नासिक च्या होतकरू उद्योजकांना बिल्डींग सस्टेनेबल एन्टरप्रायजेस उपक्रमांतर्गत मार्गदर्शनाची संधी ! ६ एप्रिल रोजी , नाशिक आंत्रप्रिनर फोरम चा उपक्रम !! बातमीत खाली दिलेल्या लिंकवर अथवा भ्रमणध्वनी वर नोंदणी करा !!! सविस्तर माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करा !!!!

नाशिक: नाशिक येथील होतकरु उद्योजकांना यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळून नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण उद्योग सुरु व्हावेत, तसेच नवीन उद्योजक उदयास यावेत म्हणून गत १० वर्षांपासून नाशिक आंत्रप्रिनर फोरम " बिल्डींग सस्टेनेबल एन्टरप्रायजेस" हा उपक्रम राबवत असून, यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम दि. ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संजय लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर वार्षिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष संजय लोढा, हर्षद मेहता आणि अजय बोहोरा यांच्या कडून करण्यात येणार आहे.
नाशिक आंत्रप्रिनर फोरमने गेली अनेक वर्षे बिल्डींग सस्टेनेबल एंटरप्राइजेस हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला असून त्याचा फायदा नाशिक मधील होतकरू तरुण उद्योजक घेत आहेत. या उपक्रमातून प्रेरणा घेत अनेकांनी आपले उद्योग उभे केले असून यशस्वीरीत्या चालवत आहेत. या पुढेही अनेक चांगले उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून नाशिक आंत्रप्रिनर फोरम प्रयत्नशील असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘बिल्डींग सस्टेनेबल एंटरप्राइजेस’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे हे सलग १० वे वर्ष आहे. यावर्षी कार्यक्रम हा वैशिष्ट्यपूर्ण असून, प्रभावी व्यावसायिक संवाद, संबंध दृढ करणे आणि एकमेकांस उत्तम प्रकारे सेवा प्रदान करणे तसेच मार्केटची सध्यस्थिती आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि यशस्वी उद्योजकांचे अनुभवकथन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास दरवर्षी उद्योजक जगतातील अतिशय नामांकित आणि यशस्वी उद्योजक मार्गदर्शन करतात. यावर्षी नामांकित कलाकार सतिष कौशिक, प्रख्यात गुंतवणूकदार नागराज प्रकासम, सनदी अधिकारी प्रवीण दराडे, समाज माध्यम (सोशल मीडिया) तज्ञ संजय मेहता, दिग्दर्शक मधुर भांडारकर, सेलिब्रिटी डेंटिस्ट संदेश मयेकर, महिला उद्योजिका रेवती रॉय, गोली वडापाव चे वेंकी अय्यर, ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदीक, डॉ. पवन अग्रवाल, प्रसिद्ध युट्युबर रणवीर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमास 7सी (7C’s), मॅग्नम हार्ट इन्स्टिटयूट, डी. विजय फार्म, कारडा कन्स्ट्रक्शन, गोली वडापाव, डीबीडीएस रोबोटिक्स, काठीयावाड, प्रकाश स्टिलेज लिमिटेड, एक्सप्रेस इन, एमबी शुगर, रिगल टाऊन, रेड एफएम, सौरभ पब्लिसिटी, मोरेज क्रिएटिव्ह, माय एफएम संस्थांचे सहकार्य लाभले आहे. यात भाग घेऊन इच्छिणाऱ्यांनी www.bizeventindia.com या वेबसाईटवर १ एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी किंवा 7498107457, 7498117223 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अहीराणी भाषेतून केले आवाहन ! व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! कुटुंबप्रमुखच्या भूमिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी !!