धुळे::- डाँ.भामरेंना स्वीय सहाय्यंकाचा तर कुणाल पाटील यांना पक्षांतर्गत फटका ! व दोघांना अनिल गोटेंचा, तसेच वंचित आघाडीचाही !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

२०१४ निवडणुकीवेळी शिवसेनेतून भाजपेयी झालेले डाँ.सुभाष भामरे धुळे लोकसभा मतदार संघातून विजयी झाले, मोदी लाटेचा संदर्भ आजही तत्कालीन निवडणुकीला जोडला जातो तो खरा की खोटा हे २०१९ निवडणुकीत दिसेल, मात्र पूर्ण विजय हा फक्त मोदी लाटेवर ढकलणे योग्य नाही, डाँ.सुभाष भामरेंचा वाटाही तितकाच मोठा होता, सुशिक्षित, निष्कलंक, अभ्यासू व दमदार कार्यकर्त्यांचे पाठबळ लाभलेले व्यक्तीमत्व हे गुण आपसूक विजयाला कारणीभूत ठरले होते, मात्र गेल्या पाच वर्षात परिस्थितीत जो बदल जाणवतो त्याकडे कानाडोळा करणे महागात पडू शकते, डाँ. भामरेंच्या अवतीभवती जे स्वीय सहाय्यकांनी कोंडाळे केले होते, त्यांच्या वागणुकीत जो अहं. दर्प दिसुन येत होता त्याचा काही अंशी नक्की फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही, डाँ. भामरेंवरील मोठी जबाबदारी सांभाळतांना कामाची विभागणी करणे क्रमप्राप्त असतांना जो अतिविश्वास स्वीय सहाय्यकांवर दाखविण्याचा प्रकार कदाचित अनावधानाने घडला असेल मात्र त्याचा उपयोग होण्याऐवजी उपभोग घेण्यात वर्ग झाला असेच म्हणावे लागेल, बागलाण पंचायत समितीतील एका बैठकीत स्वत:डाँ.भामरे यांनी जे वाक्य वापरले ते त्यांच्या लेखी "जनसामान्यांच्या सोयीसाठी" होते,  की, "माझ्यावरील जबाबदारी मुळे आपल्याशी प्रत्येकवेळी संपर्क होईलच असे नाही त्यामुळे आपण डाँ.शेषराव पाटील म्हणजेच प्रति डाँ.सुभाष भामरे समजून त्यांच्याशी संपर्क साधावा !"
तसे पाहता डाँ.भामरेंनी जो विश्वास खाजगी स्वीय सहाय्यकावर टाकला त्यात बरेच काही सामावले गेले, बागलाण भाजपातही याबाबत दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली जाणे व ती आताच्या घडीला दूर करणे महत्वाचे आहे,  दुसरे स्वीय सहाय्यक तर स्वत:हून "मीच धुळे लोकसभा मतदार संघाचा खासदार " या अविर्भावात वागल्यामुळे अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी शेवटीशेवटी नाराजीनेच डाँ.भामरेंचे आदरातिथ्य करीत होते, या आदरातिथ्यात डाँ.भामरेंचा स्वभाव त्यांना भावला होता, वैयक्तिक त्यांनी अधिकारी वर्गाला सतत मानसन्मान दिला. खाजगीत पुन्हा डाँ. भामरे खासदार व्हावेत अशी इच्छा व्यक्त करतात हेही नाकारून चालणार नाही.
बरेच स्वीय सहाय्यक हे जवळच्या नातेसंबधातले असल्याने व पदाच्या जबाबदारीला न्याय देतांना या बाबीकडे लक्ष देऊ न शकल्याने त्याचाही सामना करावा लागणार आहे.
          आमदार अनिल गोटेंची उमेदवारी फक्त डाँ.भामरेंना मिळणाऱ्या मतांना छेद देण्याकरीता असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलेच आहे, धुळे शहरातील जनतेने त्यांना मनपात नाकारले तेथे डाँ.भामरेंना धुळे शहरात आता फार मोठा दगाफटका होण्याची शक्यता नाही मात्र धुळे जिल्ह्यातील व बागलाण-मालेगांवमधील परिचीत मतदारांबाबत डाँ.भामरे व कुणाल पाटील यांनी गोटेंना दुर्लक्षीत करणे दोघांसाठी मारक ठरणारे असेल.
          वंचित आघाडीचा उमेदवार आज-उद्या जाहीर होईल, त्यामळे परंपरागत हक्काची व्होट बँक समजणाऱ्यांच्या पोटात नक्कीच गोळा आला असेल यांत कुणाचे दुमत असणार नाही, वंचित आघाडीलाही नजरेआड करणे आता शक्य नाही, फटका तर बसणारव तो भाजप-काँग्रेस दोघांनाही, यातून सावरण्याचा, तग धरून विजयश्री खेचण्यासाठी अपार कष्ट सोसावे लागण्याची तयारी करावी लागेल.
       माजी मंत्री रोहीदास पाटील यांचे सुपुत्र आमदार कुणाल पाटील व डाँ.भामरे यांच्यातच खरी लढत होत असल्याचे तुर्तास दिसत आहे.
         धुळ्यातील झालेल्या सभेतील संपूर्ण भाषणांत राहुल गांधी यांनी ना रोहीदास पाटलांचे ना कुणाल पाटलांचे नांव घेतले, याची जी चर्चा माध्ममवर्तुळात घडून गेली ते कुणाल पाटील यांच्यासाठी कष्टप्रद ठरल्यास नवल नाही ! नासिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती की बोळवण करण्यात आलेल्या डाँ.तुषार शेवाळेंनी गेल्या वर्षभरापासुन केलेल्या तयारीला जो सुरूंग लावला गेला ते किती मनापासून कुणाल पाटील यांच्यासाठी राबतात ?  की नासिक-दिंडोरी मतदार संघासाठी आपला वेळ देण्याच्या सबबीखाली धुळे मतदार संघाकडे दुर्लक्ष करतात हेही बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे ! तसे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमुळे छगन भुजबळ यांची भेट घेऊन कुणाल पाटील यांनी भुजबळांना लक्ष देण्याबाबत साकडे घातले असेलच, पण तेही समीर भुजबळांसाठी नासिक व प्रतिष्ठेची ठरलेली दिंडोरीची जागा व तेथील जबाबदारीसोबत राज्यभरातील सभा-दौऱ्यांमधून किती कष्ट धुळ्यासाठी घेतील ?
एकंदरीत डाँ.भामरे व कुणाल पाटील यांच्यातील ही लढत अटीतटीचीच ठरेल !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!