प्रतिक्षा संपली........ केंद्रीय राज्यमंत्री यांची छबी झळकणार !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

न्यूज मसाला,
प्रतिक्षा संपली......
              या वर्षी निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल न्यूज मसाला वर प्रेम  करणाऱ्या सर्व मान्यवरांप्रती दिलगीरी व्यक्त करतो, तसेच आनंदाची बातमी म्हणजे न्यूज मसालाचा दिवाळी विशेषांक "लोकराजा" च्या मुखपृष्ठावर  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मा. रामदासजी आठवले यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येणार आहे.
          दरवर्षी जुलै च्या सुरुवातीला मुखपृष्ठावरील सन्माननीय संसद सदस्य (खासदार) मानकरी जाहीर करण्यात येते मात्र या वर्षी उशिराने पण सामाजिक जाणीव असलेले रामदास आठवले यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर प्रकाशित  करीत आहोत याचा मनस्वी आनंद होत आहे.
           महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील नामवंत व नवलेखक, कवी यांचा मेळ घालून न्यूज मसाला च्या संपादक मंडळाकडून "लोकराजा" नांवाने दर्जेदार दिवाळी विशेषांक प्रकाशित केला जातो, यांत आपले सर्वांचे, मित्रपरिवाराचे, जाहिरातदारांचे प्रेम मिळते व समाजालाही वाचनीय मजकूराचा दिवाळी फराळ मिळतो, सोबत वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन दिले जाते याचे सारे श्रेय आपलेच आहे, वेळोवेळी जे प्रेम, मार्गदर्शन न्यूज मसाला ला ज्यांच्याकडून मिळते त्या ज्ञात-अज्ञात सर्व मान्यवरांचे आम्ही ॠणी आहोत, असेच सतत आमच्या पाठीशी रहाल या सदिच्छेसह.
      ( ता.क. 
  विधानसभेची आचारसंहिता केव्हाही लागू शकते त्यामुळे विशेषांकाचे प्रकाशनाची तारीख जाहीर केली नाही.)

टिप्पण्या

  1. आदरणीय पाटील सर,
    सस्नेह नमस्कार...
    न्यूज मसाला दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठवर यंदा आपण केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे छायाचित्र प्रकाशित करणार आहात, ही बाब नव्या सामाजिक संक्रमणाची सुरुवात असेल. आपली व्यापक सामाजिक समरसतेची प्रगल्भ दृष्टी, तीक्ष्ण होणाऱ्या अनावश्यक व अनाठायी धार्मिक आणि सामाजिक जाणीवांना बोथट करेल अशी अपेक्षा आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा !


    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.