प्रशासनाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! वैद्यकीय खर्चाचे बील मंजूर करून देण्यासाठी मागीतली लाच !
तक्रारदार यांच्याअपघाताचे वैद्यकीय बील मंजूर करून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजना, प्रशासन अधिकारी यांना, आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी लाचलुचपत विभाग, नवी मुंबई कडून लाच स्विकारतांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. *सापळा कारवाई* ▶ युनिट - *नवी मुंबई* ▶ तक्रारदार-पुरूष वय 27 वर्ष ▶ आरोपी- सुनिता दत्ताञय घोडिंदे (माहेरचे नाव) असुन सुनिता दयानंद झेमसे (सासरचेनाव) , वय 52 वर्ष, नोकरी- प्रशासन अधिकारी, राज्य कामगार विमा योजना, वाशी नवी मुंबई. ▶ लाचेची मागणी - 3000 /- ▶ लाच स्विकारली - 3000/- ▶ हस्तगत रक्कम -3000/- रु ▶ लाचेची मागणी - ता. 31/03/2018 ▶ लाच स्विकारली ता. 31/03/2018 रोजी 18:38 वाजता. ▶ लाचेचे कारण -. तक्रारदार यांच्या आपघाताच्या वैद्यकिय खर्चाचे बील मंजूर करून देण्यासाठी यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 3०००/- रु लाचेची मागणी करून 3०००/- रु लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.