जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडून सर्वोच्च न्यायालय व शासन आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप ! बोगस डॉक्टर शोध मोहीमेचा होतोय विपर्यास !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक-  केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालया तर्फे इलेक्ट्रोहोमिओपॅथी (बीईएमएस)  चिकीत्सा पद्धतीस मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु असून, याबाबतचे विधेयक संसदेच्या उंबरठ्यावर असताना  जिल्हा आरोग्य विभागामार्फत बोगस डॉक्टर्स शोध मोहिमेच्या नावाखाली इलेक्ट्रोहोमिओपॅथी डॉक्टर्सना वेठीस धरण्यात येत असून , हा त्यांच्यावर सरळ सरळ अन्याय असल्याचे मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी च्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा  आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेला निवेदनात म्हटले आहे.
   नाशिक येथे बोगस डॉक्टर शोध मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चौकशी व कारवाईबाबत इलेक्ट्रोहोमिओपॅथी  चिकित्सकांच्या बाबतीत चुकीची व विसंगत माहिती प्रशासनाने दिल्यामुळे कारवाईचे  संकेत मिळाल्या नंतर  मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ सतीश जगदाळे यांच्या उपस्थितीत असोसिएशनची बैठक घेण्यात आली .यावेळी डॉ जगदाळे म्हणाले कि,  उच्च न्यायालय , सर्वोच्च न्यायालय , आरोग्य मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकीत्सा पद्धतीमध्ये व्यवसाय करणाऱ्या चिकीत्सकाना मान्यता दिली  असताना  जिल्हा प्रशासनाकडून मात्र वारंवार सदर व्यावसायिकांना अवैध ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत यापूर्वीही  जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्यधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्यावर होणारा  अन्याय थांबविण्याची विनंती केली होती. महाराष्ट्र शासनाने २२ जानेवारी २०१८ रोजी परिपत्रक काढून  महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायदा १९६१ च्या कलम २ व ३ नुसार विना नोंदणी आपला व्यवसाय  इलेक्ट्रोहोमिओपॅथी  चिकीत्सा पद्धतीमध्ये करू शकतात असे स्पष्ट केले आहे. असे असतानाही नाशिक जिल्हा आरोग्याधिकारी सदर व्यावसायिकांवर कारवाई करण्यास आग्रही आहेत. सदर बाब अतिशय गंभीर असून, सर्वोच्च  न्यायालय व शासन आदेशाचे उल्लंघन करणारी आहे.  
बैठकी नंतर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आरोग्यधिकारी याना याबाबत निवेदन देण्यात आले. त्यात इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांवर होणारी बेकादेशीर कारवाई त्वरित थांबविण्यात यावी.   इलेक्ट्रोहोमिओप्याथी चिकित्सकांच्या न्यायिक हक्कावर गदा येत असून आमच्या चिकित्सकांनावरती कुठल्याही चौकशीतून अन्याय होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी  तसेच सर्व शासन व न्यायालयीन आदेश लक्षात आणून दिलेत,  बैठकीला डॉ शकील देशमुख (राज्य उपाध्यक्ष), डॉ प्रशांत सोनवणे (राज्य सचिव), डॉ  विलास बिरारीस (राज्य सहसचिव), नाशिक जिल्हाअध्यक्ष डॉ विश्वनाथ सोनवणे, डॉ.जयप्रकाश देवरे, डॉ  माणिकराव पानगव्हाणे, डॉ  सुनील घाडगे, डॉ मिलिंद बोरसे, डॉ  राजेंद्र जगताप, डॉ अनिल देवरे, डॉ  रवी पाटील, डॉ नामदेव लोणारी, डॉ मोहन पगार, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***************************************
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ डेकाटे यांची आयुर्वेद व इलेक्ट्रोहोमिओपथी डाॅक्टरांच्या शिष्टमंडळाने स्वतंत्र पणे भेट घेतली असता, मार्चअखेर चे कारण दाखवून एप्रिल महिन्यात याबाबत लक्ष देणार आहे असे सांगून शिष्टमंडळास आलेल्या पावली माघारी पाठविले. मात्र
शिष्टमंडळास त्यांनी जाताजाता एक सल्ला दिला की काही डाॅक्टर बोगस पदवीधर असतात त्यांची स्थानिक पातळीवर ग्रामसेवकामार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
*****************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव