गुढीपाडव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन ! मतदान, पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेतून

मतदानपाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती

 

अत्रेयनंदन बहुद्देशीय कलाक्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक संस्थेकडून

गुढीपाडव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन



नाशिक,दि.२९ मार्च :-अत्रेयनंदन बहुद्देशीय कला, क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक संस्था कामटवाडे व नववर्ष स्वागत यात्रा समिती नवीन नाशिक यांच्यावतीने गुढीपाडव्या निमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या वर्षी १०० टक्के मतदान, पाणी बचत, एकात्मिकता याबाबत चित्ररथ तयार करून जनजागृतीकरून  नववर्षाचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा प्रा. वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, कोषाध्यक्ष योगेश मांडे,सचिव राजेश मालपुरे यांनी दिली आहे.
             नवीन नाशिक परिसरात तीन वर्षापासून गुडीपाडव्या निमित्त सर्व समाजाचे संघटन व समाज प्रबोधन तसेच नवीन नाशिक परिसरात सांस्कृतिक अभिसरण व्हावे या हेतूने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेत सामाजिक संस्था, सामाजिक मंडळे,विविध शैक्षणिक संस्था यांचा सहभाग असणार असतो. या शोभायात्रेत पारंपारिक वेषात ढोलपथक, झांजपथक, ध्वजपथक,लेझीम तसेच यंदा या स्वागत यात्रेतून नागरिकांनी १०० टक्के मतदान करणे,  पाण्याची बचत व राष्ट्रीय एकात्मतता याबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
           नवीन नाशिक नववर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे दोन शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून या  तिन शोभा यात्रा गुडीपाडव्या निमित्त शनिवार दि ०६ एप्रिल २०१९ या दिवशी सकाळी ०६.३० वा. नवीन नाशिक परिसरातून वावरेनगर चौक ते माउली लॉन्स व धन्वंतरी कॉलेज ते वावरेनगर चौक ते माउली लॉन्स आणि पवननगर मारुती मंदिर ते माऊली लॉन्स या तिन वेगवेगळ्या ठिकाणावरून सुरु होऊन डी.जी.पी. नगर २ माउली लॉन्स शेजारी ठाणे जनता सहकारी बँकसमोर कामटवाडे येथे सकाळी ८.०० वा. एकत्र येणार आहे. या शोभा यात्रेत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा प्रा. वैशाली शिंदे,कार्याध्यक्ष राजेंद्र फड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !