महाराष्ट राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या राज्य अध्यक्षपदी मविप्रचे डॉ.एस.के. शिंदे यांची बिनविरोध निवड !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
महाराष्ट राज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या राज्य अध्यक्षपदी डॉ.एस.के. शिंदे मुंबई::- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची कार्यकारिणीची सभा मुंबई येथे आमदार निवास येथे कार्याध्यक्ष प्रा.अविनाश तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, त्यात राज्य अद्यक्षपदी संघाचे माजी राज्य सरचिटणीस व मविप्र शिक्षण संस्थेचे शिक्षणाधिकारी, अष्टपैलू नेतृत्व असलेले डॉ.एस के शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ या संघटनेवर सरचिटणीस म्हणून डॉ.एस.के. शिंदे कार्यरत होते, महासंघाच्या सर्व पदाधिका-यांच्या एकमताने त्यांची राज्य अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्याला हा मान मिळाला असून राज्य सरचिटणीस असताना फार मोठी मोलाची कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांनी "कायम विनाअनुदानित" या शब्दातील 'कायम' शब्द काढण्यात विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्यात म.वि.प्र.ही एकमेव अशी संस्था आहे, नोकरभरतीवर स्थगिती असतांना माध्यमिक व उच्च माध्य