पोस्ट्स

२१ जून-जागतिक योगदिन, योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे--अमृता वसंत बोरसे  (योगशिक्षिका)!! सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून जरूर वाचा व आपल्या स्नेहीजनांच्या माहीतीसाठी लिंक शेअर करा !!!

इमेज
योग हा शब्द 'युज' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.          योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.”         महाभारत आणि भगवत गीतेच्या फार पूर्वी वीस पेक्षा ज्यादा उपनिषदामध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे ‘योग’ असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मुलभूत सूत्रांच्या रुपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योग सूत्रमध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसऱ्याच योग सूत्र मध्ये योगाची व्य

महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद - नामदार सांगळे ! पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी ९५०० वह्यांचे मोफत वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद - नामदार सांगळे महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा शाखा नाशिक व स्वयंसेवी संस्था यांचे वतीने इयत्ता पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी सर्व अभ्यासक्रमाच्या एकूण ९५०० वह्यांचे मोफत वाटपाचा कार्यक्रम शासकीय कन्या शाळा नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला होता. एक वही मोलाची, सावित्रीच्या लेकीची हे ब्रीद वाक्य घेऊन औषध निर्माण अधिकारी संघटना गत पाच वर्षापासून अखंडपणे या कार्यक्रमाचे नियमित प्रमाणे आयोजन करत आहे. मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शीतल उदय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली  तसेच अर्थ व बांधकाम समिती सभापती मनिषा रत्नाकर पवार, उपशिक्षण अधिकारी अनिल शहारे यांचे हस्ते पार पडला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शेवग्याच्या झाडाचे रोपटे देऊन करण्यात आले.                                        शीतल सांगळे यांनी आपल्या मनोगतात नमुद केले की, नाशिक जिल्हा परिषदेची पुरातन काळातील नाशिक शहरातील शासकिय कन्या विद्यालय ही मुलींची एकमेव शाळा असून या शाळेत गोरगरिब कुटूंबातील नाशिक शहरातील मुल

शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्वसानिमित्त विविध वेशभूषा केलेली मुल, लेझीम पथक, बैलगाडीसारख्या वाहनातून मिरवणूक यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक :  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये  आज शाळा प्रवेशोत्सव सोहळा अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. अंगणवाडींमध्येदेखील नव्यानेच दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सलग दुस-या वर्षी नाशिक जिल्ह्यात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात शाळा व अंगणवाडी प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला असून ग्रामीण भागातील शाळांकडे पालकांचा कल वाढावा व शिक्षणाचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी व्यापक प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली. शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्वसानिमित्त विविध वेशभूषा केलेली मुल, लेझीम पथक, बैलगाडीसारख्या वाहनातून मिरवणूक यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर यांनी नाशिक तालुकयातील सावरगाव, गंगावरे, मुंगसरे येथील शाळा व अंगणवाडींना भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात ११

नाशिक जिल्हयाने राबविलेल्या उपक्रमांची राज्यभरात अंमलबाजावणी करण्यासाठी शासनाकडे शिफारस करणार- आ. विवेक पंडित !!! आदिवासी क्षेत्रातील शंभर टक्के जागा भरण्याची डॉ.नरेश गिते यांनी मांडली सूचना !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक –  नाशिक जिल्हयाच्या दौ-यावर आलेल्या राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीने आज गोल्फ क्लब येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा घेवून जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतूक करतानाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केलेल्या विविध सुचनांबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. आदिवासी क्षेत्रातील राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी शासनाने राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती गठीत केली आहे. आमदार विवेक पंडीत यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आज नाशिक जिल्हयास भेट दिली. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध विभागांमार्फत आदिवासी भागात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. आढावा घेतानाच आदिवासी क्षेत्रासाठी योजना राबविताना काही शिफारशी असल्यास याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आदिवासी क्षेत्रातील १०० टक्के जागा भरण्याची सुचना केली. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने

साथीचे आजारांवर नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीमध्ये एक कोरडा दिवस पाळण्यात यावा-इशादिन शेळकंदे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सलग दुस-या वर्षी सर्व तालुक्यांमध्ये जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्यात येत असून १६ ते ३० जुन पर्यत चालणा-या या अभियानात आतापर्यत जिल्हयातील पेठ, निफाड, बागलाण व सिन्नर येथे मोठया प्रमाणात जलकुंभांची स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान प्रभावीपणे राबविणेबाबतचे दिले असून याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे.       ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश  आहे.  गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मुलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या, हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व टी.सी.ए

दिंडोरी लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी 22 कोटींच्या रस्ते कामांना तत्वतः मंजुरी---खा.डॉ.भारतीताई पवार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दिंडोरी लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी 22 कोटींच्या रस्ते कामांना तत्वतः मंजुरी---खा.डॉ.भारतीताई पवार   नाशिक:  दिंडोरी लोकसभा मतदार संघातील प्रथम महिला खासदार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या डॉ.भारतीताई पवार यांनी मतदार संघाचा विकासासाठी  संपूर्ण मतदार संघातील रस्त्यांची सद्यस्थितीची निवडून आल्यानंतर त्वरित  पाहणी करून तसा अहवाल संबधित विभागाकडून मागवून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेऊन  मतदार संघातील रस्त्याच्या कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार यांनी केली.तर सदर मागणीची त्वरित दखल घेत नामदार पाटिल यांनी ५०५४(३) व ५०५४(४) अंतर्गत सदरच्या कामांना निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.  खासदार पदावर विराजमान होताच सत्कार समारंभांना फाटा देत दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या गावांना अधिका-यांना सोबत घेऊन दुष्काळी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन दुष्काळावर कशी मात करता येईल यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबधीताना केल्या एवढेच नव्हे तर गेली अनेक दिवसांपासून दिडोंरी मतदार संघातील रस्

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना आवाहन पत्र !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक- पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये २० ते ३० जुन या कालावधीत पावसाच्या पाण्याची साठवणुक करण्यासाठी अभियान राबविण्याचे निर्देश केंद्र  शासनाने दिले असून याविषयी आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींना शासनाकडून प्राप्त झाले आहे. सदर अभियान राबविण्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेला निर्देश देण्यात आले असल्याची माहिती माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पावसाचे पाणी साठवणुकीसाठी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये श्रमदानातून बांध-बंदिस्ती, नदी व ओढयात चेक डॅक तयार करणे, गाळाचा उपसा करणे, तलावांचे खोलीकरण व सफाई, वृक्षारोपन आदि विविध प्रकारची काम करावयाची आहेत. यासाठी २२ जुन रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घ्यावयाची असून त्यामध्ये पंतप्रधान महोदयांचे पत्र सर्वांना वाचून दाखवायचे आहे. यासाठी केंद्र शासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे मराठी भाषेतील आवाहन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. प्रत्येक

छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने निवासी जिल्हाअधिकारी यांना SEBC जात प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत वाढ मिळावी अन्यथा जनआंदोलन इशाऱ्याचे निवेदन देण्यात आले. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने निवासी जिल्हाअधिकारी रामदास खेडकर यांना १६ % मराठा आरक्षणाचा लाभ होण्यासाठी SEBC जात प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत वाढ मिळावी  व ५०% शिक्षण शुल्क  मिळणेबाबत ... निवेदन देण्यात आले.        नाशिक::-छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या १६ % आरक्षणाचा लाभ होण्यासाठी SEBC जात प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत वाढ  मिळावी. शैक्षणिक वर्ष २०१९ विद्यालय ,महाविद्यालयात  प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थी व पालकांना याबाबत संभ्रम आहे. मागील शैक्षणिक वर्षी ५०%  शिक्षण शुल्क  बाबत असलेला निर्णय काही महाविद्यालयांनी पाळला नव्हता,  त्या सदर निर्णयाची अंमलबजावणी व्हावी व महाविद्यालयांनाही निर्णयाचा लाभ द्यावा जेणेकरून महाविद्यालय विद्यार्थ्याना तो लाभ ,सूट देतील .              मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील शिफारसीनुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घोषित करून मराठा समाजाला (SEBC) प्रवर्गातून १६% आरक्षण लागू करण्यात आले आहे.  प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मिळालेल्या आरक्षण कोट्यातील १६

१) बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणाली राबविण्यात येणार ! २) शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन !! ३) जिल्हयात ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करणार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणाली राबविण्यात येणार नाशिक – जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणाली राबविण्यात येणार असुन १ एप्रिल २०१९ पासून नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व विभांगांच्या सर्व योजनांची व कामांची देयके प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम मधून अदा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व संबधित विभागांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व दिली. नाशिक जिल्ह्यात बांधकाम विभाग, लघु पाटबंधरे विभाग तसेच पाणीपुरवठा विभाग येथे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करुन यापुढे मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पध्दतीनेच करणेबाबत शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते मागील वर्षी जिल्ह्यात या उपक्रमास सुरवात झाली होती. राज्याने या प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्याची निवड केली होती त्यान

खोटी माहिती सादर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार ! उप अभियंत्यांनी दिलेला अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाईल !! शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत डॉ. गितेंचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक - शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात येणार असून रिक्त पद आणि सामानिकरणानुसार रिक्त पद च्या आधारे ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. याबाबत आज जिल्हा परिषदेत गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संकेतस्थळावर माहिती भरण्यात आली. गट शिक्षण अधिकारी यांनी सादर केलेली माहिती खोटी असल्यास व त्यामुळे बदल्यांमध्ये प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला आहे. शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची बदली प्रक्रिया संदर्भात शाळानिहाय रिक्त जागा आणि समानीकरणानुसार रिक्त ठेवायची पदे निश्चित करून घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत अंतरजिल्हा बदलीने आलेले, सेवानिवृत्त झालेले, मयत झालेले, तसेच मनपा मालेगात हद्दवाढ झाल्याने रिक्त जागांमध्ये सुधारणा झालेने यानुसार समानीकरणानुसार रिक्त ठेवायची पदे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच शासन निर्णयानुसार आदिवासी क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे आव