वरिष्ठांचे आदेश न पाळणाऱ्या आणखी एका ग्रामसेवकाचे झाले निलंबन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

    दिंडोरी तालुक्यातील पुन्हा एका ग्रामसेवकाचे निलंबन !
वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर का केली जाते? याचे परिक्षण केल्यास फक्त ग्रामसेवक जबाबदार असेल की आणखी कुणी !
दप्तर दिरंगाई वा तपासणीस उपलब्ध न करून देणे यांत भ्रष्टाचाराला वाव असल्याच्या चर्चेने दिंडोरी तालुक्यात बोलले जात असुन ग्रामसेवक हा जबाबदार  प्रशासनाचा प्रतिनीधी असतो म्हणून कारवाई तेथपर्यंत येऊन थांबते मात्र पडद्यामागील अशासकीय सूत्रधारांचे काय असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे !
=============================
नाशिक – ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रमुख म्हणून काम करताना कर्तव्यात कसुन केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील राशेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या निर्देशानंतर दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांनी ही कार्यवाही केली.
दिंडोरी तालुक्यातील राशेगाव ग्रामपंचायतीत प्रकाश गावित हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. मात्र प्रशासकीय काम करीत असताना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नोंदवहया व संचिका अद्ययावत न ठेवणे, ग्रामनिधी, १४ वा वित्त आयोगाचे दप्तर अपूर्ण ठेवणे, इतर योजनांचे कॅशबुके व ग्रामनिधी, मासिक सभा रजिष्टर तपासणीसाठी उपलब्ध करुन न देणे तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे यामुळे त्यांना वेळोवेळी नोटीसा देण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीस भेट देवून याप्रकरणी तपासणी केली असता ग्रामसेवकाविरुध्दच्या तक्रारीत तथ्य आढळून आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन दिंडोरीचे गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांनी ग्रामसेवकास तात्काळ निलंबित केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

न्यूज मसालाच्या अकराव्या "लोकराजा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !