पोस्ट्स

उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन ! जास्तीतजास्त बटुकांनी सहभाग नोंदवावा-प्रविण तिवारी. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
ब्राह्मण यूनिटीकडून सामुदायिक उपनयन संस्कार सोहऴ्याचे आयोजन ! नासिक::- ब्राह्मण यूनिटी आँर्गनायझेशन संस्थेद्वारे हिंदू धर्मातील सोळा संस्कारातील एक प्रमुख संस्कार म्हणजेच उपनयन संस्कार सोहळ्याचे २१ मे २०१९ रोजी आयोजन करण्यात आले आहे. गोदातीरी सोमेश्वर मंदीराच्या पावनस्थळी श्री भगवान भोलेनाथांच्या सान्निध्यात होणाऱ्या या सोहळ्याला महामंडलेश्वर संवीदानंदजी महाराजांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ब्राह्मण यूनिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण तिवारी यांनी या सोहळ्याला जास्तीत जास्त बटूकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे. बटूकांसोबत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बटूकांना आशिर्वाद द्यावेत असे नम्र निवेदन सुनिता तिवारी, महेश पाठक, अनिल दिक्षीत, गजानन कुलकर्णी, गीता चंद्रस, सीमा पाठक, रविंद्र बडवे, सतिष घैसास, वैष्णवी तिवारी, प्रशांत कुलकर्णी, नूतन गंगोळे, ईश्वरी तिवारी यांनी केले आहे, सदर संस्कार सोहळ्यासाठी बटुकांची संख्या मर्यादित असल्याने पूर्वनोंदणी आवश्यक असून अधिक माहीतीसाठी  ९८५००४५८७९,  ८४२१८४५९७९ या क्रमांकावर संपर्क साधावा. गरजू व गरीब समाजबांधवांसाठी मोफत उपनयन  स

ज्या तरुणांमध्ये प्रचंड मेहनतीची तयारी असेल ते यशस्वी होऊ शकतात-पद्मश्री भांडारकर !! विश्र्वास, गतिमानता व नियमितता हे व्यवसाय यशस्वितेचे गमक- डबेवाले डॉ. पवन अग्रवाल !!! नवीन उद्योग व नव उद्योजक उदयास यांवेत उपक्रम मधुर भांडारकर, सतिष कौशिक, डॉ.पवन अग्रवाल, परमवीर चक्र विजेता योगेंद्र सिंह यादव, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, सनदी अधिकारी प्रविण दराडे, नरेश कारडा, संजय लोढा, अजय ब्रम्हेचा यांच्या उपस्थितीत पार पडला, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक पडद्यावर जे चकचकित जग दिसते ते पडद्यामागे नसते .त्यामुळे या क्षेत्रात यायचे असेल तर प्रचंड मेहनतीची तयारी असायला हवी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता असा सल्ला प्रसिध्द दिग्दर्शक पद्मश्री मधुर भांडारकर यांनी दिला तरुण होतकरू उद्योजकांना  यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळून नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण उद्योग सुरु व्हावेत तसेच नवीन उद्योजक उदयास यावेत  यासाठी नाशिक आंत्रप्रुनर फोरमतर्फे बिल्डिंग सस्टेनेबल एन्टरप्राइजेस हा उपक्रम हॉटेल एक्स्प्रेस इन येथे पार पडला. यावेळी भांडारकर  बोलत होते. यावेळी अभिनेते सतीश कौशिक,  डबेवाला असोसिएशनचे डॉ पवन अग्रवाल,  परम वीरचक्र विजेता योगेंद्र सिंग यादव आदि मान्यवर उपस्थित होते . तत्पूर्वी सकाळी अन्न व औषधी प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे ,  सनदी अधिकारी प्रवीण दराडे ,  प्रख्यात  गुंतवणूकदार नागराजा प्रकासमा , बांधकाम व्यवसायिक नरेश कारडा,  संजय लोढा, अजय ब्रम्हेचा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला. यावेळी परमवीरचक्र विजेता योगेंद्रसिंग यादव यांची खास उपस्थिती होती .प्रथम सत्रात सुरुवातीला प्रख्यात  गुंतवणूकदार नागराजा प्रकासमा, गोली व

