संपूर्ण जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार- अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आज झालेल्या शिबिरात रक्तदान करून महीला वर्गापुढे एक आदर्श निर्माण केला ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!


जिल्हा परिषदेत रक्तदान शिबीर

संपूर्ण जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबवली जाणार मोहीम

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही केले रक्तदान

नाशिक : जिल्हा परिषदेतर्फे मंगळवार दि. १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर या काळात टप्प्या-टप्प्याने रक्तदान शिबीर घेण्याचा मनोदय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केला होता. या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात दिनांक १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद, नाशिक व जिल्हा शासकीय रुग्णालयाची शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी स्वतःहुन पुढे येत रक्तदान केले. यामुळे जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनी देखील हिरहिरीने या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी रक्तदान करुन उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना रक्तदान करण्याची प्रेरणा दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व अतिरिक्त मुख्य कार्यकारी रवींद्र शिंदे यांना रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन विशेष अभिनंदन केले. रक्तदान करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, मुख्य लेख व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी यावेळी प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती दिली, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने पत्रक काढून आवाहन केल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद या शिबिरास मिळाला, यावेळी  जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) आनंद पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर,, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामीण पाणी पुरवठा) ईशादिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे (महिला व बालकल्याण), जिल्हा संदर्भ रुग्णालयाचे डॉ. पुरी, डॉ. दिनेश पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, महेंद्र पवार, डॉ. भगवान पाटील, जी. पी. खैरनार, मधुकर आढाव, विजय देवरे, विजयकुमार हळदे, उत्तम चौरे, रणजित पगारे, निवृत्ती बगड, रावसाहेब पाटील, बाळासाहेब कोठुळे, ज्ञानेश्वर गायकवाड यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव