पोस्ट्स

८ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन ! १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जवळच्या शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्या देण्यात येणार !! मोहीमेचा फायदा घेण्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांचे आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
           नासिक::- जिल्हा परिषद आरोग्य विभागा व महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, यांच्या सहभागाने येत्या ८ ऑगस्ट  रोजी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व नगरपालिका क्षेत्रात सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळा या ठिकाणी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना जवळच्या शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २८% मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवीजंतां पासून धोका आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन करण्यात येते, या दिवशी १ते १९ वर्षे वयोगटातील तील सर्व मुला-मुलींना जवळच्या सरकारी शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येते  तसेच या मोहिमे पासून वंचित राहिलेल्या मुलांना दिनांक १६ ऑगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे, यामध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात १ ते २ वयोगटातील ५,१२,०४३ लाभार्थी बालके असून व २ ते १९ वयोगटातील ११,६७,००७ लाभार्थी बालके आहेत, एकूण १२,१८,२५० बालकांना त्याचा लाभ दिला जाणार आहे .या कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे  २९ जुलै रोजी समन्वय स

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांचे शुभहस्ते करण्यात आले ! जन्मकहाणी पुस्तकाचे प्रकाशन ! शहरी भागातील नव्या पिढीला ग्रामीण एकत्रित कुटुंब पद्धत समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असे पुस्तक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक::- जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उदघाटन नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शीतल उदय सांगळे यांचे शुभहस्ते तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांचे अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.              कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या कामकाजाचा लेखा जोखा नमूद करुन संस्था स्वमालकीच्या वास्तुत स्थानापन्न होत असल्याबद्दल विशेष आनंद होत असल्याचे नमुद केले. कार्यक्रमात जी.पी. खैरनार यांनी कौटुंबिक कहाणी स्वरुपात जन्मानंतरची ज्ञात असलेली "जन्म कहाणी"  या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा सौ. शीतल उदय सांगळे व उपस्थित मान्यवर यांचे शुभ हस्ते करण्यात आला.             या प्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शितलताई उदय सांगळे यांनी आरोग्य कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ व सभासद यांनी थोड्याच अवधीत संस्थ

आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! ञ्यंबकेश्वर::-तालुक्यातील वाढोली येथील आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने गळक्या छतातून जलधारा  येत असल्याने उपकेंद्रात पाणी साचले आहे, यामुळे रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपकेंद्र दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाठवुन ही उपकेंद्राला दुरूस्ती निधी प्राप्त होत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहे. वाढोली येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत होऊन पंधरा वर्षा पेक्षा अधिक काळ झाल्याने त्यावेळी बसवलेले पत्रे जीर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने उपकेंद्रात पावसाचे पाणी येत असून उपकेंद्र सोय नसुन खोळंबा झाला आहे.त्यामुळे येथील आरोग्य सेविका व कर्मचारी यांना रूग्नांना उपचार कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. तर गावात मोठ्या प्रमाणात सर्दी,खोकला,ताप यांचे रूग्ण आहेत. त्यांना खाजगी दवाखान्याचा उपचार घ्यावा लागत असल्याने लाखो रुपयांचे उपकेंद्र बिनकामाची वास्तू होऊ पाहते आहे.  उपकेंद्र  दुरुस्तीची मागणी यापूर्वी येथील कर्मचारी यांच्याकडून  वारंवार करण्यात आ

न्यूज मसाला एक्सक्ल्युझिव्ह! आज नवनिर्वाचित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी "त्या" रस्त्याची माहिती घेणार ! १ आॅगस्ट रोजी केला जातेगांवचा दौरा !! प्रशासनाकडून विकासात्मक व प्रशासकीय कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना जनसंपर्काच्या माध्यमातून पोहचविली जाणार- एस. भुवनेश्वरी,मुकाअ,जिप. !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नासिक ::- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी १ आॅगस्ट रोजी जातेगांव चा दौरा करून आपल्या कार्याच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात केली. सध्या कार्यालयीन कामकाजास व फाईलींचा स्वअभ्यासाबरोबरच निपटारा करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे, लवकरच जिल्ह्यातील पंचायत समित्या व गावांना भेटी देण्याचे व तेथील अडचणी समजून घेत दूर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे न्यूज मसालाशी बोलताना सदर माहिती दिली.                 प्रशासनाकडून विकासात्मक व प्रशासकीय कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना मिळावी,  यांसाठी जनसंपर्काच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.            जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर व जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा या रस्त्याच्या चौकशी ची मागणी केली आहे, सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने की जिल्हा परिषदेने तयार केला आहे ? रस्त्याचे काम करणारे ठेकेदार कोण ?, बील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे की जिल्हा पर

गोदावरी नदी व उपनद्या प्रदुषणमुक्त करणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभापती उध्दव निमसे यांनी घेतलेल्या भेटीत दिले नीधी मागणीचे निवेदन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
          प्रतिनीधी ::-भारतातील पवित्र गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातील पवित्र गोदावरी नदी व उपनद्या या प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच नाशिक शहरातील विकास योजना आराखड्यातील डीपी रस्ते पूल व तद्अनुषंगिक मुख्य रस्ते विकसित करणेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, खासदार हेमंत गोडसे, खासदार भारती पवार , माजी मंत्री बबन घोलप , जगदीश गोडसे, सचिन हांडगे  यांनी निवेदन दिले, या योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याबाबत मागणी करण्यात आली.          नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील अंसित्त्वातील मलनि:सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी  राष्ट्रिय नदी संवर्धन योजने अंतर्गत रु. ३२२ कोटींच्या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे, तसेच नाशिक महानगरपालिकेच्या विकास योजना आराखडयातील डी.पी. रस्ते, पुल व                         तद्नुषंगीक मुख्य रस्ते विकसित करणेच्या कामांसाठी निधी प्राप्त व्हावा व त्यातून शहर विकासाला चालना मिळू शकेल असे निवेदन यावेळी नाशिक मनपा स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी केले.     

खासदार डॉ भारती पवार यांनी घेतली केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट मंत्र्यांची भेट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
खासदार डॉ.भारती पवार यांनी घेतली केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट मंत्र्यांची भेट !     प्रति निधी::-  दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी दि.१ ऑगस्ट रोजी निफाड येथे ड्रायपोर्ट व्हावे या करीता केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट, पोर्ट मंत्री मनसुख मांडवीय यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. भेटी प्रसंगी निफाड येथे ड्रायपोर्ट उभारणी बाबत चर्चा करत असताना ड्रायपोर्ट कसे व्यवहार्य आहे हे खा.डॉ.भारती पवार या पटवून देत शेतकरी हा कृषी व्यवस्थेचा कणा आहे आणि या ड्रायपोर्टमुळे ग्रामीण भागासह शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास अधिक मदत होईल. या संदर्भात अधिक सकारात्मक चर्चा करत मंत्री महोदयांनी आपण देखील या विषयी सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. सदर भेटी प्रसंगी सुरेश बाबा पाटील, केदा आहेर, आ.अनिल कदम, व्यवस्थापकीय संचालक खरे आदी उपस्थित होते.

व्हर्च्युअल क्लासरुमची जिल्हयाने यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पध्दतीने व्हर्च्युअल क्लासरुम हा उपक्रम राबविण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला !! असा कोणता जिल्हा व कोण जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक   –  आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण् शिक्षण उपलबध करुन देण्यासाठी  व्हर्च्युअल क्लासरुम महत्वाच्या आहेत. यासाठी नाशिक जिल्हा परिषदेमार्फत प्रायोगिक तत्वावर सामाजिक बांधिलकी (सीएसआर) या उपक्रमातून उपलब्ध होणा-या निधीतून व्हर्च्युअल क्लासरुम ही संकल्पना जिल्हा परिषदेच्या 100 शाळांमध्ये राबविण्यात येणार असून आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या उपक्रमाचे प्रात्यक्षिक सादर केले.              व्हर्च्युअल क्लासरुमबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, युवानेते उदय सांगळे यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून याबाबत माहिती देवून या उपक्रमाचे संगणकीय सादरीकरण केले. पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देतानाच नाशिक जिल्हयाने याची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पध्दतीने व्हर्च्युअल क्लासरुम हा उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी बोलून दाखवला. शहर व गाव यांच्यात

आदर्श  शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि ३० जुलै रोजी वितरण होणार...! शिक्षक कधीच सामान्य नसतो, याविषयावर विजयेंद्र महाजन यांचे व्याख्यान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आदर्श  शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि.३० जुलै रोजी वितरण होणार...!   प्रतिनिधी::-  विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण व नाविन्यपूर्ण माहिती देणारे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील व सामाजिक भावना जपणाऱ्या नासिक जिल्ह्यातील विविध क्लासच्या संचालकांना यावेळी आदर्श शिक्षक सानेगुरुजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती एस.के.डी चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन संजय देवरे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे व दीपस्तंभ फाउंडेशन चे चेअरमन युजवेंद्र महाजन यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा मंगळवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प. सा. नाट्यगृह, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुरेश पवार यांच्या "बे दुने चार"  या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिक्षणातून सामाजिक परिवर्तन या विषयावर उत्तम कांबळे यांचं विशेष व्याख्यान तसेच "शिक्षक कधीच  सामान्य नसतो" या विषयावर यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, यावेळी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान क

शिर्डी येथील सरपंच परिषदेसाठी ४० ते ५० हजार सरपंच उपस्थित राहतील !! नासिक जिल्ह्यातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यासाठीचे नियोजन पूर्ण-शितल सांगळे !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने बुधवारी (दि.३१) शिर्डी (जि. अहमदनगर) येथे सरपंच, उपसरपंच यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी राज्यातील ४० ते ५० हजार सरपंच, उपसरपंच उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्हयातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून यासाठीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.           सरपंच परिषदेबाबत आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी पत्रकार परिषद घेवून कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे, राज्यसंघटक अविनाश आव्हाड,जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर यांनीही यावेळी सरपंच परिषदेविषयी तसेच शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. सरंपच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मानधन द्यावे, सरपंचांमधून एक आमदार प

प्रतिक्षा संपली........ केंद्रीय राज्यमंत्री यांची छबी झळकणार !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला, प्रतिक्षा संपली......               या वर्षी निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल न्यूज मसाला वर प्रेम  करणाऱ्या सर्व मान्यवरांप्रती दिलगीरी व्यक्त करतो, तसेच आनंदाची बातमी म्हणजे न्यूज मसालाचा दिवाळी विशेषांक "लोकराजा" च्या मुखपृष्ठावर  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मा. रामदासजी आठवले यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येणार आहे.           दरवर्षी जुलै च्या सुरुवातीला मुखपृष्ठावरील सन्माननीय संसद सदस्य (खासदार) मानकरी जाहीर करण्यात येते मात्र या वर्षी उशिराने पण सामाजिक जाणीव असलेले रामदास आठवले यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर प्रकाशित  करीत आहोत याचा मनस्वी आनंद होत आहे.            महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील नामवंत व नवलेखक, कवी यांचा मेळ घालून न्यूज मसाला च्या संपादक मंडळाकडून "लोकराजा" नांवाने दर्जेदार दिवाळी विशेषांक प्रकाशित केला जातो, यांत आपले सर्वांचे, मित्रपरिवाराचे, जाहिरातदारांचे प्रेम मिळते व समाजालाही वाचनीय मजकूराचा दिवाळी फराळ मिळतो, सोबत वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन दिले जाते याचे सारे श्रेय आपले