आदर्श  शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि ३० जुलै रोजी वितरण होणार...! शिक्षक कधीच सामान्य नसतो, याविषयावर विजयेंद्र महाजन यांचे व्याख्यान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

आदर्श  शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि.३० जुलै रोजी वितरण होणार...!
  प्रतिनिधी::-  विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण व नाविन्यपूर्ण माहिती देणारे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील व सामाजिक भावना जपणाऱ्या नासिक जिल्ह्यातील विविध क्लासच्या संचालकांना यावेळी आदर्श शिक्षक सानेगुरुजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती एस.के.डी चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन संजय देवरे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे व दीपस्तंभ फाउंडेशन चे चेअरमन युजवेंद्र महाजन यांच्या शुभहस्ते
हा सन्मान सोहळा मंगळवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प. सा. नाट्यगृह, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुरेश पवार यांच्या "बे दुने
चार"  या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिक्षणातून सामाजिक परिवर्तन या विषयावर उत्तम कांबळे यांचं विशेष व्याख्यान तसेच "शिक्षक कधीच  सामान्य नसतो" या विषयावर यजुवेंद्र महाजन
यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, यावेळी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती गिरणा गौरव
प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार व एस.के.डी चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन संजय देवरे यांनी दिली या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सुशील देवरे, अतुल निकम, अक्षय भामरे, किरण लवंड, प्रा वैशाली गावित, पूनम चहाळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।