दि. १७ डिसेंबर २०२० चा अंक ! संपादकीय- बातमीत संस्कार ओतने काळाची गरज !! सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!






संपादकीय-

बातमीत संस्कार ओतने काळाची गरज !

पीतपत्रकारितेचा शिरकाव हा पत्रकारिता क्षेत्राला भविष्यात मोठा अडसर ठरेल काय ? या विषयावर अनेक दिग्गज पत्रकारांनी, संघटनांच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले असून ठोस निर्णयापर्यंत कसे पोहचावे ही द्विधा मनस्थिती अनेक पत्रकारांसाठी डोकेदुखी ठरू पहात आहे.
पत्रकारिता क्षेत्रात करीअर करायचे असल्यास कमीतकमी १२ वी पर्यंत चे शिक्षण असावे असे माहीती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने सांगितले जाते किंवा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असावा परंतु माध्यम मालक, संपादक यांच्या कडून सर्रास दहावी किंवा विना शिक्षणाची अट काय दर्शविते हा संशोधनाचा विषय आहे.
      पत्रकारितेत अशा व्यक्तिंचा शिरकाव होत असेल तर याबाबत  माध्यम मालक-संपादक यांनीच निर्णय घ्यावा, निर्णय योग्य की अयोग्य याचा उहापोह या लेखातून करायचा नाही मात्र बातम्यांचा सामाजिक जीवनावर काय परिणाम होतो हे तरी लक्षात  घ्यायला हवे.
      मध्यंतरीच्या काळातील एक बातमी "बापाचा मुलीवर बलात्कार !", या बातमीला कुणी आक्षेप घ्यावा असे प्रथमदर्शनी मुळीच वाटत नाही परंतू ग्रामीण भारतातील अनेक स्त्रिया नवऱ्याला "अहो", "जी", असं संबोधतात तर परपुरूषाला "बाप्या", किंवा "बापया", म्हणतात, ते ही पदराआडून, आणि याचा अर्थ न समजून घेता समोरच्या स्त्रीकडून माहिती घेणाऱ्या पत्रकाराला जी माहिती मिळते ती "मुलीवर बाप्यानं बलात्कार केला", याचा अर्थ परपुरुषाने असा न घेता "बापाचा" असा शब्दप्रयोग करून तयार केलेल्या बातमीचा समाजातील घटकांवर काय प्रभाव पडेल ?
     पत्रकारितेला संस्कारांची जोड देणे आवश्यक आहे, गेल्या आठवड्यात आलेली बातमी "सासऱ्याने केलं सुनेशी लग्न"
कदाचित सासऱ्याची बाजू तत्कालीन परीस्थितीत योग्य असेल पण पत्रकारिता सर्वसमावेशक समाजासाठी करताना समाजाला प्रथम गृहीत धरणे हे पत्रकाराचे आद्य कर्तव्य का विसरले जाते ?
      बातमी दाबणे याला पीतपत्रकारिता म्हणता येईल पण बातमी प्रकाशित करणे वा न करणे हे संपादकांच्या हातात आहे, तो त्यांचा अधिकार आहे हे नाकारून चालणार नाही, अधिकाराचा वापर करून जर बातमी प्रकाशित करण्यात येत नसेल तर सामाजिक भान ठेवून वरील प्रकारच्या बातम्या का प्रकाशित कराव्यात ? समाजमन बातमीने ढवळून निघत असेल तर ते समाजाच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठीच निघावे !
        प्रत्येक बातमीत संस्कार ओतले तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आणखी भक्कम होईल परंतु दुर्दैवाने म्हणा किंवा पीतपत्रकारीतेत डुबलेल्यांच्या विचारांच्या संस्काराला आज तरी कुणी प्रखरपणे आक्षेप नोंदवत नाही !
      अशा पीतपत्रकारितेच्या महाशयांनी राजकारण्यांना कधीतरी विचारावे !
"विरोधकांना नागडं करू",
" योग्य वेळी बोलू",
"सत्ताधाऱ्यांचा माज उतरवू",
अशी अनेक वाक्य वापरली जात असतात यांवर, विचारा, याचा अर्थ काय ?  कधी करणार ? कधी बोलणार ? कसा उतरविणार ?
कुणी विचारायला जात नाही मग संस्काराहीन बातम्या पसरविणे कितपत योग्य आहे ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!