ज्या तरुणांमध्ये प्रचंड मेहनतीची तयारी असेल ते यशस्वी होऊ शकतात-पद्मश्री भांडारकर !! विश्र्वास, गतिमानता व नियमितता हे व्यवसाय यशस्वितेचे गमक- डबेवाले डॉ. पवन अग्रवाल !!! नवीन उद्योग व नव उद्योजक उदयास यांवेत उपक्रम मधुर भांडारकर, सतिष कौशिक, डॉ.पवन अग्रवाल, परमवीर चक्र विजेता योगेंद्र सिंह यादव, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, सनदी अधिकारी प्रविण दराडे, नरेश कारडा, संजय लोढा, अजय ब्रम्हेचा यांच्या उपस्थितीत पार पडला, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक
पडद्यावर जे चकचकित जग दिसते ते पडद्यामागे नसते .त्यामुळे या क्षेत्रात यायचे असेल तर प्रचंड मेहनतीची तयारी असायला हवी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता असा सल्ला प्रसिध्द दिग्दर्शक पद्मश्री मधुर भांडारकर यांनी दिला
तरुण होतकरू उद्योजकांना  यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळून नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण उद्योग सुरु व्हावेत तसेच नवीन उद्योजक उदयास यावेत  यासाठी नाशिक आंत्रप्रुनर फोरमतर्फे बिल्डिंग सस्टेनेबल एन्टरप्राइजेस हा उपक्रम हॉटेल एक्स्प्रेस इन येथे पार पडला. यावेळी भांडारकर  बोलत होते. यावेळी अभिनेते सतीश कौशिक,  डबेवाला असोसिएशनचे डॉ पवन अग्रवाल,  परम वीरचक्र विजेता योगेंद्र सिंग यादव आदि मान्यवर उपस्थित होते . तत्पूर्वी सकाळी अन्न व औषधी प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे ,  सनदी अधिकारी प्रवीण दराडे ,  प्रख्यात  गुंतवणूकदार नागराजा प्रकासमा , बांधकाम व्यवसायिक नरेश कारडा,  संजय लोढा, अजय ब्रम्हेचा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला. यावेळी परमवीरचक्र विजेता योगेंद्रसिंग यादव यांची खास उपस्थिती होती .प्रथम सत्रात सुरुवातीला प्रख्यात  गुंतवणूकदार नागराजा प्रकासमा, गोली वडापावचे वेंकि अय्यर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. सेलेब्रिटी डेंटिस्ट डॉ. संदेश मयेकर आणि अन्न व औषधी प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांची संजय लोढा यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यानंतर दिवसभर मार्गदर्शन , चर्चासत्रे  आणि  यशस्वी उद्योजकांचे अनुभवकथन,  प्रश्नोत्तरे असे विविध  कार्यक्रम संपन्न झाले.
अन्ट्र्प्रुनर फोरमचे अध्यक्ष संजय लोढा यांनी मधुर भांडारकर यांची प्रकट मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांनाना दिलखुलास उत्तरे दिली . इंडस्ट्रीत माझे जवळचे कुणी न्हवते त्यामुळे मला खूप संघर्ष करावा लागला .परिस्थितीचे चटके खात मोठा झालो .मी स्टोरी नाही कन्सेप्ट विकतो त्यामुळे माझे चित्रपट वेगळे बनतात .चित्रपटांवर बंदी घालणे ठीक नसल्याचेही ते म्हणले .मी परिस्थीतीमुळे माझे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही याचे दुःख आहे मात्र प्रत्येकाने शिकायला हवेच़ .
यावेळी अभिनेते सतिष कौशिक यांचेही आपल्या फिल्मी करियर बाबत भाषण झाले .
परमवीरचक्र विजेता योगेंद्र शिंग यादव यांनी कारगिल विजयाची शौर्य कथा सांगितली  तर दुबई स्थित हिरे उद्योजक डॉ हर्षद मेहता यांनीही उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले .
यशस्वी उद्योजकतेसाठी जिद्द अन् चिकाटी !
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी हे गुण असायला हवे. प्रामाणिकपणा आणि स्वताच्या कामावर विश्वास असेल तर कितीही खडतर परिस्थितीतून मार्ग काढता येतो. मुंबईतील डबेवाला यांचे काम प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेच आहे. विश्वास, गतीमानता आणि नियमितता हेच प्रत्येक यशस्वी व्यवसायामागील यशाचे सूत्र असल्याचे मत डबेवाला प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष डा. पवन अग्रवाल यांनी विशेष सत्रात व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित