पोस्ट्स

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
माजी आमदार रामदास चारोस्कर शिवसेनेच्या संपर्कात या एका बातमीचा परीणाम नासिक लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवर होऊ शकतो, दिंडोरीचे खासदार हरीश्चंद्र चव्हाणांचे नांव जाहीर होत नाही व डाँ भारती पवारांची भाजपाशी होत असलेली बोलणी कितपत उमेदवारी मिळविण्यात यश मिळवेल ? शिवसेनेचे धनराज महालेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारीही पदरात पाडून घेतल्याने नासिक व दिंडोरीतील सर्वच समीकरणे बदलू लागली आहेत. भाजपा शिवसेनेचे जागावाटप निश्चित झाले मात्र नासिक व दिंडोरीचे उमेदवार जाहीर होत नाहीत. राज्यात काल झालेल्या घडामोडींनुसार भाजपा व शिवसेना काही जागांची अदलाबदल करू शकते या विधानाला पुष्टी दिल्यास, नासिक लोकसभा मतदार संघातून पालकमंत्र्यांच्या व्युहरचनेचा हा भाग समजून माणिक कोकाटे हे उमेदवार ठरण्याची शक्यता आहे, तसे झाले तर दिंडोरीतील हरीश्चंद्र चव्हाणांऐवजी शिवसेनेकडून रामदास चारोस्कर उमेदवारी करतील व डाँ भारती पवार यांचा भाजपा प्रवेश केला काय अन् नाही केला तरी फारसा फरक पडणार नाही असे गणित मांडले जाऊ शकते, मुळात राष्ट्रवादीने त्यांच्यावर अन्याय केला आहे या सुडाच्या भावनेने त्या पक्

देशातील कोणत्याही भागात महीलांना समाजात वावरताना प्रतिष्ठा व सुरक्षितता मिळावी -पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले ! महिलांना बाई म्हणून नव्हे तर स्वकर्तुत्वावर मान व हक्क मिळाला पाहिजे- शीतल करदेकर !! नॅशनल युनियन आॅफ जर्नेलिस्ट तर्फे कार्यक्षम महीलांचा सत्कार करण्यात आला याबाबत सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट तर्फे समाजातील कार्यक्षम महिलांचा सत्कार नाशिक :स्त्री आणि पुरुष ही समाज रथाची दोन चाकं असून त्यापैकी कोणतेही चाक लहान किंवा मोठे नाही समाजनिर्मितीसाठी हा समाजरथ वेगाने चालला पाहिजे म्हणून निसर्गाने त्या दोन्हीची निर्मिती केली आहे मात्र समाजात स्त्रीला कमी दर्जाचे स्थान दिले तर समाजरथाचा वेग मंदावेल, केवळ जागतिक महिला दिनी आठ मार्चला वर्षाचे ३६५ दिवस समाजात महिलांना प्रतिष्ठा आणि सुरक्षितता मिळाली पाहिजे. देशातील सर्व भागात वर्षभर कोणत्याही वेळी महिला समाजात प्रतिष्ठेने सुरक्षित वावरू शकल्या पाहिजेत तर प्रत्येक दिवस हा महिला दिन असेल ८ मार्च चा वेगळा महिला दिन साजरा करण्याची गरज पडणार नाही असे प्रतिपादन नाशिकच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी केले. नाशिक शाखेतर्फे व बेटी फाउंडेशन तर्फे आयोजित समाजातील सक्षम महिलांचा सत्कार श्रीमती चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र अध्यक्ष श्रीमती वैशाली आहेर दैनिक नवशक्ती वरिष्ठ पत्रकार दी

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडून सर्वोच्च न्यायालय व शासन आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप ! बोगस डॉक्टर शोध मोहीमेचा होतोय विपर्यास !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक-  केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालया तर्फे इलेक्ट्रोहोमिओपॅथी (बीईएमएस)  चिकीत्सा पद्धतीस मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु असून, याबाबतचे विधेयक संसदेच्या उंबरठ्यावर असताना  जिल्हा आरोग्य विभागामार्फत बोगस डॉक्टर्स शोध मोहिमेच्या नावाखाली इलेक्ट्रोहोमिओपॅथी डॉक्टर्सना वेठीस धरण्यात येत असून , हा त्यांच्यावर सरळ सरळ अन्याय असल्याचे मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी च्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा  आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेला निवेदनात म्हटले आहे.    नाशिक येथे बोगस डॉक्टर शोध मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चौकशी व कारवाईबाबत इलेक्ट्रोहोमिओपॅथी  चिकित्सकांच्या बाबतीत चुकीची व विसंगत माहिती प्रशासनाने दिल्यामुळे कारवाईचे  संकेत मिळाल्या नंतर  मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ सतीश जगदाळे यांच्या उपस्थितीत असोसिएशनची बैठक घेण्यात आली .यावेळी डॉ जगदाळे म्हणाले कि,  उच्च न्यायालय , सर्वोच्च न्यायालय , आरोग्य मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकीत्सा पद्धतीमध्ये व्यवसाय करणाऱ्या चिकीत्सकाना मान्यता दिली  असताना  जिल्हा प

वरिष्ठांचे आदेश न पाळणाऱ्या आणखी एका ग्रामसेवकाचे झाले निलंबन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    दिंडोरी तालुक्यातील पुन्हा एका ग्रामसेवकाचे निलंबन ! वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर का केली जाते? याचे परिक्षण केल्यास फक्त ग्रामसेवक जबाबदार असेल की आणखी कुणी ! दप्तर दिरंगाई वा तपासणीस उपलब्ध न करून देणे यांत भ्रष्टाचाराला वाव असल्याच्या चर्चेने दिंडोरी तालुक्यात बोलले जात असुन ग्रामसेवक हा जबाबदार  प्रशासनाचा प्रतिनीधी असतो म्हणून कारवाई तेथपर्यंत येऊन थांबते मात्र पडद्यामागील अशासकीय सूत्रधारांचे काय असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे ! ============================= नाशिक – ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रमुख म्हणून काम करताना कर्तव्यात कसुन केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील राशेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या निर्देशानंतर दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांनी ही कार्यवाही केली. दिंडोरी तालुक्यातील राशेगाव ग्रामपंचायतीत प्रकाश गावित हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. मात्र प्रशासकीय काम करीत असताना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नोंदवहया व

नासिक च्या होतकरू उद्योजकांना बिल्डींग सस्टेनेबल एन्टरप्रायजेस उपक्रमांतर्गत मार्गदर्शनाची संधी ! ६ एप्रिल रोजी , नाशिक आंत्रप्रिनर फोरम चा उपक्रम !! बातमीत खाली दिलेल्या लिंकवर अथवा भ्रमणध्वनी वर नोंदणी करा !!! सविस्तर माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नाशिक: नाशिक येथील होतकरु उद्योजकांना यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळून नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण उद्योग सुरु व्हावेत, तसेच नवीन उद्योजक उदयास यावेत म्हणून गत १० वर्षांपासून नाशिक आंत्रप्रिनर फोरम " बिल्डींग सस्टेनेबल एन्टरप्रायजेस " हा उपक्रम राबवत असून, यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम दि. ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संजय लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर वार्षिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष संजय लोढा, हर्षद मेहता आणि अजय बोहोरा यांच्या कडून करण्यात येणार आहे. नाशिक आंत्रप्रिनर फोरमने गेली अनेक वर्षे बिल्डींग सस्टेनेबल एंटरप्राइजेस हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला असून त्याचा फायदा नाशिक मधील होतकरू तरुण उद्योजक घेत आहेत. या उपक्रमातून प्रेरणा घेत अनेकांनी आपले उद्योग उभे केले असून यशस्वीरीत्या चालवत आहेत. या पुढेही अनेक चांगले उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून नाशिक आंत्रप्रिनर फोरम प्रयत्नशील असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘बिल्डींग सस्टेनेबल एंटरप्राइजेस’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे हे सलग १० वे वर्ष आहे

कनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
       नाशिक – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या कार्यालयाकडे येणा-या प्रथम प्राधान्याच्या संदर्भांवर सात दिवसाच्या आत कार्यवाही न करणा-या जिल्हा परिषदेच्या ७ विभागातील कनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.        मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तसेच कार्यालयाकडे विविध प्रकारचे अर्ज तसेच तक्रारी प्राप्त होत असतात. यामधील महत्वाच्या विषयांचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून सदरचे अर्ज प्रथम प्राधान्य या संदर्भाखाली कार्यवाहीसाठी संबधित विभागाकडे देण्यात येतात. या संदर्भावर संबंधित विभागांनी सात दिवसाच्या आत कार्यवाही करुन त्याचा अहवाल देणे आवश्यक असताना वारंवार पाठपुरावा तसेच लेखी सुचना देवूनही जिल्हा परिषदेच्या सात विभागांनी यासाठी दिरंगाई केली आहे. याची गंभीर दखल घेत डॉ. नरेश गिते यांनी दिरंगाईचा कायदा तसेच महाराष्ट् जिल्हा परिषद जिलहा सेवा (शिस्त व अपिल) नियमाव्दारे शिस्तभंगाची कारवाई का करु नये याबाबत संबधित कर्मचा-यांना नोटीसा बजावण्यात आल्या आह

खाजगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली, ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत आज खाजगी शाळेतील १९ अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात आली.       विभागात अतिरिक्त ठरलेल्या खाजगी शाळांमधील १९ शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देणेबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जिल्हा परिषदेला निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी संबंधित शिक्षकाना समुपदेशनाने पदस्थापना दिली. ८६ ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी नाशिक-  जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक संवर्गातील १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ८६ ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. शासन निर्णयानुसार १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी पदोन्नती समितीसमोर ८६ प्रस्ताव सादर करण्यात आले होते