पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत – बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद. निधी तत्काळ ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करून जनहिताचे कामे विहित मुदतीत करणार- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नासिक. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत –  बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक
        नाशिक (नरेंद्र पाटील)::- जिल्हा परिषदेस पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत निधी प्राप्त झाालेला आाहे. प्राप्त निधीतुन ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषद १० टक्के व पंचायत समित्यांना १० टक्के निधी वितरीत करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून पहिल्या हप्त्यापोटी रुपये ८२ कोटी ४ लाख ३७ हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. नाशिक जिल्हयातील १३८५ ग्रामपंचायतींना शासन निर्देशानुसार रुपये ६५ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कृती आराखड्यातील मंजुर असलेली विकास कामे सुरु करण्यास विलंब होत होता. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यानूसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना महाराष्ट शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेस पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत प्राप्त निधी ग्रामपंचायतींना वितरीत करण्यासाठी नाशिक जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतींचे वेगळे बँक खाते ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करुन प्रत्येक ग्रामपंचायतीस त्यांच्या हिशाचा पहिल्या हप्त्याचा निधी वितरण करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांनी दिली.
-----------------------------------------------
जिल्हयात कोवीड-१९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर, गावातील सध्याच्या परिस्थतीचे विश्‍लेषण करुन गावाच्या गरजा ओळखून कामे घेण्याबाबत ग्रामपंचायतींनी कामे सुचवाची.  ग्रामविकासाची मंजुर कृती आराखड्यातील अत्यावश्यक कामे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घेण्यात येऊन निधी विहित वेळेत खर्च करण्याची कार्यवाही करण्यात यावी. पंचायत समिती स्तरावर व जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त निधीतुन शासनाच्या निधी खर्चाच्या  मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्यानंतर निधी वितरण व विकास कामे हाती घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
                     बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, अध्यक्ष,जिल्हा परिषद,नाशिक
-----------------------------------------------
जिल्हा परिषद स्तरावर पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत वेळोवेळी प्राप्त होणारा निधी तात्काळ ग्रामपंचायत स्तरावर वितरीत केला जाईल. वितरीत करण्यात आलेला निधी खर्चाबाबत नियोजन करुन जनहिताची कामे सदर निधीतुन विहीत वेळेत होतील याबाबत गटविकास अधिकारी यांनी सनियंत्रण करावे.   
                      
                       लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ! आषाढी स्पेशल- कवयित्री प्रतिभा खैरनार यांची "भक्तीची वारी !