भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

माजी आमदार रामदास चारोस्कर शिवसेनेच्या संपर्कात या एका बातमीचा परीणाम नासिक लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवर होऊ शकतो, दिंडोरीचे खासदार हरीश्चंद्र चव्हाणांचे नांव जाहीर होत नाही व डाँ भारती पवारांची भाजपाशी होत असलेली बोलणी कितपत उमेदवारी मिळविण्यात यश मिळवेल ?
शिवसेनेचे धनराज महालेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारीही पदरात पाडून घेतल्याने नासिक व दिंडोरीतील सर्वच समीकरणे बदलू लागली आहेत. भाजपा शिवसेनेचे जागावाटप निश्चित झाले मात्र नासिक व दिंडोरीचे उमेदवार जाहीर होत नाहीत. राज्यात काल झालेल्या घडामोडींनुसार भाजपा व शिवसेना काही जागांची अदलाबदल करू शकते या विधानाला पुष्टी दिल्यास, नासिक लोकसभा मतदार संघातून पालकमंत्र्यांच्या व्युहरचनेचा हा भाग समजून माणिक कोकाटे हे उमेदवार ठरण्याची शक्यता आहे, तसे झाले तर दिंडोरीतील हरीश्चंद्र चव्हाणांऐवजी शिवसेनेकडून रामदास चारोस्कर उमेदवारी करतील व डाँ भारती पवार यांचा भाजपा प्रवेश केला काय अन् नाही केला तरी फारसा फरक पडणार नाही असे गणित मांडले जाऊ शकते, मुळात राष्ट्रवादीने त्यांच्यावर अन्याय केला आहे या सुडाच्या भावनेने त्या पक्षापासून आपसूक दूर झालेल्या आहेतच, भाजपाशी संपर्कात आहेत अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही त्यांची आता फारशी दखल घेणे तुर्तास टाळले जाईल, चव्हाणांचे गावितांशी राजकीय सूत कधी जुळले नाही मात्र भाजपाने थोड्याफार ( मंत्रीपद न दिल्यामुळे) विश्वासाने त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणले आहे याचा विचार करून ते यंदा उमेदवारी नाही मिळाली तरी भाजपा विरूद्ध जास्त टोकाची भूमिका घेणे टाळतील यात शंका असण्याचे कारण नाही.
       म्हणून भाजपा शिवसेनेने येथील दोन्ही उमेदवार जाहीर न करण्याचे कदाचित हेच कारण असु शकते व तशी जागांची अदलाबदल केल्यास नासिकमधून भाजपाचे कोकाटे व दिंडोरीतून शिवसेनेचे चारोस्कर असे गणित तयार झाले व त्यात दोन्ही पक्ष यशस्वी ठरले तर महाराष्ट्रातील हा अदलाबदलीच्या जुगार किंवा जुगाडची चर्चा राजकीय क्षेत्रात झाली नाही तर नवलच !! नाही का ?

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!