जिल्हा परिषदेचा मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ! ७ व्या वेतन आयोग वाढीसाठीच्या लाचप्रकरणाची पहिली शिकार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
बीड::- सातव्या वेतन आयोग वाढीसाठीच्या फाईलवर सही करून फाईल   जिल्हा परिषद लेखा विभागाकडे सादर करण्यासाठी मागीतलेली  लाच स्वीकारताना प्रभारी मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.    जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाहली ता.पाटोदा जि.बीड येथील प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ गोरख लाड याने तेथील एका शिक्षकाचे ७व्या वेतन आयोग वाढीच्या फाईल वर सही करुन सदर फाईल लेखा विभागाकडे सादर  करण्यासाठी लाचेच्या स्वरुपात पैशाची मागणी केली होती, ती रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकनाथ लाड यांस ताब्यात घेतले. 

विकासाचे स्पीडब्रेकर ठरलेल्या शिवसेना-भाजपाला हटविण्याची जबाबदारी लोकांची आहे-भुजबळ !! सरकारने जनतेला मुर्खात काढले- काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील सूर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी संयुक्त पत्रकार परिषद !            नासिक::-आज १ एप्रिल , मुर्खात काढण्याचा दिवस की मुर्खात निघण्याचा दिवस !             शिवसेना भाजपच्या सरकारने सर्वसामान्य जनतेला मुर्खात काढले हे सांगण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस भवनात संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, या आयोजनासाठी १ एप्रिलचीच निवड केली, प्रश्न असा निर्माण होतो की हा सर्व खटाटोप करून पत्रकारांनाच एप्रिल फुल करून त्यांच्या लेखणीतून तीर मारून घेण्याचा मानस होता की काय ?            समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले ते त्यापद्धतीने त्यांच्या सोबत असलेले दोन्ही काँग्रेसचे शहाराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनीही सक्षमपणे सहभाग नोंदवित मांडणे अपेक्षित होते. जयंत जाधवांनी प्रास्ताविकाच्या माध्यमांतून काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसच्या माजी मंत्री शोभाताई बच्छाव यांनी बळजबरीने ओढून ताणून समीर भुजबळांनी मांडलेल्या मुद्द्यांनाच पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला.          खरोखर जर १ एप्रिलनिमित्त पत्रकार पर

गुढीपाडव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन ! मतदान, पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेतून मतदान ,  पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती   अत्रेयनंदन बहुद्देशीय कला ,  क्रीडा , सांस्कृतिक व सामाजिक संस्थेकडून गुढीपाडव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन नाशिक , दि.२९ मार्च :- अत्रेयनंदन बहुद्देशीय कला, क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक संस्था कामटवाडे व नववर्ष स्वागत यात्रा समिती नवीन नाशिक यांच्यावतीने गुढीपाडव्या निमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या वर्षी १०० टक्के मतदान, पाणी बचत, एकात्मिकता याबाबत चित्ररथ तयार करून जनजागृतीकरून  नववर्षाचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा प्रा. वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, कोषाध्यक्ष योगेश मांडे,सचिव राजेश मालपुरे यांनी दिली आहे.              नवीन नाशिक परिसरात तीन वर्षापासून गुडीपाडव्या निमित्त सर्व समाजाचे संघटन व समाज प्रबोधन तसेच नवीन नाशिक परिसरात सांस्कृतिक अभिसरण व्हावे

