कनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

       नाशिक – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या कार्यालयाकडे येणा-या प्रथम प्राधान्याच्या संदर्भांवर सात दिवसाच्या आत कार्यवाही न करणा-या जिल्हा परिषदेच्या ७ विभागातील कनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.
       मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तसेच कार्यालयाकडे विविध प्रकारचे अर्ज तसेच तक्रारी प्राप्त होत असतात. यामधील महत्वाच्या विषयांचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून सदरचे अर्ज प्रथम प्राधान्य या संदर्भाखाली कार्यवाहीसाठी संबधित विभागाकडे देण्यात येतात. या संदर्भावर संबंधित विभागांनी सात दिवसाच्या आत कार्यवाही करुन त्याचा अहवाल देणे आवश्यक असताना वारंवार पाठपुरावा तसेच लेखी सुचना देवूनही जिल्हा परिषदेच्या सात विभागांनी यासाठी दिरंगाई केली आहे. याची गंभीर दखल घेत डॉ. नरेश गिते यांनी दिरंगाईचा कायदा तसेच महाराष्ट् जिल्हा परिषद जिलहा सेवा (शिस्त व अपिल) नियमाव्दारे शिस्तभंगाची कारवाई का करु नये याबाबत संबधित कर्मचा-यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच विभाग प्रमुखांच्या अभिप्रायासह खुलासा मागविण्यात आला आहे. या     कर्मचा-यांमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संजय कुमावत, आरोग्य विभागातील श्रीमती कल्पना पठाडे, समाजकल्याण विभागाचे उत्तम पवार, ग्रामपंचायत विभागाचे प्रकाश थेटे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अरुण जाधव, लघु पाटबंधारे विभागातील ज्योती सोनार, महिला व बालविकास विभागातील भानुदास लुटे यांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.