शिवाजी चुंबळेंची उद्धव ठाकरेंना ग्वाही ! गोडसेंना विजयी करूनच मातोश्रीवर पाय ठेवेन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
गोडसे यांना विजयी करूनच मातोश्रीवर पाय ठेवेल ! उमेदवारीच्या स्पर्धेतील चुंबळे यांची उद्धव ठाकरे यांना ग्वाही !! नाशिक - लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले जेष्ठ नगरसेवक शिवाजी चुंबळे यांनी एकत्रितपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.साहेब काळजी करू नका,मला जरी तिकीट नाही मिळाले तरी मी गोडसे यांच्या पाठीशी भक्कम पणे उभा आहे.गोडसे यांना विजयी करूनच पुन्हा मातोश्रीवर पाय ठेवील अशी ग्वाही आज चुंबळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. गोडसे आणि चुंबळे यांनी एकत्रितपणे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्यालाच पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे जिल्हाप्रमुख विजय करंजकर,शिवाजी चुंबळे प्रयत्नशील होते. उमेदवारीसाठी गोडसे,करंजकर आणि चुंबळे यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा सुरू होती.त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी नेमकी कुणाला मिळते याकडे अवघ्या जिल्हावासियांचे लक्ष लागले होते.जिल्ह्याच्या विकासासाठी गोडसे यांनी आणलेल्या विविध विकास योजनांचा