पत्रकार भारस्कर यांचे परिवहन मंत्र्यांना आवाहन, शौचालयांकडून होणारी सक्तीची वसुली बंद करा, सर्वसामान्यांना दिलासा द्या !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
हागणदारीमुक्त भारत करण्यासाठी शौचालयाकडे सरसवणाऱ्याकडून खंडणी वसुली रावते-देओल बंद करा वसुली नाशिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी हागणदारी मुक्त करण्यासाठी महानायक अभिताभ बच्चन ते बालकलाकारापर्यंत सर्वांचीच मदत घेत आहे. मात्र शौचालयाच्या ठेकेदारापासून मंत्रालयात बसणाऱ्या बाबूपर्यंत सर्वच या प्रयत्नावर पाणी फिरवत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते नागरिकांसाठी मोफत असलेल्या शौचालयात होणाऱ्या लुटीसंदर्भात वारंवार तक्रारी करीत असतांना देखील केवळ नरकातील पैशाचा स्वाद गॉड लागू लागल्याने सामान्य प्रवाशांच्या मूलभूत मुद्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे प्राथमिक माहितीवरून वार्षिक कोटी रुपयांपर्यंत असून त्याबाबत तक्रार करणाऱ्या व्यक्तींचा मुडदा पाडण्यापर्यंतच्या धमक्या दिला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून नियम धाब्यावर बसून जनतेच्या मजबुरीचा फायदा घेणाऱ्या शौचालयाचा ठेकेदार, कर्मचारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधिताच्या विरोधात खंडणीची मागणी केली जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून या लुटीच्या विरोधात आवाज उठविणारे पत्रकार संतोष भारस्कर यांनी सांगितले की शासकीय नियमानुसार पुरुष अथवा म

भारतातील प्रथम आध्यात्मिक चित्रपट ‘गॉड ऑफ गॉडस्’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !! अध्यात्मिक गुढ प्रश्र्नांची उत्तरे देणारा चित्रपटाचे प्रेक्षकांनी केले स्वागत !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
ब्रह्माकुमारीज् निर्मित भारतातील प्रथम आध्यात्मिक चित्रपट ‘गॉड ऑफ गॉडस्’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक मधील विविध चित्रपट गृहातून १७६५ पेक्षा अधिक प्रेक्षक एकाच दिवशी या चित्रपटाचा आनंद घेणार नाशिक ::- ब्रह्माकुमारी संस्थेच्या फिल्म डिव्हिजन मार्फत निर्मित  गॉड ऑफ गॉडस् हा चित्रपट भारतात विविध ठिकाणी प्रदर्शीत होत असून आध्यात्मिक गुढ प्रश्नांची उत्तरे देणारा प्रथम आध्यात्मिक चित्रपट ठरला आहे. प्रेक्षकांनी  या चित्रपटाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. नाशिक मधे या चित्रपटला अभूतपूर्व यश लाभले आहे. एकट्या नाशिक मधून ३१ मार्च रोजी शहरातील सिटी सेंटर मॉलमधील सिनेमॅक्स मधील ४ स्क्रीन मधून कॉलेज रोड येथील बिगबाजारच्या दी जॉन च्या २ स्क्रीन मधून तर नाशिक रोड येथील रेजिमेंटल प्लाज़ा मधील सिनेमैक्सच्या १ स्क्रीन ऐसे मिळून ७  स्क्रीन मधून  १७६५ पेक्षा अधिक प्रेक्षक एकाच दिवशी या चित्रपटाचा आनंद घेणार आहेत. प्रेक्षकांच  उत्साह पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक व्यंकटेश व् प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मी नारायण या दिवशी लॉन्चिंग कार्यक्रमाला उपस्तित राहण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे लॉन्चिंग सिट

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सतर्फे मुंबईत भारतातील पहिला रुग्ण-डॉक्टर जाहीरनामा प्रकाशित ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
      असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सतर्फे मुंबईत भारतातील पहिला रुग्ण-डॉक्टर जाहीरनामा प्रकाशित            या जाहीनाम्यात रुग्ण व डॉक्टरांचे हक्क अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि १७ विविध पैलूंबाबत दोघांची वर्तणूक कशी असावी याचे निकष निश्चित करण्यास मदत होते. गेल्या काही वर्षात डॉक्टर व रुग्ण यांच्यात निर्माण झालेला अविश्वास आणि कटूता दूर करून डॉक्टर व रुग्णांच्या नात्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा आहे.          मुंबई, २८::- डॉ. अपर्णा गोविल भास्कर आणि डॉ. देबराज शोम या मुंबईतील डॉक्टरांनी संयुक्तपणे लिहिलेल्या भारतातील पहिल्यावहिल्या रुग्ण व डॉक्टर हक्क जाहीरनाम्याचे आज प्रकाशन करण्यात आले. भारतातील ११,००० डॉक्टरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स या डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. या जाहीरनाम्यासाठी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स (एएमआय) या संस्थेचे संस्थापक डॉ. ललित कपूर यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे सांगितले. डॉ. भास्कर आणि डॉ. शोमा यांनी संयुक्तपणे

धुळे::- डाँ.भामरेंना स्वीय सहाय्यंकाचा तर कुणाल पाटील यांना पक्षांतर्गत फटका ! व दोघांना अनिल गोटेंचा, तसेच वंचित आघाडीचाही !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
२०१४ निवडणुकीवेळी शिवसेनेतून भाजपेयी झालेले डाँ.सुभाष भामरे धुळे लोकसभा मतदार संघातून विजयी झाले, मोदी लाटेचा संदर्भ आजही तत्कालीन निवडणुकीला जोडला जातो तो खरा की खोटा हे २०१९ निवडणुकीत दिसेल, मात्र पूर्ण विजय हा फक्त मोदी लाटेवर ढकलणे योग्य नाही, डाँ.सुभाष भामरेंचा वाटाही तितकाच मोठा होता, सुशिक्षित, निष्कलंक, अभ्यासू व दमदार कार्यकर्त्यांचे पाठबळ लाभलेले व्यक्तीमत्व हे गुण आपसूक विजयाला कारणीभूत ठरले होते, मात्र गेल्या पाच वर्षात परिस्थितीत जो बदल जाणवतो त्याकडे कानाडोळा करणे महागात पडू शकते, डाँ. भामरेंच्या अवतीभवती जे स्वीय सहाय्यकांनी कोंडाळे केले होते, त्यांच्या वागणुकीत जो अहं. दर्प दिसुन येत होता त्याचा काही अंशी नक्की फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही, डाँ. भामरेंवरील मोठी जबाबदारी सांभाळतांना कामाची विभागणी करणे क्रमप्राप्त असतांना जो अतिविश्वास स्वीय सहाय्यकांवर दाखविण्याचा प्रकार कदाचित अनावधानाने घडला असेल मात्र त्याचा उपयोग होण्याऐवजी उपभोग घेण्यात वर्ग झाला असेच म्हणावे लागेल, बागलाण पंचायत समितीतील एका बैठकीत स्वत:डाँ.भामरे यांनी जे वाक्य वापरले ते त्यांच्या लेखी "जन

लोकसभा उमेदवारांची खरी परीक्षा सुरू !! गुन्ह्यांची कुंडली प्रकाशित करावी लागेल !! सविस्तर माहितीसाठी खालील ब्लाॅगवर क्लिक करा !!!

इमेज
आता खरी परीक्षा ! लोकसभेच्या निवडणुकीत जे उमेदवार नशीब अजमावणार त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांत राहून पुढील वाटचाल करावी लागणार आहे.            जाहीरात देणे बंधनकारक केले आहे म्हणजे सर्वच प्रकारच्या असे नाही तर स्वत:वरील गुन्हे, प्रलंबित गुन्हे याबाबत १२ चा फाँन्ट असलेल्या तीन जाहीराती व त्याही स्थानिक दैनिकांत देणे बंधनकारक केले आहे, याचा फटका प्रस्थापित बाहुबली समजले जाणाऱ्या उमेदवारांनाच जास्त बसण्याची शक्यता आहे, दोन दिवसापासुन सोशियल मिडीया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, "मै चौकीदार व मै जमानत पर" , आता अशा पोस्ट जर जाहीरातींच्या आधीच शेअर होत आहेत व स्थानिक दैनिकांत ततीन वेळा ज्या जाहीराता प्रकाशित होतील त्या सर्वसामान्यांच्या हातात "सकाळच्या" पहिल्या चहासोबतच वाचायला मिळणार याचा परिणांम स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही.         उमेदवार आपली माहीती लपवू शकत नाही, त्याच्यावरील असलेल्या गुन्ह्यांची माहीती तो स्वखर्चाने स्वत:च देणार म्हणजेच यांपुढील होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी तरी आपले चरीत्र स्वच्छ असावे ही भावना नवतरूणांमध्ये रूजविण्यात निवडणूक आयोग यशस्वी