजे यांचे ही भाचे यांची झालेली भेट व दिवसभर एकत्र, एकाच वाहनातून मामा-भाचे यांचा एकमेकांस लाभलेला सहवास !
           तोडा फोडा आणि राज्य करा या इंग्रजाळलेल्या नीतीचा भारतीय लोकशाहीत वारेमाप वापर केला गेला आहे, भारतीय राजकारणाला लाभलेला मोठा शाप आहे मात्र छत्रपती घराणे या शापाला कालच्या भेटीने अपवाद ठरले व ते आजतागायत गेली साडेचारशे वर्षे टिकून आहे, छत्रपतींच्या दरबारात ही इंग्रजांना नतमस्तक व्हावे लागले, इतिहास साक्षीला असलेल्या छत्रपतींना जगाचे, रयतेचे एकमेव राजा बिरूद लागले त्याला जगात तोड नाही तेथे काही बुजगावणे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची अवकाद न बोलता दाखविण्याची धमक आजही छत्रपतींमधील प्रगल्भतेच्या माध्यमातून समाजाला दिसली,  दाखवून दिली.
        छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले यांचे कार्यक्षेत्र वेगळं आहे मात्र मर्यादीत नाही,  हे न समजल्यामुळे काही उपटसुंभ छत्रपतींच्या आम्ही खूप जवळचे आहोत, त्यांच्या अवतीभोवती कोंडाळे करून विनाकारण आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडताना दिसतात, त्यांना छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या व सामाजिक चालीची, ज्ञानाची व राजघराण्यातील परंपरांची जाण नसावी ही शोकांतिकाच म्हणावी.
      कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या वाया गेलास तू, या गाण्याप्रमाणे अनेकांची गत झाली आहे, होत आहे, होणार आहे परंतु डोळ्यांवर झापड लावलेल्या व कुणी यांतून तावूनसुलाखून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करत असेल त्याच्याच पाठीत खंजीर खुपसत असतील त्यांचे भवितव्य काय ? छत्रपतींचा विषय व त्यावर भाष्य करण्याचा आमचाही मनोदय आजतरी नव्हता पण "चांडाळ चौकडी" च्या मनसुब्यांना कुठेतरी मुरड घातली जावी, साध्या नगरसेवक पदाचा राजकारणी आज लोकशाहीचा अभ्यास करून असल्या गिधाड वृत्तीला सहज उचलून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो, हे न समजण्याइतकी दुधखुळी स्वयंभू "नेते" मंडळीला माहीत नसावे,  हे स्वार्थाने बरबटलेल्या " स्वयंभू नेत्यांना"  कसं समजवणार ! मी याचा उजवा-डावा, माझ्याशिवाय आहेच कोण यांना अशा आविर्भावात जगणारे बेडकं फुगुन फुगुन किती फुगणार ? समोरच्यावर तोंडसुख घेता येते याचा अर्थ आपल्याला संबंधित विषयातील सखोल ज्ञान आहे ?  असा गैरसमज फक्त स्वत: पुरता मर्यादित असतो, जग खूप हुशार आहे, बोलबच्चनपणा जनता खूप काळ स्विकारत नाही, नियतीला ही हे अमान्य असते, कुठे केव्हा कोणत्या प्रकरणात गुंतवून ठेवेल हे सांगता येत नाही ! तलवार सदा डोक्यावर टांगलेली असते, सुटायची वेळ बघत बसायचे नसते, सुटली की संपले ! राजकारणाचा सारीपाट चाणाक्ष व हुशारीने खेळायचा असतो, साम-दाम-दंड नीती काळानुरुप मागे पडत चालली आहे, कदाचित उद्या सुशांतसिंग ही स्वर्गातून हसल्यास आश्र्चर्य वाटायला नको ! वेळ सावरण्याची आहे, आमच्यासारखे सांगणारे ही आहेत, संधीचे सोने करा, लोखंड व्हायला वेळ लागणार नाही, छत्रपतींचा, छत्रपतींच्या घराण्याचा मानमरातब तसाच ठेवा, फूट पाडायला जाल त्यात केव्हा पाय घसरून पडाल हे सांगता येणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक