असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सतर्फे मुंबईत भारतातील पहिला रुग्ण-डॉक्टर जाहीरनामा प्रकाशित ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


      असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सतर्फे मुंबईत भारतातील पहिला रुग्ण-डॉक्टर जाहीरनामा प्रकाशित
           या जाहीनाम्यात रुग्ण व डॉक्टरांचे हक्क अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि १७ विविध पैलूंबाबत दोघांची वर्तणूक कशी असावी याचे निकष निश्चित करण्यास मदत होते.
गेल्या काही वर्षात डॉक्टर व रुग्ण यांच्यात निर्माण झालेला अविश्वास आणि कटूता दूर करून डॉक्टर व रुग्णांच्या नात्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा आहे.
         मुंबई, २८::- डॉ. अपर्णा गोविल भास्कर आणि डॉ. देबराज शोम या मुंबईतील डॉक्टरांनी संयुक्तपणे लिहिलेल्या भारतातील पहिल्यावहिल्या रुग्ण व डॉक्टर हक्क जाहीरनाम्याचे आज प्रकाशन करण्यात आले. भारतातील ११,००० डॉक्टरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स या डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. या जाहीरनाम्यासाठी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स (एएमआय) या संस्थेचे संस्थापक डॉ. ललित कपूर यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे सांगितले.
डॉ. भास्कर आणि डॉ. शोमा यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या 'डिअर पीपल, वुइथ लव्ह अँड केअर, युवर डॉक्टर्स' या पुस्तकात हा जाहीरनामा समाविष्ट करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये अनेक सहृदय डॉक्टरांनी त्यांना आलेले भावस्पर्शी अनुभव कथन केले आहेत. सध्या या पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया सुरू आहे आणि जुलै २०१९ मध्ये जागतिक पातळीवर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हे पुस्तक ब्लूम्सबरी या प्रकाशन संस्थेतर्पे प्रकाशित करण्यात येणार असून या पुस्तकाची प्रस्तावना दलाई लामा यांनी लिहिली आहे.
या जाहीरनाम्यात रुग्ण आणि डॉक्टरांचे हक्क अधोरेखित करण्यात आले आहेत. १७ विविध पैलूंबाबत दोघांची वर्तणूक कशी असावी याचे निकष निश्चित करण्यास मदत होते. यात समानुभूती, विश्वास, माहिती व संवाद, उपचारांचा खर्च, ओळख आणि व्यावसायिक स्थान, नोंदी व अहवाल, तातडीची वैद्यकीय सेवा, माहितीच्या आधारे परवानगी, गोपनीयता, सेकंड ओपिनिअन, भेदभावमुक्त, सुरक्षितता आणि दर्जेदार आरोग्यसेवा, सेवेतील कसूर, पर्यायी उपचार पर्याय, औषधे व चाचण्यांसाठीचा स्रोत, डिस्चार्ज, शिफारस व ट्रान्सफर आणि तक्रार निवारण हे पैलू समाविष्ट आहेत.
या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. देबराज शोम म्हणाले, "डॉक्टर आणि रुग्णांमधील नाते हे सर्वात शुद्ध नाते असते. हे नाते पूर्वापार असेच चालत आले आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षात या नात्यामधील विश्वास कमी होत चालला आहे आणि वितुष्ट आले आहे. काळ बदलला आहे आणि एके काळी डॉक्टरांना देव मानले जात असे आणि आता डॉक्टरांना सार्वजनिक पातळीवर मारहाण होताना दिसते. डॉक्टर आणि रुग्णांचे हक्क स्पष्टपणे नमूद करून डॉक्टर व रुग्णांमधील नाते पुन्हा पूर्वीसारखेच संतुलित व पवित्र करण्यास मदत करणे, हे या जाहीरनाम्याचे उद्दिष्ट आहे.
डॉ. अपर्णा गोविल भास्कर पुढे म्हणाल्या, "समाजयंत्रणेतील झालेल्या समस्यांमुळे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये तेढ निर्माण झाल्याचे दिसत आहे आणि या तणावपूर्ण नात्याच्या मन विषण्ण करणाऱ्या अनेक बातम्या आपल्याल माध्यमांमधून समजतात. दोघांनाही एकमेकांबद्दल विश्वास वाटेनासा झाला आहे आणि ही व्याप्ती इतकी आहे की, संपूर्ण भारतच डॉक्टरांविरुद्ध लढा देतो आहे, असे वाटू लागले आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत आणि नात्यांमध्ये होत गेलेल्या या ऱ्हासाचे सखोल विश्लेषण करणे आणि कारणे शोधणे अत्यंत आवश्यक आहे. या जाहीरनाम्यामुळे या दोन्ही भागधारकांमध्ये सुसंवाद सुरू होईल आणि या सुंदर नात्याची वीण पुन्हा एकदा घट्ट व्हावी यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या असलेल्या परिस्थितीमध्ये बदल घडवून भारतातील डॉक्टर आणि रुग्णांमधील नात्यामध्ये सकारात्मकता निर्माण करता येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे."
असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स या संस्थेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर म्हणाले, "शेवटी वैद्यकशास्त्र हे प्रेम, माणुसकी आणि कनवाळूपणाचे प्रतिबिंब असते आणि रुग्ण व डॉक्टर यांच्यातील नाते पूर्वीसारखे करण्यासाठी दोहोंमध्ये परस्परसंवाद साधण्याची अत्यंत आवश्यकता आहे. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स या संस्थेतर्फे हा जाहीरनामा एकमताने स्वीकारण्यात आला आहे आणि जगात आज आरोग्य सेवा आणि डॉक्टर-रुग्ण यांच्यातील नात्यांबद्दल असलेल्या दृष्टिकोनाबद्दल या जाहीरनाम्याची दीर्घकालीन मदत होणार आहे."
एएमसीचे संस्थापक डॉ. ललित कपूर म्हणाले, "आम्हा डॉक्टरांना वाटते की, रुग्ण व डॉक्टर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे आणि त्याचे अस्तित्वही असू शकत नाही. या समाजाची जडणघडण आणि मूल्यांसाठी हे नाते अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉ. देबराज शोम यांच्याबद्दल
डॉ. देबराज शोम, संचालक, द एस्थेटिक्स क्लिनिक्स
देवव्रत ऑरो फाउंडेशनच्या माध्यमातून http://www.theestheticclinic.com/ समाजसेवा करत आहे. डॉ. भास्कर यांच्यासमवेत त्यांनी ही संस्था स्थापन केली आहे. त्यांच्या समाजसेवेचा भाग म्हणून ही संस्था रुग्णाच्या समस्यांसंदर्भात काम करते.
डॉ. अपर्णा गोविल भास्कर
डॉ. अपर्णा गोविल भास्कर या प्रसिद्ध बेरिअॅट्रिक आणि अॅडव्हान्स्ड लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत. त्या उत्तम लेखिका आणि चित्रकार आहेत. त्यांनी डॉ. शोम यांच्यासोबत त्यांनी देवव्रत ऑरो फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित